अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महाड तालुक्यात सर्वाधिक 22 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत उमदवरी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर होती. …
Read More »बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करा
रोहा ज्वेलर्स असोसिएशनचे मुख्याधिकार्यांना निवेदन रोहे : प्रतिनिधी शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करा, अशी मागणी रोहा-कोलाड ज्वेलर्स असोसिएशनने मंगळवारी (दि. 6) रोहा अष्टमी नगर परिषदच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली. रोह्यात नुकतेच ज्वेलर्सचे दुकान फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने सराफा व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. दरम्यान, …
Read More »मुरूडमध्ये चार सरपंच पदासाठी 13 तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 32 जागांसाठी 71 उमेदवार
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातील थेट सरपंच पदाकरिता 24 तर सदस्यपदासाठी 117 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी (दि. 7) अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी सरपंचपदाचे 11 तर सदस्य पदाचे 46 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. मुरूड तहसीलदार कार्यालयासमोरील दरबार हॉलमध्ये बुधवारी सकाळी …
Read More »शक्तिवर्धकाच्या शोधात…
ज्या महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ती महाविकास आघाडी आज ‘आहे आणि नाही’ अशा अवस्थेत तग धरून आहे. मुळात ही आघाडी केवळ सत्तेपुरती होती हे उघड आहे. सत्ता गेल्यानंतर ही आघाडी निरर्थक ठरल्यात जमा आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी नवी राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी …
Read More »कर्जत शहरातील विकासकामांचे आमदार थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील दहिवली परिसरात करण्यात आलेल्या सुमारे 36 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक संकेत भासे यांच्या माध्यमातून या सर्व विकासकामांच्या निधीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली विभागात छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, साईनगर गार्डन, …
Read More »नॅपकिन बुके नववर्ष टेबल कॅलेंडरचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठे येथील जननी ऑल इन स्टोअर दिग्दर्शित पर्यावरणपूरक नॅपकिन बुके नववर्ष टेबल कॅलेंडर तसेच बारा महिने-बारा सुविचार पोस्टरचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या उपक्रमांचे कौतुक केले. अतिशय कल्पकतेने बनविलेला हा नॅपकिन बुके प्रत्येक …
Read More »खारघर दारूबंदीचा विषय हिवाळी अधिवेशनात मांडणार
आमदार प्रशांत ठाकूर यांचे शिष्टमंडळाला आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त खारघरला दारूमुक्त शहराचा अधिकृत दर्जा देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करावा या मागणीसाठी संघर्ष समितीने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. दारूबंदीसाठी आग्रही असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी हा विषय हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्वासन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले. खारघर शहरातील …
Read More »भाजपमध्ये इनकमिंग!
वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंचांसह शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे व त्यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन वांगणी तर्फे वाजे ग्रामपंचायतीमधील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच, उपसरपंचांसह असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या ‘फ्लाईंग राणी’ची बाजी
ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्काराने सन्मान पनवेल ः नितीन देशमुख, हरेश साठे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवव्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत फ्लाइंग राणी (कलामंथन-ठाणे) या …
Read More »भाजप नेत्याच्या प्रयत्नामुळे बेपत्ता मुलगी सुखरूप सापडली
पनवेल : रामप्रहर वृत्त खतीजा सिद्दीकी ही अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने कळंबोलीमध्ये मोठी खळबळ माजली, परंतु ही बाब भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांच्या पाठपुराव्यानंतर चार दिवसांनी ही मुलगी सुखरूप सापडली. खतीजा ही 15 वर्षाची मतिमंद मुलगी कळंबोलीमधील कृष्णा टॉवरमध्ये कुटुंबासह राहते. तेथून खतीजा बेपत्ता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper