Breaking News

Ramprahar News Team

रयतकडून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार ; कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाचा गौरव

पनवेल ः प्रतिनिधी कर्तृत्व, दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 9) सातारा येथे कर्मवीरभूमीत समारंभपूर्वक हृद्य …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीतील सिडको क्षेत्राचा पाणीप्रश्न सुटणार

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील पाणीपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी सत्ताधारी भाजपने कंबर कसली असून, पावसाळ्यापर्यंत नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वत: त्यात लक्ष घातले आहे. त्यासंबंधी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्याबरोबर चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरवल्याने आता …

Read More »

दोन मिनिटांत फायनलची तिकिटे संपली ; पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

हैदराबाद : वृत्तसंस्था इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी होणार्‍या चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेता जेतेपदासाठी मुंबई इंडियन्सला आव्हान देणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेली फायनल लढत याची देही… पाहण्यासाठी …

Read More »

हॉकीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात भारताची विजयी सुरुवात

पर्थ : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या थंडरस्टिक्स संघावर 2-0 ने विजय नोंदवून ऑस्ट्रेलिया दौर्‍याची सकारात्मक सुरुवात केली. वीरेंद्र लाक्रा याने 23 व्या, तसेच हरमनप्रीतने 50 व्या मिनिटाला गोल केला. भारताला 15 तसेच 17 मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. उभय संघांनी पहिल्या क्वॉर्टरमध्ये वेगवान …

Read More »

श्री धापया महाराज कुस्ती स्पर्धा ; कोकरे अजिंक्य, तर चव्हाण आखाडा किंग

कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय्य तृतीयेपासून सुरू झाला.  त्यानिमित्ताने शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या कुस्तीच्या आखाड्यात आयोजित केलेल्या कुस्त्यांमध्ये  गेल्या वर्षी अजिंक्य ठरलेला रसायनीचा विशाल कोकरे आणि दिल्लीचा मनजीत यांच्यात कुस्ती रंगली, परंतु कुस्ती ऐन रंगात आली असता मनजितने अचानक आखाडा सोडल्याने विशालला …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात दिल्ली विजयी ; आज चेन्नईशी भिडणार

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. दिल्लीने हैदराबादचा 2 गडी राखून पराभव केला. पंतच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्लीने एलिमिनेटर सामना जिंकला आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतने ताबडतोड खेळी केली. त्याने 21 चेंडूत 49 रन कुटल्या. दिल्लीने विकेट गमावल्यानंतर पंतने एकाकी खिंड लढवत दिल्लीला विजय मिळवून दिला. पंतचे दिल्लीच्या …

Read More »

जागतिक क्षितिजावर चमकणार रायगडचे सात तारे ; अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी निवड

पेण ः प्रतिनिधी नासा, जपान, रशिया, इस्त्रो, चायना, युरोपियन देश वगैरेंशी संलग्न असणार्‍या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन परिषदेसाठी रायगड जिल्ह्यातील सात, तर कल्याणमधील एकाची युवकाची निवड झाली आहे. 1951 साली स्थापन झालेल्या या संस्थेची ही 70वी परिषद असून आजपर्यंत एकाही भारतीय व्यक्तीची अथवा संस्थेची निवड या परिषदेसाठी झाली नव्हती, मात्र ऑक्टोबर …

Read More »

शेकापचा दणदणीत पराभव करून वारदोली ; सरपंचपदी भाजपच्या शिल्पा पवार विराजमान

पनवेल ः प्रतिनिधी वारदोली गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी बुधवारी (दि. 8) निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या शिल्पा पवार यांनी शेकापच्या नीता पाटील यांचा पराभव करीत वारदोली गु्रप ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवला आहे. त्यानिमित्त पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच शिल्पा पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील …

Read More »

पनवेल महापालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी अर्ज दाखल

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी बुधवारी (दि. 8) सत्ताधारी भाजपच्या चार सदस्यांनी आपले अर्ज नगर सचिवांकडे दाखल केले. विरोधकांकडून सभापतिपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीचा निकाल 10 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेच्या 2017मध्ये झालेल्या …

Read More »

राहुल गांधींची पुन्हा बिनशर्त माफी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोर्टाच्या निकालाचा दाखला देताना कोर्टानेही ‘चौकीदार चोर’ असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल यांना निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल यांनी आपण निवडणूक प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केल्याचे सांगत दोनदा चुकीबाबत खेद व्यक्त केला होता, …

Read More »