Breaking News

Ramprahar News Team

गणेशभक्तांचा परतीचा प्रवास होणार सुखकर 

7 ते 12 सप्टेंबरदरम्यान पनवेल-चिपळूण डेमू विशेष रेल्वेगाड्या धावणार रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सवात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान डेमू विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा परतीचा प्रवास सुखकारक होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागच्या वतीने देण्यात आली. मध्य …

Read More »

पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील पाली शहरात भटक्या व पिसाळलेल्या जखमी कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. पालीतील हटाळेश्वर चौक, बाजारपेठ, एसटी बसस्थानक, बँक ऑफ इंडियाजवळ तसेच सर्व आळ्यांमधील विशेषत: कचरा कुंड्यांजवळ मोकाट कुत्र्यांचा झुंडीत वावर असतो. एखादा पादचारी किंवा दुचाकी वाहन …

Read More »

पाली, रोहा, सुधागड, खालापुरात तुफान पाऊस

जनजीवन विस्कळीत; वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पाली : प्रतिनिधी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवीत सुधागड तालुक्यात बुधवारी (दि. 7) सायंकाळी वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तासनतास कोसळणार्‍या या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा गारवा दिला. सर्वत्र ढग दाटून …

Read More »

माणगावात चाकरमान्यांकडून ‘रेल रोको’

पोलिसांच्या मध्यस्थीने अखेर गाडी सोडली माणगाव ः प्रतिनिधी या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले होते. त्यामुळे सोमवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी (दि. 6) चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले. माणगांव रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने गर्दी व रेल्वेचे दार न उघडल्याने अनेकांना आरक्षण असूनही रेल्वेमध्ये …

Read More »

डॉ. बबन जाधव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार एसएमडीएल. कॉलेजचे प्रो. डॉ. बबन भिवसेन जाधव यांना देण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते पाच हजार रु. पारितोषिक, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याशिवाय त्यांना ज्ञानज्योती संस्थेचा ज्ञानभूषण पुरस्कारही मिळाला आहे. डॉ. जाधव यांनी आदर्श शिक्षकाच्या …

Read More »

उरण महाविद्यालयात फूड फेस्टिवल उत्साहात

उरण ः रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य, कला महाविद्यालयातील अजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने अन्नपूर्णा योजनेंतर्गत फूड फेस्टिवल आयोजित केला गेला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बळीराम एन. गायकवाड यांच्या हस्ते या फूड फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे, व्यवसायाला लागणारे भांडवल व त्यातून कशा पद्धतीने नफा …

Read More »

साई विभागातील ग्रामस्थ शिवसेना शिंदे गटात दाखल

माणगाव ः प्रतिनिधी साई विभागातील साई कोंड, विहुले व काकल गावातील तसेच आमडोशी व सुरव गाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्ते मंगळवारी (दि. 6) शिंदे गटाचे मुख्य प्रतोद तथा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहेत. या वेळी शिवसेना नेते अ‍ॅड. राजीव …

Read More »

पेणमधील बेकरीवर कारवाईचे आदेश

पेण ः प्रतिनिधी पेण शहरातील एका बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये उंदराची विष्ठा आढळल्याची घटना घडली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने बेकर्‍यांची पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश औषधे प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिले आहेत.पेण येथील अरविंद गुरव हे एका हॉटेलमध्ये सकाळी नाष्टा करण्यासाठी गेले असता तेथील पावामध्ये त्यांना उंदराची विष्टा आढळली. …

Read More »

पनवेल, उरणमध्ये गौरी गणपतींना भावपूर्ण निरोप

पनवेल : रामप्रहर वृत्त लाडक्या गणपतीबाप्पाची पाच दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर सोमवारी (दि. 5) पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देऊन त्याला निरोप देण्यात आला. शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानीही लाडका बप्पा विराजमान झाला होता. पाच दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर शिवाजीनगर येथील तलावामध्ये त्याचे भावपुर्ण वातावरणात विर्सजन …

Read More »

मिशन 150!

सहकुटुंब, सहपरिवार मुंबई दौर्‍यावर येऊन गेलेल्या अमित शाह यांच्या दौर्‍यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे संचारले असल्यास नवल नाही. कारण देवदर्शनाच्या मधल्या काळात त्यांनी भाजपचे कार्यकर्ते आणि आमदारांच्या गाठीभेटीही घेतल्या. मुंबई महापालिकेच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी सर्वस्व पणाला लावून दीडशेच्या वर जागा जिंकून दाखवाव्यात, असे स्फूर्तीदायक आवाहन …

Read More »