Breaking News

Ankit Shah

तरुणाच्या हत्येप्रकरणी एकास अटक

पनवेल ः वार्ताहर – कळंबोलीतील स्मृतीवन उद्यानात चार दिवसांपूर्वी एका 31 वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा कळंबोली पोलिसांनी छडा लावला असून पनवेल येथील साईबाबा मंदिरासमोरील झोपडपट्टीतून मारेकर्‍यांपैकी एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मृत तरुणाच्या खिशातील एक हजार रुपये चोरी करण्यासाठी त्याचा खून करण्यात …

Read More »

दिवाळी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

पनवेल : वार्ताहर – दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच सणांवर कोविडचे सावट आहे. यामुळे नागरिकांमध्येही काही प्रमाणात भीती आहे. भारतीय सणांमध्ये सर्वांत मोठ्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणावरही कोविडचे सावट आहे, मात्र सध्या अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे कंदील, पणत्या …

Read More »

ऐरोलीतील तरुणांना मिळाले हक्काचे मैदान

नवी मुंबई ः बातमीदार – गेल्या काही दिवसांपासून सेक्टर 20मधील खेळाडूंना शनी मंदिरासमोर हायटेन्शन खाली मोकळ्या भूखंडाचा एकमेव आधार असून या मैदानावर खेळण्यासाठी अनेक जण येतात, मात्र काही दिवसांपासून या मैदानावर गवत वाढल्याने खेळाडूंना खेळता येत नव्हते. गवत वाढल्याने सरपटणार्‍या प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब नागरिकांनी …

Read More »

कोरोना काळात सुरक्षित दिवाळी साजरी करा -माजी खासदार संजीव नाईक

नवी मुंबई : बातमीदार – सध्या कोरोनाची महामारी सुरू असल्याने नागरिकांनी ही दिवाळी सुरक्षा बाळगून व स्वतःची काळजी घेऊनच साजरी करावी, असे आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी केले आहे. भाजप व शिवराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष परशुराम ठाकूर व समाजसेवक केशव ठाकूर यांच्याकडून दिवाळीनिमित्त स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्याचे वाटप …

Read More »

मोटरसायकल चोर गजाआड

पनवेल ः वार्ताहर – पनवेल परिसरात मोटरसायकली चोरणार्‍या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड करून त्याच्याकडून चोरीच्या  पाच मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, पोहवा. …

Read More »

आचारसंहिता लागेपर्यंत नागरी कामांसाठी कटिबद्ध

आमदार गणेश नाईक यांची ग्वाही नवी मुंबई ः बातमीदार – महापालिकेकडून बेलापूर येथील माताबाल रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे समजते, परंतु सदर रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू केल्यास त्या ठिकाणी उपचार घेणार्‍या नागरिकांना अडचणीचे होईल. सोयीसुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी कोविड रुग्णालय सुरू करणे उचित होणार नाही. बेलापूर येथील माताबाल …

Read More »

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त- जनहित संवर्धक मंडळ, राजे शिवाजी प्रतिष्ठान, कच्छ युवक संघटना आणि रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 8) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 140 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कोरोना महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांत …

Read More »

पर्यटकांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश

मुरूड ः प्रतिनिधी – मुंबईतील सहा जणांचा पर्यटक ग्रुप शनिवारी (दि. 7) काशिद बीचवर फिरायला आला असता त्यातील काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. ते समुद्रात उतरले तेव्हा ओहोटीची वेळ सुरू होती. त्यातील दोघे पोहताना खोल समुद्रात खेचले गेले. या वेळी तेथे उपस्थित जीवरक्षकांनी त्यांचे प्राण वाचविल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक …

Read More »

पो. नि. अशोक थोरात यांनी स्वीकारला पदभार

रेवदंडा ः प्रतिनिधी – रेवदंडा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पो. नि. सुनील जैतापूरकर यांची पुणे शहरामध्ये नियुक्ती झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागी इन्चार्ज म्हणून पो. नि. अशोक थोरात यांनी पदभार स्वीकारला. रेवदंडा पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पो.नि. अशोक थोरात हे यापूर्वी मुंबईतील भांडूप पोलीस ठाण्यात कार्यरत होते. महाराष्ट्र पोलीस सेवेतील …

Read More »

राज्यमार्गावर वृक्षांची कत्तल

व्यवसायासाठी हिरवाई सुकविण्याची शक्कल; संबंधित विभागांचेही दुर्लक्ष कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा श्री सदस्यांनी हिरवाई फुलविली, मात्र कर्जत-कल्याण राज्यमार्गावर आता तीच हिरवाई आपले व्यवसाय सुरू करणार्‍यांना त्रासदायक ठरत आहे. हिरवीगार झाडे सुकविण्याची अनोखी शक्कल लढवली जात असून कर्जत-कल्याण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करण्याचे प्रमाण वाढले …

Read More »