रोहे ः प्रतिनिधी : शासनाच्या एकात्मिक फलोद्यान विकास अभियान अंतर्गत कोकणातील मसाला पिकांचे लागवड क्षेत्र वाढविणे व प्रक्रिया व्यवसायास चालना देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्रामार्फत भोस्तेकरवाडी (ता. रोहे) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यास घोसाळे परिसरातील 120 शेतकरी, महिला व युवक उपस्थित होते. किल्ला रोहे येथील कृषी …
Read More »पाली खोपोली मार्गावर सांडले ऑईल
कार अपघातासह मोटारसायकलस्वार कोसळून जखमी पाली : प्रतिनिधी : पाली-खोपोली मार्गावर सांडलेल्या ऑईलवरून शुक्रवारी (दि. 22) अनेक वाहने घसरल्याची घटना घडली. त्यात काही मोटारसायकलस्वार कोसळून जखमी झाले, तर एका कारचा अपघात झाला. पाली-खोपोली मार्गावर वजरोली गावानजीक एका वळणावर रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणावर ऑईल सांडले होते. रस्त्यावरून येणार्या मोटारसायकलस्वारांना ऑईल साडल्याचे …
Read More »अलिबागसे आया है क्या? या वाक्यावर बंदी घाला
राजाभाऊ ठाकूर यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका अलिबाग : प्रतिनिधी : अलिबागसे आया है क्या, या वाक्यावर गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. अनेक राजकीय, सामाजिक संस्था, व्यक्तींनी यावर निदर्शने, मोहिमा राबविल्या, पण याचा सोक्षमोक्ष लावण्याचे काम राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून …
Read More »उद्योगपती अशोक मित्तल यांच्या रिसॉर्टवर होणार कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी : सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेले प्रसिद्ध उद्योगपती अशोक मित्तल यांचे रिसॉर्ट पडण्याच्या कारवाईला आता वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही कारवाई केली जाणार आहे. अशोक मित्तल यांचे अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथे हॉलिडे रिसॉर्ट आहे. बॉम्बे इन्व्हर्मेन्ट अॅक्शन ग्रुप व इतर यांनी अशोक मित्तल यांच्या अनधिकृत बांधकामाबाबत …
Read More »तळोजा येथे दीड लाखांची घरफोडी
पनवेल : बातमीदार : धरणा कॅम्प, तळोजा येथे चोरट्यांनी दीड लाखांची घरफोडी केली आहे. तळोजा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन नारायण शेगर (वय 35) हे एका कंपनीमध्ये काम करत असून त्यांचे मालक हे राजस्थान येथे गेले असल्याने ते भंडार्ली येथे कंपनीमध्येच काही दिवसांसाठी राहण्यास गेले होते. त्यामुळे त्यांच्या …
Read More »उरणमध्ये राजस्थान वैष्णव मित्र मंडळाचा होळी महोत्सव
उरण : वार्ताहर : उरण येथील राजस्थान वैष्णव मित्र मंडळातर्फे होळी महोत्सव 2019चे आयोजन संस्थापक अध्यक्ष महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार (दि. 22) मार्च रोजी सायंकाळी 6 ते 10पर्यंत उरण एज्युकेशन सोसायटी स्कूल बोरी, उरण येथे करण्यात आले होते. सुमारे तीन हजार राजस्थान वैष्णव समाजाचे बांधव व मित्र परिवार या …
Read More »मत्स्यदुष्काळाने मच्छीमार हैराण
बोटीवर लावण्यासाठी मोठा मासाही नाही सापडला उरण : रामप्रहर वृत्त : समुद्राच्या खवळलेल्या लाटांचा सामना करीत आपला मासेमारी व्यवसाय करणार्या मच्छीमारांकडून समुद्राच्या उसळत्या लाटांचा सामना करीत कुटुंबीयांसह उत्साहात होळी साजरी करण्यात येते, मात्र या वर्षी पडलेल्या मत्स्यदुष्काळामुळे त्यांच्या होळीचा ‘बेरंग’ झाल्याचे दिसून आले. बोटीवर लावण्यासाठीही मोठा मासा मिळाला नसल्याची खंत …
Read More »उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात येवा
‘कोरे’तर्फे विशेष रेल्वे गाड्या मुंबई : प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुटीसाठी कोकणात जाणार्या प्रवासी, तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य, तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे 5 एप्रिलपासून एकूण 60 विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडीदरम्यान या विशेष जादा मेल, एक्स्प्रेस धावतील. गाडी क्रमांक 01411 पुणे …
Read More »पॅन कार्डच्या नियमात होणार मोठे बदल
नागपूर : प्रतिनिधी : प्राप्तिकर विभागाने पॅन कार्डच्या नियमात तीन मोठे बदल केले आहेत. येत्या 1 एप्रिलपासून हे बदल होणार आहेत. पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेले नसेल, तर अनेक अडचणी उद्भवू शकतात. आधारला पॅन न जोडल्यास आयटी कलम 139(ए) अंतर्गत ते निष्क्रिय समजले जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी …
Read More »कोल्हापुरात युतीचा मेळावा विक्रमी होणार
चंद्रकांत पाटील यांचा दावा, तयारीचा आढावा कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या प्रचाराचा प्रारंभ येत्या 24 मार्च रोजी कोल्हापुरातील मेळाव्यातून होणार आहे. या मेळाव्याची सभा ही विक्रमी उपस्थितीची राहील आणि त्यातून युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती केली जाणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. महाराष्ट्रात युतीला लोकसभेमध्ये 45 जागा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper