Breaking News

Ramprahar News Team

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले

विविध भागांत पूरसदृश्य स्थिती, जनजीवन विस्कळीत अलिबाग : प्रतिनिधी रायगडला बुधवारी (दि. 13) पावसाने पुन्हा झोडपले.   रायगडच्या मध्यभागात पावसाचा जोर होता. जिल्ह्याच्या काही भागात दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. कर्जत, खालापूर, पाली, नागोठणे, रोहा भागात दिवसभर जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नागोठणे …

Read More »

शिवाजीनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त शिवाजीनगर श्री. स. स. बाळकृष्ण महाराज माऊली मंदिरात गुरुपोर्णिमेनिमित्त व स्वानंद सुखनिवासी चांगू काना ठाकूर यांच्या तारखेनुसार पुण्यस्मरण दिनानिमित्त बुधवारी (दि. 13) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना शकुंतला रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिवाजीनर माऊली मंदिरात सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत …

Read More »

पनवेलमध्ये झाड कोसळले

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये बुधवारी (दि. 13) सकाळपासूनच तुफान पावसाने हजेरी लावली. मुसळधार पडत असलेल्या या पावसामुळे पनवेल शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट नंबर  येथे असलेले एक उंबराचे झाड मुळासकट कोसळले आहे. या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एक गाडी वर ते पडले असल्याने गाडीचे नुकसान झाले आहे, तसेच …

Read More »

उरणचे पाणीसंकट टळले; रानसई धरण ओसंडून वाहू लागले

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. बुधवारी (दि. 13) रानसई धरण ओसंडून वाहू लागले. याशिवाय 117.2 फूट एवढी …

Read More »

इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या अध्यक्षपदी साधना धारगळकर

पनवेल : वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या झालेल्या पदग्रहण समारंभात अध्यक्षपदी साधना धारगळकर यांची निवड झाली. सेक्रेटरीपदी ममता राजीवन, व्हाईस प्रेसीडेंटपदी डॉ.शितल फरांडे, खजिनदारपदी भूमिका परमार, आयएसओ लता शहा, एडीटर अर्चना राजे, जॉईंट सेक्रेटरी सिध्दी लोखंडे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर कल्पना कोठारी तर सल्लागार समितीमध्ये अरूणा आचरेकर, सिमा दाहेदार, प्रिती …

Read More »

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या प्रांतपालपदी डॉ. अनिल परमार

पनवेल : वार्ताहर रोटेरियन डॉ. अनिल परमार यांनी पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल म्हणून सुत्रे स्विकारली. मावळते प्रांतपाल रोटेरियन पंकज शहा ह्यांनी डॉ अनिल ह्यांना प्रांतपालपदाची कॉलर घातली. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, आंतरराष्ट्रीय रोटरी …

Read More »

पोलिसांकडून विद्यार्थ्यांना वह्यावाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाणे व ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या कांबे व चांभार्ली येथील शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम व विद्यार्थ्यांना पोलीस काका आणि पोलीस दीदी संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली. रायगड पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अ‍ॅड-मॅड शो स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने अ‍ॅड-मॅड शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा बुधवारी (दि.13) सकाळी 10 ते 1 च्यादरम्यान आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमधे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या विशिष्ट …

Read More »

सानपाड्यात आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करा -पांडुरंग आमले

नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोड येथील प्रभाग 30मधील रहीवाशांच्या माहितीसाठी आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. प्रभाग 30 मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर 12,2,7, 8,9, 10 (काही भाग), सेक्टर 11 ,15, 16, 16 …

Read More »

नवी मुंबईत पावसाचे थैमान

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गेल्या 24 तासांत नवी मुंबईत सरासरी 84.68 मिमी पाऊस झाला. यामुळे एपीएमसी मसाला मार्केट आणि महापे एमएसआरडीसी ते इंदिरा नगर येथील सखल भागात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापनच्या …

Read More »