पुणे ः प्रतिनिधी : सातारा ते मुंबई या नवीन महामार्गावरील जांभूळवाडीजवळील दरी पुलाजवळ पुण्याच्या दिशेने येणार्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती पुलावरुन खाली कोसळली़. या अपघातात कारमधील दोघे जण एअरबॅगमुळे बचावले आहेत़ ही घटना शनिवारी सकाळी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी संजय रामटेके यांनी सांगितले की, दरी पुलात …
Read More »सरन्यायाधीशांवर लैंगिक छळाचा आरोप
प्रसारमाध्यमांनी जबाबदारीने वागावे ः सुप्रीम कोर्ट नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : सुप्रीम कोर्टातील एका कनिष्ठ महिला कर्मचार्याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला असून या आरोपांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी उत्तर दिले आहे. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असून महिलेच्या मागे काही शक्तिशाली लोकांचा हात असावा, असे त्यांनी म्हटले आहे. …
Read More »महायुतीच्या प्रचाराला ग्रामीण मतदारांचा प्रतिसाद
पळस्पे, कोळखे, कोन परिसरात मतदारांकडून उमेदवार बारणे यांचे जल्लोषात स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त : शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पळस्पे, कोळखे व …
Read More »महायुतीच्या जयजयकाराने उरण तालुका दणाणला
उरण : रामप्रहर वृत्त : 33 मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार रॅलीला उरण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शनिवारी संपूर्ण तालुक्यात शिवसेना, भाजप, रिपाइं मित्रपक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी भर उन्हात मतदारांशी संवाद साधत बारणे यांनाच पुन्हा विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ …
Read More »महायुतीचे उमेदवार बारणे यांना मताधिक्य मिळवून देणार
पनवेल : रामप्रहर वृत्त : लोकसभा निवडणुकीत प्रचाराला वेग आला असून मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप आणि रिपाइं युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे याच्या प्रचारासाठी दिघाटी परिसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. अशा युतीच्या पदाधिकार्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बळावर युतीचे उमेदवार यांना दिघाटी, केळवणे, साई, कासरभट, डोलघर, तारा, बांधनवाडी, कल्ले, बारापाडा …
Read More »बारणे यांच्या प्रचाराचा मुस्लिम समाजबांधवांचा जोर
पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराला मुस्लिम समाजबांधवसुद्धा उतरले असून खारघर, तळोजा, नावडा, तळोजा मजकूर आदी भागात मोठ्या प्रमाणात या बांधवांनी प्रचारफेरी काढून कोणत्याही परिस्थितीत धनुष्यबाणासमोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. माजी उपमहानगरप्रमुख गुरुनाथ …
Read More »म्हसळ्यात श्री धावीर देव मंदिर वर्धापन दिन
म्हसळा : प्रतिनिधी : येथील ग्रामदेव श्री धावीर देव मंदिराचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सकाळी उपाध्यक्ष नंदू गोविलकर यांच्या हस्ते श्री धावीर देवाची षोड्शोपचार पूजा करण्यात आली. या वेळी अध्यक्ष सुभाष ऊर्फ बाळ करडे यांच्यासह विश्वस्त मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सकाळी मंदिरापासून श्री धावीर …
Read More »किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादनाचे आज आयोजन
महाड : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाणे होत असलेल्या शिवपुण्यतिथीचा अभिवादन कार्यक्रम शुक्रवार (दि. 19) किल्ले रायगडवर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने चैत्र पौर्णिमा शुक्रवारी …
Read More »ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस प्रारंभ
मुरूड : प्रतिनिधी : मुरूडचे ग्रामदैवत श्री कोटेश्वरी देवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून, हे मंदिर सजवण्यात आले आहे. या देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुणे, कल्याण व डोंबिवली भागातील असंख्य भक्तगण आल्याने मुरूडमध्ये भाविकांची गर्दी झाली आहे. मुरूड समुद्रात कासा किल्ल्यात शिवाजीराजांनी भवानी मातेची स्थापना केली आहे. कोट म्हणजे किल्ला आणि किल्ल्यातील …
Read More »लौजी प्राथमिक शाळेत भुरट्या चोरांचा हैदोस
खोपोली : प्रतिनिधी : नगरपालिका शिक्षण मंडळाच्या लौजी येथील वासुदेव बळवंत फडके या शाळेत बुधवारी (दि. 17) रात्री भुरट्या चोरांनी हैदोस घातला. चोरट्यांनी प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करीत सर्व वर्गखोल्यांचेही कुलूप तोडले. व सामान अस्ताव्यस्त केले. शाळेच्या बालवाडी वर्गातील लहान मुलांची खेळणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी आणलेले गणवेश चोरट्यांनी लंपास केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper