Breaking News

Ankit Shah

मिनिडोरला इंडिगोची धडक

एका महिलेचा जागीच मृत्यू, 7 प्रवासी जखमी माणगाव : प्रतिनिधी : माणगाव-निजामपूर रस्त्यावर खर्डी गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 14) संध्याकाळी मिनिडोर रिक्षाला विरुध्द दिशेने आलेल्या  इंडिगो कारने जोरदार धडक दिली. या अपघातात मिनिडोर पलटी होऊन त्यातील एक महिला प्रवासी जागीच ठार झाली, तर 7 प्रवासी जखमी झाले. त्यांना माणगाव उपजिल्हा …

Read More »

मेंदूच्या विकारांविषयी रुग्णांमध्ये जागरूकता आणावी -डॉ. हितेंद्र दहिवडकर

कर्जत : बातमीदार : गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात ब्रेन स्ट्रोक, ब्रेन हॅमरेजसारखे आजार उद्भवू लागले आहेत. हे आजार प्रामुख्याने स्ट्रेस निर्माण होऊन होत असल्याने रुग्णांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी वैद्यक क्षेत्रात काम करणार्‍यांची आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. हितेंद्र दहिवडकर यांनी कर्जतमध्ये केले. कर्जत मेडिकल असोसिएशनची रौप्यमहोत्सवी वार्षिक …

Read More »

वादळी वार्याचा शिलारवाडीला तडाखा

आदिवासीच्या घराचे छप्पर उडाले कर्जत : बातमीदार : वादळी वार्‍यासह अवेळी पावसाचा तडाखा रविवारी (दि. 14) सायंकाळी कर्जत तालुक्याला बसला. यात शेतकरी व वीटभट्टी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिलारवाडीमधील एका आदिवासीच्या घराचे छप्पर हवेत उडून गेले आहे. दरम्यान, आदिवासी शेतकर्‍यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल विभागाने मंडळ अधिकारी …

Read More »

सक्षम विद्यार्थी घडवताना…

आश्रमशाळा म्हटल्यावर सर्वसामान्यांच्या नजरेसमोर उभे राहणारे चित्र काही तितकेसे सकारात्मक नसते, पण समर्थ प्राथमिक आश्रमशाळा बेडग इथले चित्र मात्र वेगळे आहे. इथले फळे बोलके आहेत, विद्यार्थी चुणचुणीत आणि शिक्षक मदतीला तयार असणारे. या शैक्षणिक उत्साहाने भारलेल्या आश्रमशाळेतील प्रयोगशाळेविषयी… सामाजिक कार्य करणार्‍या वारकरी अशोकराव ओमासे यांनी सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मौजे …

Read More »

हिशेब चुकता करा

लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या सभांना कुणी प्रायोजित केले आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतोय. आता आयोगानेही त्याची योग्य ती दखल घेऊन भाजपने जे मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यांचे योग्य प्रकारे निराकरण करणे गरजेचे बनले आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार …

Read More »

खोपोलीत इंडिया स्टील कारखान्यात स्फोट

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी : पोलाद उत्पादन करणार्‍या खोपोलीतील इंडिया स्टील कारखान्याच्या एओडी विभागातील बॉयलरच्या ठिकाणी रविवारी (दि. 14) दुपारी अचानक स्फोट झाला. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते.खोपोली शहरात प्रदूषणाच्या मुद्यावरून स्थानिक व इंडिया स्टील कारखाना व्यवस्थापन यांच्यात नेहमीच वाद सुरू असतात.  …

Read More »

अष्टमी येथे घराला भीषण आग; लाखोंचे नुकसान

रोहे ः प्रतिनिधी : अष्टमी येथील सुर्वे आळीमधील एका घराला शनिवारी (दि. 13) रात्री आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सर्वच लोक घराबाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचे वृत्त समजताच सर्व अष्टमीकर …

Read More »

रायगडात महामानवाला अभिवादन

देशाच्या उभारणीत डॉ. बाबासाहेबांचे महत्त्वाचे योगदान -भीमराव इंगळे अलिबाग : प्रतिनिधी : देशाच्या उभारणीत डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी अनेक योजना सुचविल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांचे ऐकले असते तर देश सुजलाम, सुफलाम झाला असता, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भीमराव इंगळे यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या …

Read More »

महायुतीच्या प्रचाराचा धडाकाच धडाका…

मतदारांशी थेट संवाद साधण्यात भाजप कार्यकर्ते यशस्वी; बारणेंच्या विजयासाठी कसली कंबर खारघर : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीतील प्रचाराने आता चांगलाच वेग पकडला असून, मावळ मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइंचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा धडाकाच लावला आहे. रविवारी खारघर येथे प्रभाग 4मधील सेक्टर 11 येथे जोरदार …

Read More »

ब्राह्मण सभेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात

पनवेल ः वार्ताहर : ब्राह्मण सभा नवीन पनवेल या संस्थेचा वर्धापनदिन व स्नेहसंमेलन सोहळा पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षणमहर्षी बापूसाहेब नेने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व परशुरामपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक कार्य …

Read More »