Breaking News

Ramprahar News Team

मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करावी; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी; भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन

पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्याने आता राज्य सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. या संदर्भात भाजपच्या वतीने शुक्रवारी (दि. 12) तहसीलदारांना निवेदन देण्यात …

Read More »

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात पडसाद; अनेक शहरांमध्ये हिंसाचार, दगडफेक, तोडफोड

अमरावती ः प्रतिनिधी त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी (दि. 12) महाराष्ट्रात मोर्चे काढण्यात आले होते. त्याला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागून परिस्थिती तणावपूर्ण बनली. बांगलादेशात नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गापूजेचे काही मंडप उद्ध्वस्त करण्यात आले होते. त्याच रागातून त्रिपुरामध्ये हिंसाचार उसळला. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. अमरावतीत मुस्लीम बांधवांनी …

Read More »

संप सुरूच; एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम

मुंबई : एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी सेवा बंद आहे. कर्मचारी संप मागे घेण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर शुक्रवारी (दि. 12) एसटी महामंडळाने एक निवेदन प्रसिद्ध करीत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन संपकर्‍यांना केले आहे, मात्र एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर कर्मचारी ठाम …

Read More »

पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतात दिवाळीची सांगता

मुंबई ः प्रतिनिधी टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले आणि भारतात दिवाळी साजरी करण्यात आली. सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. त्यात पाकिस्तानची सुपर 12 फेरीत विजयी घोडदौड सुरूच होती. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये निराशेचे वातावरण होते, …

Read More »

कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा; विवेक प्रसाद भारताचा कर्णधार

भुवनेश्वर ः वृत्तसंस्था भुवनेश्वर येथे 24 नोव्हेंबरपासूर सुरू होणार्‍या एफआयएच कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी 18 सदस्यीय भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विवेक सागर प्रसाद करणार आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होणार आहेत. याआधी 2016मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकाविले होते. भारतीय संघात कर्णधार विवेक सागर …

Read More »

ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत; वेड-स्टॉइनिसच्या फटकेबाजीमुळे पाकिस्तावर मात

दुबई ः वृत्तसंस्था मॅथ्यू वेड (17 चेंडूंत नाबाद 41) आणि मार्कस स्टॉइनिस (31 चेंडूंत नाबाद 40) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाने गुरुवारी पाकिस्तानचा पाच गडी आणि सहा चेंडू राखून पराभव केला आणि दुसर्‍यांदा ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने दिलेले 177 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने 19 …

Read More »

महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धा लांबणीवर

इस्तंबूल ः वृत्तसंस्था टर्कीमध्ये होणारी महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत लांबणीवर पडली असून भारतीय संघात स्थान मिळण्यासाठी  महिला बॉक्सिंगपटूंना आता निवड चाचणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धा टर्कीतील इस्तंबूल शहरात या वर्षी 4 ते 18 डिसेंबरदरम्यान खेळवली जाणार होती, मात्र या शहरातील …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कानपूर येथे होणार्‍या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे, …

Read More »

संगीत मैफिलीने अलिबागकर मंत्रमुग्ध

अलिबाग ़: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड जिल्हा आणि सांस्कृतिक विभाग यांच्यातर्फे आयोजित दीपसंध्या या  कार्यक्रमात बुधवारी (दि. 10) सायंकाळी उदयोन्मुख गायक ओमकार प्रभुघाटे आणि कल्याणी शेट्ये यांनी  गाणी सादर करून अलिबागकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. अलिबाग येथील भाजप मुख्यालयासमोर या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला अलिबागकर रसिकांनी …

Read More »

महाविद्यालय प्रवेश देण्याच्या नावाखाली तीन लाखांची फसवणूक

खोपोली : प्रतिनिधी पॅरामेडीकल कोर्स करीता प्रवेश मिळवून देतो, असे सांगून एका भामट्याने सुमारे तीन लाख 26 हजार 980 रुपये उकळण्याची घटना खालापूर तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी एका महिलेच्या तक्रारीवरून फसवणूक करणारा आरोपी यासिन करीम शेख (रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

Read More »