उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनने घेतलेल्या परीक्षेचे अभियांत्रिकी शाखेच्या तिसर्या वर्षाचे निकाल जाहीर झाले. या तिसर्या वर्षात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, पेण महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स या डिपार्टमेंटमध्ये सलग तीन वर्ष तन्वी विलास गावंड या विद्यार्थिनीने 83.50 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान मिळविला आहे. तन्वीच्या या यशाबद्दल …
Read More »सोमवारी उरणमधील दवाखाने बंद
इमर्जन्सी सेवा सुरू उरण : बातमीदार कोलकाता येथील रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 17) डॉक्टरांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा म्हणून उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनही उरणमधील दवाखाने बंद ठेवणार असून फक्त इमर्जन्सी सेवा सुरू ठेवणार असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे. कलकत्ता …
Read More »रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा -पालकमंत्री
रसायनी : प्रतिनिधी रसायनी परिसरातील बारा गावांतील शेतकर्यांची सोळाशे एकर जमीन सातशे ते आठशे रुपये एकरी या भावाने 1860 रोजी भारत सरकारने घेतली. यातील काही जमीन औद्योगिकीकरणासाठी वापरली, तर काही पडून आहे. याअगोदर हिंदुस्थान ऑरगेनिक केमिकल कंपनीच्या ताब्यातील जमीन इस्त्रो व बीपीसीएल प्रकल्पाला देण्यात आली असताना शेतकर्यांच्या प्रलंबित मागण्या विचाराधीन …
Read More »‘स्वच्छ भारत अभियानात कामगारांचा मोठा वाटा’
पेण : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49 वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले. स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई …
Read More »समुपदेशन प्रक्रियेत गोंधळ; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते, मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे बदली …
Read More »खालापुरात गॅसवाहक टँकर घसरला
खालापूर : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील कलोते (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर शनिवारी (दि. 15) सकाळी निसरड्या रस्त्यावरुन घसरला व महामार्गावर आडवा झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र कलोते गावाजवळ काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. इंडेन कंपनीचा स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर …
Read More »महाड तालुक्यातील नुकसानग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी व वादळी पावसामुळे मागील दोन वर्षांमध्ये महाड तालुक्यामधील 35 गावांतील ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या ग्रामस्थांना आता सरकारने मदतीचा हात दिला आहे. तालुक्यातील तब्बल 425 आपद्ग्रस्तांना सुमारे साडेतेरा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. महाड तालुक्याला नैसर्गिक आपत्तीचा इतिहास आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात …
Read More »कंत्राटी कामगार व प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देऊ -पालकमंत्री रवींद्र चव्हाण
अलिबाग : जिमाका मौजे रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणार्या कंत्राटी कामगारांना तसेच एचओसी प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 15) अलिबाग येथे दिले. रासळ येथील कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »कामोठे : भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजप तालुका उपाध्यक्ष सुशील शर्मा, कामोठे शहर उपाध्यक्ष अमोल सैद, …
Read More »पनवेल : पाले बुद्रुक येथील आई पालेश्वरी मंदिराचा दहावा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा झाला. त्यानिमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी योगेश तांडेल यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper