Ramprahar News Team

एनडीएला राज्यसभेतही मिळणार बहुमत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने जबरदस्त विजय मिळवला आहे. केवळ एनडीएच नाही, तर भाजपलाही स्वबळावर 303 जागा मिळाल्या. लोकसभेतील प्रचंड विजयानंतर आता भाजप आणि एनडीएने राज्यसभेकडे लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या पाच वर्षांत लोकसभेमध्ये बहुमत असले तरी राज्यसभेत बहुमत नसल्याने भाजपने आणलेली अनेक महत्त्वाची …

Read More »

पद्मदुर्गावर लोकवर्गणीतून दोन तोफगाडे ; सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

मुरूड ः प्रतिनिधी मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यात जवळपास 41 तोफा असून, त्यातील काही तोफांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यापैकी दोन मोठ्या तोफा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 26) तीनचाकी आणि चारचाकी लाकडी गाड्यांवर बसविण्यात आल्या आहेत. पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यातील तोफांचे संवर्धन करण्याच्या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानने …

Read More »

गद्दार किसन धोंडू पाटील यांची भाजपतून हाकालपट्टी

पनवेल ः प्रतिनिधी वारदोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवाराविरोधात मतदान करणारे उपसरपंच किसन धोंडू पाटील यांची भाजपतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर उपसरपंच किसन धोंडू पाटील यांनी केलेली गद्दारी लक्षात येताच बेलवली भाजप गाव कमिटीने किसन पाटील यांची या गद्दारीबद्दल पक्षातून हाकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती. …

Read More »

आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई करा ; रायगडातील पत्रकारांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण करणारे शेकापचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांकडून सोमवारी (दि. 27) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील …

Read More »

सिडकोंतर्गत गावे आणि नळजोडणी धारकांसाठी अभय योजना मंजूर

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई परिसरात येणारी सिडको प्रशासित गावे आणि शासकीय नळजोडणी धारकांच्या पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करून मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये आणि सहा महिने कालावधीत भरण्याची ‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. सिडको क्षेत्रातील गावे आणि शासकीय नळजोडणीधारक यांच्याकडील थकीत पाणीपट्टीची …

Read More »

माझ्या विजयात रामशेठ ठाकूर यांचा मोलाचा वाटा -बारणे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप कार्यकर्त्यांचेही मानले आभार

पनवेल ः प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी विशेष मेहनत घेणारे आणि पनवेलमधून 54 हजार मतांची आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 27) पनवेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आभार मानले. भाजप, शिवसेना, आरपीआय …

Read More »

विखे-पाटलांसह चार आमदार भाजपच्या वाटेवर

मुंबई ः लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नसतानाच आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राधाकृष्ण विखे-पाटील, काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून प्रत्येकी एक आमदार, मुंबईतून एक आमदार आणि राधाकृष्ण विखे-पाटील …

Read More »

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बाला चंद्रप्रसाद अजिंक्य

पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण प्रतिष्ठान आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथील बांठिया स्कूल एसी हॉलमध्ये दिनांक 25 व 26 मे रोजी राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. विविध वयोगटामध्ये झालेल्या …

Read More »

फ्रेंच ओपन; 2015 नंतर रॉजर फेडरर जिंकला!

पॅरिस : वृत्तसंस्था रॉजर फेडररने रविवारी क्ले कोर्टवरील फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. 2015नंतर प्रथमच फेडररने या स्पर्धेत विजय मिळवला आहे. नूतनीकरण पार पडलेल्या फिलिप कार्टिरर संकुलात पार पडलेल्या सलामीच्या लढतीत वीस ग्रँडस्लॅम जेतेपदांचा धनी असलेल्या फेडररने नवोदित लॉरेंझो सोनेगोला 6-2, 6-4, 6-4 असे नमवले. 2016मध्ये पाठदुखीमुळे …

Read More »

नेमबाजी विश्वचषकात अपूर्वीचा ‘सुवर्ण’वेध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या वर्षातील तिसर्‍या आयएसएसएफ रायफल पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत रविवारी चुरशीच्या लढतीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. जयपूरच्या या नेमबाजाने अंतिम फेरीमध्ये एकूण 251 गुण नोंदवले. तिच्या वर्चस्वापुढे चीनच्या वांग लुयाओ 205.8 गुणांसह …

Read More »