मुंबई : प्रतिनिधी : ग्रामीण भागातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची आता अस्मिता अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन विक्री करता येणार आहे. याशिवाय खाद्यपदार्थ, लहान मुलांना लागणार्या आवश्यक वस्तू, सौंदर्यप्रसाधने, घरगुती उपयोगी वस्तू, पशू खाद्य आदी साहित्याचीही या अॅपच्या सहाय्याने बचत गटांना रिटेलर म्हणून विक्री करता येणार आहे. जागतिक महिला दिनी राज्याच्या …
Read More »महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना नारीशक्ती पुरस्कार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या देशभरातील 44 माहिलांना नारीशक्ती पुरस्काराने …
Read More »झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार
रांची : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रांचीजवळच्या कुजू घाटात डम्पर आणि इनोव्हा कार यांच्यात हा अपघात झाला. रांचीच्या हटिया येथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबीय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. या वेळी कुजू …
Read More »कंत्राटी कर्मचार्यांना वेतनप्राप्तीची हमी
मुंबई : प्रतिनिधी : कंत्राटी कर्मचार्यांना कंत्राटदारांसमवेत केलेल्या करारानुसार आणि विविध कामगार कायद्यानुसार वेतन प्रदान करण्यासंदर्भात समान कार्यपद्धती लागू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक होते. या संदर्भात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 22 फेब्रुवारी 2019 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार कंत्राटी कर्मचार्यांना कंत्राटदारांमार्फत वेतन अदा करताना समान कार्यपद्धती अवलंबिण्यात …
Read More »‘मालमत्तेच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करा’
पनवेल : वार्ताहर : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या मालमत्तेचे रक्षण करणे हे महत्त्वाचे असून अनेक वेळा थोड्याशा निष्काळजीपणामुळे घरफोड्या व चोर्या होतात. हे टाळण्यासाठी नागरिकांनी आत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी व सोल्युशनचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई अंतर्गत पनवेल …
Read More »पळस्पे विद्यालय जागतिक महिला दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. रिया पाटील, अंजली चव्हाण, कविता मुंडे या विद्यार्थिनींनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी आई माझी मायेचा सागर, अनमोल जन्म दिला ग आई, …
Read More »नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त : पनवेल महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि रायगड जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. वृषाली जितेंद्र वाघमारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांनी नेरे येथील शांतीवनात जाऊन कुष्ठरुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप केले. या वेळी भाजप कार्यकर्ते अशोक …
Read More »15 दिवसांत 19 मुलांचे अपहरण
पनवेल : बातमीदार : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अल्पवयीन मुला-मुलांच्या अपहरणांचे सत्र सुरूच असून फेब्रुवारीच्या 15 दिवसांमध्ये नवी मुंबईच्या वेगवेगळ्या भागांतून 19 मुला-मुलींचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात 11 ते 17 वयोगटातील 15 मुलींचा समावेश आहे. पनवेलमधून 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत तीन मुलींचे अपहरण झाले असून …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा
फुंडे : रामप्रहर वृत्त : रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर विद्यालय फुंडे येथे शुक्रवारी (दि. 8) ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. शालेय परिपाठानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक आर. पी. ठाकूर, जी. सी. गोडगे, गुरुकुल प्रमुख आर. एल. प्रक्षाले, तांत्रिक विभागप्रमुख …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात महिला दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खारघर येथे रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापिका, तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य शरदकुमार शहा यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी शहा यांनी जागतिक महिला दिनानिमित्त संपूर्ण माहिती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper