Breaking News

Ramprahar News Team

पेण पानेड येथे एकाची हत्या; आरोपी अटकेत

पेण ः प्रतिनिधी तालुक्यातील पानेड आदिवासी वाडीवर कौटुंबिक वादातून एकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतले. पानेड येथील आदिवासी वाडीवर एका वीटभट्टीवर सोनी लाला पवार रा. कामार्ली व त्यांचे पती लाला गोपीनाथ पवार हे काम करतात. सोमवारी (दि. 21 मार्च) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लाला पवार त्यांच्या …

Read More »

कामावर उशिरा येणार्‍या तब्बल 191 कर्मचार्‍यांची वेतन कपात; नवी मुंबई मनपाची कारवाई

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या धर्तीवर पाच दिवसांचा आठवडा 26 फेब्रुवारी 2020 रोजीच्या महापालिका प्रशासन विभागाच्या परिपत्रकान्वये लागू करण्यात आलेला आहे तसेच कार्यालयीन वेळही निश्चित करून देण्यात आली आहे, मात्र ही वेळ न पाळल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने 191 कर्मचार्‍यांची वेतन कपात केली आहे. कार्यालयीन कामकाजाची …

Read More »

सिडको वसाहतींमधील पाणीसमस्येवर आढावा बैठक

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतली आयुक्तांची भेट पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. त्या पार्श्वभूमीवर खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, तळोजा या परिसरातील नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त गणेश देशमुख यांची मंगळवारी (दि. 22) …

Read More »

नैना प्रकल्पाबाबत नेमके नियोजन काय?; आमदार प्रसाद लाड यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई ः प्रतिनिधी नैना प्रकल्पात पनवेल, पेणसंदर्भात तेथील प्रकल्प व खासगी फॉरेस्टसंदर्भात कोणतीही स्पष्ट भूमिका नसल्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. प्रकल्पाच्या शाश्वत व सुनियोजित विकासाबाबत राज्य सरकारचे नेमके नियोजन काय आहे, असा प्रश्न  अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी (दि. 23) सभागृहात उपस्थित केला. आमदार प्रसाद लाड म्हणाले की, नैनाच्या …

Read More »

महिलांमधील गुण पुढे येण्याची गरज -मधु मंगेश कर्णिक

नेरुळ ः वार्ताहर आज सर्वच क्षेत्रात महिलाही आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडीत असून यास साहित्य क्षेत्रही अपवाद नाही, परंतु त्यांची ही गुणवत्ता प्रभावीपणे पुढे येताना दिसत नसल्याची खंत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी वाशी येथे व्यक्त केली. योगसाधिका शकुंतला निंबाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त योग विद्या निकेतन वाशी येथे कोकण मराठी साहित्य …

Read More »

अनामिका खिप्पल ठरल्या ‘मिसेस खारघर’

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव पनेवल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर व शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या पुढाकाराने 6 ते 20 मार्चदरम्यान आगरी कोळी महोत्सव-2022चे आयोजन करण्यात आले. या दरम्यान मिसेस खारघर स्पर्धा 19 व 20 …

Read More »

जुना ठाणा नाका परिसर झाला प्रकाशित

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील जुना ठाणा नाका येथील जान्हवी सोसायटीजवळ आरक्षित असलेल्या उद्यान परिसरात रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे भाजप नगरसेवक नितीन जयराम पाटील यांनी त्यांच्या निधीतून हायमास्ट दिवे बसवल्याने हा परिसर प्रकाशमान झाला आहे. जुना ठाणा नाका येथील जान्हवी सोसायटीजवळ सायंकाळनंतर खूप अंधार असतो. …

Read More »

महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना साहित्य

पनवेल महापालिका आणि ‘माविम’ यांचा संयुक्त उपक्रम पनवेल ः प्रतिनिधी कौशल्य विकासातून महिला  एक यशस्वी उद्योजिका म्हणून झेप घेऊ शकतात, असे प्रतिपादन नुकत्याच झालेल्या बचत गटाच्या कार्यक्रमात उपायुक्त कैलास गावडे यांनी केले. पनवेल महापालिका डेएनयुएलएम विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), युनाटेड वे, सक्षम फाउंडेशन, नवी मुंबई डेएनयुएलएम विभाग यांच्या …

Read More »

वाहतूक पोलिसांनी दिला अपंग व्यक्तीच्या सायकलला आधार

पनवेल : रामप्रहर वृत्त पोलीस म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे केवळ एक कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व. मात्र या पोलिसी वर्दीमध्ये एक मायाळू देवदूतदेखील दडला असल्याचा प्रत्यय पनवेलकरांना आला. मंगळवारी (दि. 22) संध्याकाळी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल पॉईंटजवळ आपले कर्तव्य निभावत असलेले पोलीस हवालदार गावडे यांना …

Read More »

नवीन पनवेलमध्ये निकृष्ट धान्याचे वाटप

नगरसेविका वृषाली वाघमारे आक्रमक; कारवाईची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील एका रेशनिंगच्या दुकानात निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप केल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. याबाबत महापालिका प्रभाग ड समिती सभापती व स्थानिक नगरसेविका वृषाली वाघमारे आक्रमक झाल्या असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कारवाई झाली नाही, तर …

Read More »