Breaking News

Ramprahar News Team

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; श्रीवर्धनमधील शासकीय कार्यालयांचा परिसर स्वच्छ

श्रीवर्धन : प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व  स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी श्रीवर्धन शहरातील सार्वजनिक रस्ते आणि शासकीय कार्यालय परिसरात  स्वच्छता मोहीम राबविण्यांत आली. प्रतिष्ठानतर्फे मागील महिन्यात श्रीवर्धन तालुक्यातील स्मशानभ्ाूमी, कब्रस्तान व दफनभ्ाुमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. रविवारी …

Read More »

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीसदस्यांचे श्रमदान ; स्वच्छता अभियानात सुधागडात 2336 श्रीसदस्यांचा सहभाग

पाली : रामप्रहर वृत्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणाच्या वतीने रविवारी सुधागड तालुक्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सकाळी 7 वाजल्यापासून श्रीसदस्यांनी झाडू, घमेल, कोयते, फावडे, पंजा आदी साहित्य घेऊन पाली शहर स्वच्छ केले. त्यामध्ये तहसील कार्याकाय, पोलीस ठाणे, दिवाणी न्यायालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, श्री बल्लाळेश्वर …

Read More »

उरणमध्ये मिरचीचा ठसका; ‘हैदराबादी’ला मोठी मागणी

उरण : वार्ताहर पावसाळा जवळ आला की घरगुती तिखट मसाला बनविण्यात महिला वर्ग मग्न असतो. पावसाळ्यातील चार महिने पुरेल इतका घरगुती तिखट मसाला बनविण्याकडे महिला वर्गाचा कल असतो. त्यामुळेच विविध प्रकारच्या मिरच्या व त्यामध्ये लागणारी मसाला सामग्री खरेदी करताना महिला वर्गाची मसाला तयार करण्याची लगबग सध्या सर्वच गृहिणींकडून सुरू आहे. …

Read More »

चिरनेर रोडवरील जुगाराच्या अड्ड्यावर कारवाईची मागणी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर-खारपाडा रोडवरील आडोशी तलावाच्या समोर वीटभट्टीच्या जवळ अवैधरीत्या सुरू असलेल्या कित्येक हजारो रुपयांचा बाजार होत असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर उरण पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांसह महिला वर्गाकडून प्रामुख्याने करण्यात येत आहे. चिरनेर येथील विजय मुंबईकर नामक इसम हा जुगाराचा अड्डा चालवीत असून, खोपटे …

Read More »

रसायनीत श्रीसदस्यांकडून शासकीय कार्यालय व रस्त्यांची स्वच्छता

रसायनी : प्रतिनिधी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रसायनीत शासकीय कार्यालय परिसर व दांड-रसायनी रस्त्याच्या स्वच्छता मोहिमेचे आयोजन रविवारी (दि. 12) सकाळी 7 वाजल्यापासून करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील शासकीय कार्यालये व दांड-रसायनी रस्त्याची सफाई झाल्याने रस्ता चकाचक दिसत होता. राज्यपालांनी …

Read More »

बीएड् व एमएड्, सीईटी कार्यशाळेचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने शनिवारी महाविद्यालयात मोफत बीएड् व एमएड्, सीईटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शनिवार 11 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या बीएड् व एमएड्, सीईटी कार्यशाळेत प्रथम सत्रात …

Read More »

निवृत्त पोलीस कर्मचार्‍यांचा स्नेहमेळावा साजरा

नवीन पनवेल : वार्ताहर निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना भेडसावणार्‍या समस्या मार्गी लावण्यासाठी, तसेच अगदी लहानात लहान गोष्टींचाही आनंद घ्या. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, असा सल्ला निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोशिएशनचे संस्थापक व मुख्य सल्लागार टी. के. चौधरी यांनी निवृत्त पोलीस कर्मचार्‍यांना शनिवारी दिला. नवी मुंबई, पनवेल येथील …

Read More »

आकुर्ली येथील काकाजिनी वाडीत रंगला ‘मेगा फॅशन इव्हेंट’

पनवेल : बातमीदार पनवेल येथील आयएनआयएफडीतर्फे आकुर्ली येथील काकाजिनी वाडीत 4 मे रोजी मेगा फॅशन इव्हेंट रंगला होता. या इव्हेंटला फॅशन डिझायनर, सिनेकलाकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले, कॉमेडी अभिनेता अली असगर, सेलिब्रिटी डिझायनर सलमान खानची वैयक्तिक स्टाइलिस्ट अ‍ॅशले रेबेलो, अँकर दिनेझ अहुजा, सिडकोचे अध्यक्ष प्रशांत …

Read More »

पनवेलमधील आदिवासी वाड्यांवर पाणीटंचाई ; टँकरने पाणीपुरवठा

पनवेल : बातमीदार उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. तालुक्यातील हालटेप, ताडाचा टेप या आदिवासी वाड्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर काही गाव व वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मागणी आलेली असून तसा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील वसाहतीत …

Read More »

ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांकडून भारतीय निवडणूक आयोगाच्या कामाची प्रशंसा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गेल्या काही काळापासून भारतात मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या ईव्हीएमबाबत सातत्याने शंका घेतल्या जात आहेत, मात्र  येथील निवडणूक आयोगाचे काम आणि ईव्हीएमची कार्यप्रणाली पाहून प्रभावित झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारतातील राजदूत हरिंदर सिद्धू यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि ईव्हीएमच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या …

Read More »