Breaking News

Ankit Shah

उरणमध्ये स्वामी नारायण संस्कार केंद्राचे भूमिपूजन

आमदार महेश बालदी यांची विशेष उपस्थिती उरण : वार्ताहर उरण येथे बीएपीएस स्वामी नारायण संस्कार केंद्राच्या कामाचे भूमिपूजन व खातमुहूर्त कुंभारवाडा येथे गुरुवारी (दि. 10) झाले. या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी यांच्यासह मुंबई (दादर) येथील स्वामी नारायण मंदिराचे पूज्य कोठारी अभयस्वरूप दास स्वामी, अक्षर चरितदास स्वामी, प्रसन्न मुनिदास स्वामी, सोबत …

Read More »

…तर मविआ सरकार पाडले असते

रामदास आठवलेंचे संजय राऊतांना उत्तर नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या यंत्रणांचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार डळमळीत करण्याचा केंद्राचा डाव असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्याकडून सातत्याने याच विषयावर होणार्‍या टीकेला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उत्तर दिले आहे. ईडी …

Read More »

व्यावसायिकाची फसवणूक; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पनवेल ः वार्ताहर चित्रपटात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने खारघरमधील एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये उकळून  धमकावल्याचा प्रकार घडला आहे. प्रियंका (सीमा) काळेल असे या महिलेचे नाव असून तिने अजित पवार चुलत सासरे असल्याचे आणि डायरेक्टर पितांबर काळेल तिचे सासरे असल्याचीदेखील थाप मारल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेविरोधात खारघर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उत्तम आरोग्यासाठी दर्ग्यावर चादर अर्पण

पनवेल ः वार्ताहर रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगराच्या मध्यवर्ती स्थापित लाखो लोकांचे श्रद्धास्थान हजरत पीर करमअली शाह दर्ग्यावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उत्तम आरोग्यासाठी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड प्रभारी आणि साप्ताहिक कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांनी चादर चढवून दुवा मागितली. लोकनेते रामशेठ ठाकूर हे गोरगरिबांचे …

Read More »

नवी मुंबईत बेवारस वाहनांमुळे स्वच्छतेला खीळ

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरातील सर्वच नोडमध्ये मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बंद वाहने असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बंद अवस्थेत असलेल्या वाहनाखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठून राहिल्यामुळे त्या ठिकाणी नियमित स्वच्छता करता येत नाही व शहर स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो. नवी …

Read More »

फसवणूक करणारा टेम्पोचालक गजाआड

पनवेल : वार्ताहर कर्नाळ खिंडीतून जात असताना दोन मोटरसायकलस्वारांनी लुटले असल्याची तक्रार टेम्पोचालकाने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात केली होती. यामध्ये त्याने पाच लाख 75 हजार रुपये लुटले अल्याचेही सांगितले होते, मात्र पोलिसांनी हा सगळा बनाव उघडकीस आणून त्याला ताब्यात घेतले आहे. पनवेलजवळीस कर्नाळा खिंडीत जबरी चोरी झाल्याची खोटी तक्रार करुन …

Read More »

पनवेलमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे आज प्रदर्शन

पनवेल : प्रतिनिधी महापौर कविता चौतमोल यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानांतर्गत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत एकदिवसीय प्रदर्शन  गुरुवारी (दि. 10) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर डॉ. कविता किशोर चौतमेाल यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामुळे टाकाऊ …

Read More »

‘क्लीनअप मार्शल’चा बेशिस्त नागरिकांवर वॉच

पनवेल मनपा क्षेत्र स्वच्छ, सुंदर राखण्यासाठी पाऊल पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेला महासभेने ‘क्लीनअप मार्शल’ची नेमणूक करण्यास मंजुरी दिल्यावर बेशिस्त नागरिकांवर आता या क्लीनअप मार्शलची नजर असणार आहे. पनवेलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध …

Read More »

नगराध्यक्ष निवडणुकीत भाजप विजयी

लातूर जिल्ह्यातील चाकूर नगरपंचायतीत कमळ फुलले; उपनगराध्यक्षपदावरही वर्चस्व लातूर : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्यात चाकूर नगरपंचायतीत पक्षाचे बहुमत नसतानाही स्थानिक राजकीय समीकरणे जुळवून नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडणुकीत बाजी मारली आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला रोखले तसेच शिरूर अनंतपाळ येथे भाजपचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडून आले. त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

Read More »

कळंबोलीतील सोसायट्यांमध्ये हळदीकुंकू

पनवेल मनपा सभापती प्रमिला पाटील यांचा उपक्रम कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला रविनाथ पाटील यांनी प्रभागातील सोसायट्यांमध्ये जाऊन हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आले. प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात येत होते, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन हळदीकुंकू कार्यक्रम घेण्याचे सभापती प्रमिला पाटील यांनी …

Read More »