Breaking News

Ankit Shah

हरकती-सूचनांच्या सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना होणार जाहीर

पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेच्या होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर अवघ्या 33 हरकती आल्या आहेत. महापालिकेच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा आराखडा 13 जून रोजी जाहीर करण्यात आला. हरकती-सूचनांच्या सुनावणीनंतर प्रभाग रचना अंतिम केल्या जाणार आहेत, अशी माहिती उपायुक्त विठ्ठल डाके यांनी दिली आहे. पनवेल महापालिकेच्या …

Read More »

कळंबोलीत होणार सुरळीत पाणीपुरवठा

जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात कळंबोली : बातमीदार कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 4 मधील काही सोसायट्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत येथील नगरसेवक बबन मुकादम यांनी सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा केल्याने सहा इंच व्यासाची जलवाहिनी टाकून पाण्याचा पुरवठा करण्यासाठी काम सुरू केले आहे. …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार अशोक जालनावाला यांना आदरांजली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ठाणे व रायगड जिह्यातील पत्रकारिता क्षेत्रात दादा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अशोक जालनावाला यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त गुरुवारी (दि. 23) वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वर सुमनांजलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या पत्रकारितेतील कार्यकर्तृत्वाला उजाळा …

Read More »

वाचनाने माणूस समृद्ध होतो

-रोहिदास पोटे, कवी/गझलकार/समीक्षक तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात?  एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी …

Read More »

दीर्घ लढाईची तयारी

शहर, गावे व खेड्यांमधले मतदार राजकीय पक्षाचे उमेदवार निवडून देतात, त्याचेच पुढे विधिमंडळ पक्षात रूपांतर होते. संसदीय लोकशाहीच्या लेखी हा विधिमंडळ पक्षच महत्त्वाचा असतो. आजतरी तो पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे. भावनिक राजकारण करून इथे काहीही साध्य होण्यासारखे नाही याची जाणीव शिवसेनेतील सुजाण नेत्यांना असेलच. भावनेचे राजकारण करून एक …

Read More »

नवी मुंबईतील 64 हजार 999 बालकांनी घेतला पोलिओचा डोस

नवी मुंबई : बातमीदार पालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त  अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 19) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी रितीने राबविण्यात आली. नवी मुंबई महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, महत्वाचे नाके अशा …

Read More »

गव्हाण विद्यालयाच्या सुनील गावंड यांची मुख्याध्यापकपदी बढती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजचे उपशिक्षक सुनील गावंड यांची बढतीने संस्थेच्या दक्षिण विभागातील म्हाप्रळ, (ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) येथे मुख्याध्यापकपदी बढती झाली आहे. याबद्दल त्यांनी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य …

Read More »

पनवेल परिसरात नालेसफाईची युद्धपातळी

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी व सूचना पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्वीची कामे युद्धपातळी सुरू असून यातील अनेक कामे पुर्णत्वास आली आहेत. त्या पार्श्वभुमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 20) कळंबोली परिसरामधील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. ज्या ठिकाणी अजूनही कामे सुरू आहेत …

Read More »

उरणची वाटचाल दुसर्‍या आर्थिक राजधानीकडे

वाढत्या उद्योगांमुळे परिसरात विकासाची गंगा उरण : प्रतिनिधी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतर  उरण परिसरात जेएनपीएसारखे अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या बंदराची उभारणी झाली. बंदरातून प्रचंड प्रमाणात होणार्‍या आयात-निर्यात व्यापारामुळे उरण परिसरात विकासाची गंगा वाहू लागली.जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस, नौदल शस्त्रागार, जेएनपीए सेझ आणि इतर प्रकल्पावर आधारित मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या …

Read More »

डेकोरेटर्सकडून थर्माकोलचा सर्रास वापर

नवी मुंबईतील मैदानात कचरा नवी मुंबई : बातमीदार राज्य शासनाच्या आदेशानुसार नवी मुंबई पालिकेकडून प्लास्टिक व थर्मकोलवर बंदी लादली गेली आहे. त्यानुसार पालिकेकडून अनेकदा कारवाया केल्या गेल्या आहेत. थर्माकोलवर बंदी लादलेली असताना नागरिकांकडून गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात इको-फ्रेंडली देखावा करीत त्यास साथ दिली जात आहे, मात्र दुसरीकडे काही डेकोरेटर्सकडून बेसुमार थर्माकोलचा …

Read More »