Breaking News

Ramprahar News Team

पनवेल ः बारापाडा ते कर्नाळा नाका या परिसरात वीटभट्टी मालकांनी अनधिकृतपणे केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या परिसरातील सुमारे तीनशे एकर  भातशेतीची जमीन पाण्याखाली आहे. अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ही जमीन पडिक आहे.

Read More »

उपमहापौरांनी केली परिसरातील गटारांची पाहणी

पनवेल ः वार्ताहर महापालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल परिसरातील गटारे, नाले, तसेच समस्यांची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना पनवेल महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना देऊन जागेवर स्वतः उभे राहून त्या समस्यांचे निराकरण करून घेतले. पनवेल परिसरातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे त्यातच भरतीचे पाणी उलटे आल्याने पाणी तुंबण्याचे प्रकार …

Read More »

धरणे, धबधब्यांवर जाताय तर जरा सावधान ; पोलिसांकडून सूचना फलक

पनवेल ः वार्ताहर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मुंबईसह, ठाणे, कल्याण व उपनगरातून वर्षासहलीसाठी नागरिक पनवेल परिसरातील गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा, पांडवकडा आदी भागांमध्ये येत असतात. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेल्या गाढेश्वर धरण, मोर्बे धरण, कुंडी धबधबा या ठिकाणी पर्यटनास मनाई असल्याचे फलक पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या …

Read More »

लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांचा नेत्रदानाचा संकल्प

पनवेल ः बातमीदार येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला आहे. डॉक्टर दिनानिमित्त पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या 20 डॉक्टरांनी नेत्रदानाचा संकल्प जाहीर केला असून येत्या काळात नेत्रदान वाढविण्याची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये जनजागृती करणार आहेत. एखादी व्यक्ती स्वतःच्या हयातीतच नेत्रदानाचा संकल्प करू शकते किंवा त्या …

Read More »

शासकीय नोकरीमुळे सकारात्मक सामाजिक बदल -लेंगरेकर

पनवेल ः प्रतिनिधी शासकीय नोकरीत रुबाबाबरोबरच अधिकारही प्राप्त होतात. त्यामुळे आपण सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणू शकतो, असे पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाचे उद्घाटन करताना पनवेल येथे बुधवारी (दि. 3) प्रतिपादन केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पनवेल आणि स्पेक्ट्रम ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा …

Read More »

मोरबे धरणाला गळती

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील मोरबे धरणालाही अनेक ठिकाणी गळती लागल्याची तक्रार करूनही त्याकडे संबंधित अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. आता धरण भरल्याने ते ओसंडून वाहत असताना जास्त पाऊस पडल्यास तिवरेची पुनरावृत्ती होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थ रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. याबाबत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या …

Read More »

पनवेल ः सामाजिक कार्यकर्ते गिरीश जाघे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हॅप्पी मॅन ग्रुपचे सदस्य.

Read More »

पनवेल : माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील व नगरसेविका कुसुम पाटील यांनी सेक्टर 11 व 13 मध्ये सोसायट्या, दलदलीच्या ठिकाणी कर्मचार्‍यांच्या सहाय्याने फवारणी करून घेतली.

Read More »

भरकटलेल्या कोल्ह्याची प्राणी रुग्णालयात रवानगी

नवी मुंबई : प्रतिनिधी ऐरोली सेक्टर 10 मध्ये कोल्हा फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नागरी वस्तीत वाट चुकून आलेल्या या कोल्ह्याला पकडण्यात प्राणीमित्रांना यश आले. मंगळवारी (दि. 2) सकाळी हा कोल्हा ऐरोली सेक्टर 10मधील पाण्याच्या टाकीजवळ नेहमीप्रमाणे आला होता. या पाण्याच्या टाकीजवळ एक दीड वर्षाचा मुलगा राहत असल्याने …

Read More »

उरण शहरात रानभाज्या दाखल

उरण ः वार्ताहर पावसाळा सुरू असल्याने जंगलातील रानभाज्यांनी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. नेहमीच्या भाज्यांचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. त्या मनाने या पावसाळी हंगामात मिळणार्‍या रानभाज्या या स्वस्त दरात मिळत असल्याने रानभाज्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. उरण शहरात महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाजूला महाराष्ट्र स्वीट जवळ, गांधी चौक, राजपाल नाका, आनंद नगर …

Read More »