मुरूड : प्रतिनिधी : तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये गुरुवारी (दि. 18) दुपारी नारळाचे झाड बाजूच्या एका घरावर आणि रस्त्यावर कोसळले. त्यामुळे घरातील तीन व्यक्ती जखमी झाल्या, तर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नांदगाव येथील भवानी पाखाडी येथील अब्दुलसत्तार म्हसलाई यांच्या बागायत जमिनीमधील एक नारळाचे झाड जोरदार वार्यामुळे मुळासकट …
Read More »परळीत विदेशी दारू साठा जप्त
भरारी पथकाची कारवाई, दोन आरोपी अटकेत पाली : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या भरारी पथकाने परळी (ता. सुधागड) येथे एका कारमधून विदेशी दारू साठा जप्त केला असून, या प्रकरणी दोघांना अटक केली. पाली-खोपोली राज्य महामार्गवरील वाकण, पाली, पेडली, परळी या मुख्य नाक्यावर भरारी पथकांकडून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे. …
Read More »उंबरवाडी, शेंडेवाडीत पाण्यासाठी पायपीट
कर्जत : बातमीदार : तालुक्यातील पोशीर आणि दहिवली ग्रामपंचायत हद्दीतील उंबरवाडी आणि शेंडेवाडीमधील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट वाढली आहे. नळपाणी योजनेचे पाणी कधी तरी येत असल्याने महिलांना पायपीट करून खाजगी बोअरवेलवर जावे लागत आहे. दरम्यान, पाणीटंचाई तीव्र असलेल्या या दोन्ही वाड्यात ट्रँकरचे पाणी द्यावे, अशी मागणी होत आहे. दहिवली ग्रामपंचायतीमध्ये …
Read More »राज्यात आतापर्यंत 118 कोटींचे घबाड जप्त
आचारसंहिताभंगाचे 15 हजार गुन्हे; तीन हजारांवर तक्रारी मुंबई ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी-व्हिजिल’ अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत 3 हजार 211 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, तर आचारसंहिता भंगाचे 15 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये या अॅपच्या माध्यमातून नागरिकही सजगतेने भाग घेत आहेत, …
Read More »चाकूने फोडले मित्राचे डोळे; क्रिकेटवरून वाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सहा महिन्यांपूर्वी क्रिकेटवरून झालेल्या वादातून सहा जणांनी त्यांच्या 22 वर्षांच्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीच्या नेब सराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली. मित्राची हत्या करताना सहाही आरोपींनी क्रूरपणाचा कळस गाठला. हत्या करण्यापूर्वी तरुणाचे चाकूने डोळे फोडले. …
Read More »अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
ठाणे ः प्रतिनिधी :अवघा देश निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार परिसरात इयत्ता 9वीत शिकणार्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही 15 वर्षीय पीडित मुलगी घटना घडली तेव्हा आपल्या मित्रासोबत होती. दोघे निर्जन स्थळी पोहचल्याचे हेरून दोन लोकांनी तिच्या मित्रासह मुलीला झाडाला बांधले आणि …
Read More »आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या नक्षलीचा खात्मा
छत्तीसगड ः वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली. दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलींनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. काही वेळाने नक्षली जंगलात …
Read More »आम्हाला गुंड नको, खासदार हवेत
उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला रत्नागिरी ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असताना राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. याआधी इथे गुंड होते. विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढली. आम्हाला गुंड नकोत, तर खासदार हवे आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »माझ्या विजयासाठी महायुती खंबीर
ना. अनंत गीते यांचा पोलादपुरात दावा पोलादपूर : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या सभांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते खंबीर असल्याचे दिसून आले, तर विरोधकांच्या प्रचारावेळी नेते एका व्यासपीठावर अन् कार्यकर्ते शिवसेनेसोबत असे चित्र दिसत आहे. हे आपल्या सातव्या विजयासाठी सुचिन्ह असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सवाद (ता. पोलादपूर) येथील …
Read More »गणित संबोध परीक्षा विद्यार्थी गुणगौरव
पनवेल : वार्ताहर : पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम, तसेच शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. त्यातील एका उपक्रमांतर्गत गणित संबोध परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जाते. या परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थांचा गौरव सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथील बांठिया स्कूलमध्ये करण्यात आला. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper