Breaking News

Ramprahar News Team

मोहोपाड्यातील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; पैशांची बॅग केली परत

मोहोपाडा ः प्रतिनिधी रिक्षाचालक आदम शेख यांनी चांभार्ली येथील कौतुभ जगताप यांची रस्त्यात पडलेली पैशाने भरलेली बॅग त्यांना परत केली. त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. कौतुभ जगताप यांचा दूध व्यवसाय असून ते चांभार्लीहून आपल्या स्कुटीवरून बँकेत पैसै भरणा करण्यासाठी रस्त्याने जात असताना त्यांच्या नकळत स्कुटीवरून बॅग खाली पडली. पुढे …

Read More »

सोनिया घरत आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

उरण ः रामप्रहर वृत्त आपला सरपंच आपला गौरव ग्रामपंचायतीच्या विकासात नवराष्ट्रची साथ या कार्यक्रमातंर्गत उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया मयूर घरत यांना सरपंच सम्राट पुरस्कार 2022ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनिया मयूर घरत …

Read More »

नवीन कोर्टसमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल ः वार्ताहर अमरधाम ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्णत्वाकडे आहे. या रस्त्याचे काँक्रीटीकरण झाल्यामुळे रस्त्याची उंची वाढली. त्यामुळे नवीन कोर्टकडे जाणार्‍या रस्त्याला उतार जास्त होता. तात्पुरता उपाय म्हणून दगड आणि माती टाकून रस्त्याला उतार देण्यात आला होता, पण रस्त्याची स्थिती खराब …

Read More »

वाढत्या उष्म्याने होतेय अंगाची लाही लाही!

आरोग्याच्या समस्या वाढल्या; पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा इशारा पनवेल ः रामप्रहर वृत्त मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच वाढलेल्या उष्णतेने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्यनारायण आग ओकत असल्याने अनेक जण बाहेर पडणे टाळतना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मात्र अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच पुन्हा सोमवारपासून …

Read More »

राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 14

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). —————   ————————————————   ———————————— 1. भारतातील सर्व विमान कंपन्यांकडे सध्या किती विमाने आहेत? अ.) 1010 …

Read More »

कर्जतमध्ये साजरा झाला जागतिक कविता दिन

कर्जत : प्रतिनिधी कर्जत ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे जागतिक कविता दिन साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी कविता, पोवाडे सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. संस्थेचे सभासद दिलीप गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार संस्थेने कर्जत येथे कवी संमेलन आयोजित केले होते. कर्जत शहरांत जागतिक कविता दिन पहिल्यांदा साजरा झाला. त्यात बळीराम दिघे, रघुनाथ …

Read More »

तैवान येथे पीएचडीकरिता जाणार्‍या विद्यार्थ्याला ‘सक्षम‘चा मदतीचा हात

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील किहीम गावातील वैभव तांबट या प्रतिभावान मुलाने पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. त्याकरीता तैवान येथील युनिव्हर्सिटीमध्ये त्यांची निवडदेखील झाली. सक्षम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रोत्साहनपर मदत म्हणून वैभव तांबट यांना राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. वैभव तांबट …

Read More »

मुरूडमध्ये 343 आदिवासी बालकांना पोषण पोटल्यांचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत अन्नदा-पोषण आणि विकास कृती संघटनेतर्फे व स्वामीराज फाउंडेशनच्या माध्यमातून मुरूड तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील कुपोषित आदिवासी बालकांना पाच किलोच्या 343 पोषण पोटल्यांचे वाटप  करण्यात आले. मुरूड पंचायत समितीच्या कै. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात झालेल्या या कार्याक्रमाला तहसीलदार रोहन शिंदे, …

Read More »

कर्जत रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाच्या गर्डरचा अडथळा दूर

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातील फलाट दोनवरील पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरच पूर्ण होऊन हा पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला होणार आहे. कर्जत रेल्वेस्थानकात फलाट दोनवर आठ वर्षांपूर्वी पादचारी पूल बांधण्यात आला होता, मात्र तो पुणे एन्डकडे असल्याने कर्जत स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांनी …

Read More »

माणगाव बाजारपेठेत स्वच्छता मोहीम; व्यापारी असोसिएशनने राबविले अभियान

माणगाव : प्रतिनिधी स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव  संकल्पना नजरेसमोर ठेवून येथील व्यापारी असोसिएशनतर्फे शुक्रवारी (दि. 25) सकाळी माणगाव शहरात स्वच्छता अभियान  राबविण्यात आले. या वेळी प्रामुख्याने बाजारपेठेतील रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. माणगाव व्यापारी असोसिएशन तर्फे शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन एसटी बस …

Read More »