Breaking News

Ankit Shah

पनवेल महानगरपालिकेत विद्यार्थी दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका कार्यालयात उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून शनिवारी (दि. 7) विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पनवेल मनपा प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष प्रमोद लांगी, पनवेल शिक्षण विभाग केंद्र समन्वयक अशपाक काझी, शाळा क्र.8 मुख्याध्यापिका अतुपमा …

Read More »

शेअर खरेदी आणि कमी जोखीम? शक्य आहे!

शेअर बाजारात थेट गुंतवणूक म्हणजे जोखीम असं समीकरण आपण उगाचच उराशी बाळगतो आणि आपसूकच मग म्युच्युअल फंडांकडं वळतो. परंतु थेट शेअर खरेदीपेक्षा तुलनेनं कमी जोखमीच्या काही गोष्टी उपलब्ध आहेत. त्यातली एक म्हणजे स्टॉक एक्स्चेंजच्या (ईटीएफ) निर्देशांकात गुंतवणूक. आठवड्याच्या शेवटास दिवाळी आहे आणि त्या निमित्तानं म्हणजे नवीन संवत वर्षासाठी शनिवारी लक्ष्मीपूजनाच्या …

Read More »

भारतीय ग्राहकशक्तीचा विजय असो!

भारतीय ग्राहकशक्तीच्या ताकदीवर देशात पैसा फिरायला लागला आणि वातावरण बदलून गेले. भारतातील पैसा असाच फिरत राहिला आणि त्याचा लाभ स्थानिक पातळीवर मिळू लागला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा हा उत्साह दीर्घकाळ टिकेल आणि वर्तमानातील आर्थिक संकटाच्या झळीची तीव्रता निश्चितच कमी होईल. अर्थचक्रासंबंधी सर्व आकडेवारी असे सांगू लागली आहे की भारत नावाचा हत्ती …

Read More »

आणीबाणीची आठवण

गेल्या काही महिन्यांपासून अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीच्या माध्यमातून राज्य सरकारवर तोफा डागल्या होत्या. त्याचा सूड म्हणून त्यांना अटक करण्याची ही कारवाई करण्यात आल्याची टीका होत आहे. आपल्या विरोधात बोलणार्‍या टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे हे ठाकरे सरकारचे उपाय लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारे तर आहेतच, परंतु कुठल्याही प्रकारे विचार केला तरी ते …

Read More »

नवी मुंबई मेट्रो पुढील वर्षी धावणार

पहिला टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – विविध कारणांमुळे नवी मुंबई मेट्रोची मागील दहा वर्षांपासून रखडपट्टी सुरू आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी यापूर्वी अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या, परंतु या सर्व डेडलाइन हुकल्याने नवी मुंबईकरांच्या मेट्रोचा प्रवास लांबणीवर पडला. कोविडच्या संसर्गामुळे हे संपूर्ण वर्ष वाया गेले. त्यामुळे …

Read More »

विक्रांत पाटील यांच्याकडून प्रभागातील प्रलंबित कामे पूर्ण

पनवेल : वार्ताहर – माझा प्रभाग माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करणारे प्रभाग 18 चे नगरसेवक विक्रांत पाटील यांनी प्रभागातील विविध समस्या निकाली काढण्याचा धडाकाच लावला आहे.   नेहमी प्रभागाच्या सेवेसाठी तत्पर असणार्‍या विक्रांत पाटील यांनी स्वामी नित्यानंद मार्गाचे काँक्रिटीकरणमुळे वाढलेल्या उंची मुळे गोविंद गार्डन, गोविंद निलायम आणि अक्षय बंगलो येथील …

Read More »

नेरूळ येथील सायन्स सेंटरच्या उभारणीला गती

आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार – बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने अखेर नेरूळ से-19 येथील वंडर्स पार्क क्षेत्रात सायन्स सेंटर उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत त्याकरिता 70 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच हे सायन्स सेंटर उभारण्याचे काम सुरु होणार असल्याचे नवी …

Read More »

करंजा धक्क्यावर पार्किंग केलेल्या दुचाकी फेकल्या समुद्रात

कारवाई करण्याची मागणी उरण :  प्रतिनिधी – करंजा येथील बंदरात कामानिमित्ताने येणार्‍या प्रवासी, कामगारांच्या पार्क करून ठेवण्यात येणार्‍या दुचाकी काही समाजकंटकडून थेट समुद्रात टाकून देण्याच्या वाढत्या प्रकारामुळे प्रवासी, कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी उरण पोलिसांकडे करण्यात आली आहे. रेवस समुद्रमार्गे दररोज तरीने प्रवास करुन उरण …

Read More »

अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई पालिकेचा पुढाकार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अधोरेखित केलल्या 36 अपघात प्रवण क्षेत्रांत आता पालिका प्रशासनाने झेब्रा क्रॉसिंगसह इतर सुरक्षा उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. यासाठीचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरातील अपघात प्रवण क्षेत्रांत सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी दिल्ली इंन्टीग्रेटेड …

Read More »

माथेरानमध्ये नेटवर्क नसल्याने बँकेवर परिणाम

 एटीएम सेवाही बंद; व्यावसायिकांमध्ये प्रचंड संताप कर्जत : बातमीदार  – माथेरानमध्ये युनियन बँकेचे एकुलते एक एटीएम आहे. मात्र ते नेहमी बंद असते. त्यामुळे स्थानिकांसह येथे येणारे पर्यटक त्रस्त आहेत.  माथेरानमधील व्यापारी व नागरिकांनी  युनियन बँकेच्या शाखाधिकार्‍यांना घेराव घालून बँकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. देश डिजिटल होत आहेत. केवळ प्रशासकीयच नव्हे …

Read More »