पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावीमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी बुधवारी (दि. 9) ’दहावी नंतर काय?’ या विषयावर तज्ज्ञाचे व्यवसाय मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. खारघर येथील ’सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या आयटी विभागाच्या विभाग प्रमुख …
Read More »कामोठे भाजपतर्फे गरजूंना शैक्षणिक साहित्यासह खाऊवाटप
कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप कामोठे मंडलच्या पदाधिकार्यांनी कामोठे परिसरातील फासे पारधी समाजाच्या पालावर जाऊन तिथल्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यांना वह्या, पुस्तक, पेन, पेन्सिल आणि खाऊचे वाटप करण्यात आले. मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील असलेले ही कुटुंबे आपला शिकारीचा उद्योग सोडून पोटाच्या मागे मुंबईत आले, पण शिक्षणाच्या अभावामुळे त्यांना अनेक …
Read More »पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करा
खारघर भाजप शिष्टमंडळाची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी भाजप पदाधिकार्यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला. त्यानुसार नवीन पाइपलाइन टाकण्याची कामे झाली, मात्र यासाठी खोदलेले रस्ते तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे ते रस्ते पूर्ववत करण्यासंदर्भात भाजप खारघरच्या वतीने सिडकोकडे निवेदन देण्यात आले आहे. खारघर सेक्टर 12 जी टाइपमधील पिण्याच्या …
Read More »वाहतूक कोंडीमुक्तीकडे पनवेलची वाटचाल
न्यायालय परिसरात पार्किंगबाबत नवे नियम पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील न्यायालयाच्या मार्गावर चारचाकी वाहनांना सोमवार ते शुक्रवार म्हणजेच कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी ’नो पार्किंग’ बाबत आणि दुचाकी वाहनांना ’सम विषम पार्किंग’बाबतची अधिसूचना घोषित करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजासाठी येणार्या नागरिकांना व या मार्गावरून ये-जा करणार्या नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे नाहक मनस्ताप सहन …
Read More »काँग्रेसची कृष्णकृत्ये
गेल्या आठ वर्षांपासून काँग्रेसची निरंतर पडझड सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. किमान माध्यमांमधून तरी तसेच चित्रण वारंवार होते, परंतु ही पडझड गेल्या आठ वर्षांपासून नव्हे, तर तीन-चार दशकांपासूनच सुरू आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत भाषण करताना गेल्या काही दशकांतील काँग्रेसच्या कृष्णकृत्यांचा जो पाढा वाचला, …
Read More »‘टाटा स्टील’कडून आदिवासी पाड्यांना दिलासा
पनवेल : रामप्रहर वृत्त टाटा स्टीलने निफानवाडी या आदिवासी पाड्याचे रूप पालटून टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. निफानवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील टाटा स्टीलच्या सावरोली पंचायत प्रकल्पाच्या नजीक आहे. या निवासी पाड्यामध्ये 22 झोपड्या असून सध्या या एकूण वस्तीची अवस्था फारच बिकट झालेली होती. विशेषतः …
Read More »खारघरमध्ये सामुदायिक सूर्यनमस्कार उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका प्रभाग 6चे नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्या पुढाकाराने खारघर सेक्टर 18 मधील त्रिकोना पार्क येथे रविवारी (दि. 6) सामुदायिक सूर्यनमस्काराचे आयोजन केले गेले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात 75 कोटी सूर्यनमस्कार महायज्ञ आयोजित केले जात आहेत. विद्या भारतीची उपकंपनी संस्था क्रीडा भारती, विद्यार्थी परिषद, राष्ट्र …
Read More »ई-श्रम आणि युनिव्हर्सल कार्ड शिबिर
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील प्रभाग क्र.34 भाजप अध्यक्ष अॅड. गणेश रसाळ यांच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड आणि रेल्वे प्रवासाकरिता युनिव्हर्सल कार्ड काढून देण्याचे शिबिर रविवारी (दि. 6) आयोजित करण्यात आले होते. नेरूळ सेक्टर-8 येथील भाजप कार्यालयात झालेल्या या शिबिराचा लाभ सुमारे 400 गरजूंनी घेतला. या वेळी माजी महापौर …
Read More »भातशेतीचे क्षेत्र होतेय कमी
उरणमध्ये 11 हजारांपैकी फक्त अडीच हजार हेक्टरवर लागवड उरण : रामप्रहर वृत्त पन्नास वर्षांपूर्वी उरण तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. त्यानंतर येथे अनेक उद्योग तसेच नागरिकरण वाढत गेल्याने हळूहळू भातशेतीचे क्षेत्र कमी होत गेले. आता तालुक्यात 11 हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी फक्त दोन हजार सेक्टरवर भात …
Read More »कर्जत ताडवाडी येथे आदिवासी महिलांना मारहाण
नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथील जमिनी (सर्वे नंबर33/2) मध्ये शुक्रवारी (दि. 4) जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू होते. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन आदिवासी महिलांना तेथील तरूणांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper