Breaking News

Ramprahar News Team

अंगणवाडीच्या इमारतीचे न्हावाखाडीत उद्घाटन; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त न्हावाखाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा उद्घाटन सोहळा तसेच विविध साहित्यांचे वाटप सोहळ्याचे शनिवारी (दि. 4) आयोजित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या निधीमधून या अंगणवाडीचे काम करण्यात आले असून पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांनी केलेल्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाले …

Read More »

प्रकल्पग्रस्त कामगार जेएनपीटी बाहेर जाणार नाहीत -सुधीर घरत

उरण : वार्ताहर जेएनपीटीतील प्रकल्पग्रस्त कामगार पोर्ट बाहेर जाणार नाहीत. ते जेएनपीटीतच काम करतील, असे भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाचे राष्ट्रीय खजिनदार कामगार नेते सुधीर घरत यांनी म्हटले आहे.पॅरादिप (ओरिसा) येथे होत असलेल्या भारतीय पोर्ट अ‍ॅण्ड डॉक मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय कायकरिणीत जेएनपीटीच्या खाजगीकरणाबाबत घरत यांनी विचार व्यक्त केले. ते …

Read More »

शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल तालुक्यातील टावरवाडी व सतिचीवाडी येथील कार्यकर्त्यांनी समर्थकांसह शनिवारी (दि. 4) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. हौशाचीवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य संजय …

Read More »

गव्हाण विद्यालयात शिक्षक दिन, पालक सभा आणि सत्कार समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त शिक्षक दिन, पालक सभा व नवनिर्वाचित सरपंच-उपसरपंच यांचा सत्कार असा संयुक्त त्रिवेणी समारंभ येथील रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला. शिक्षक दिनाच्या पूर्व दिनी विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल …

Read More »

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर योग विषय आवश्यक विषय म्हणून घ्यावा; अखिल भारतीय योग शिक्षक महासंघांची मागणी; आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त नव्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषय हा माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर आवश्यक विषय म्हणून लागू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, असे निवेदन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष बहिरा यांनी दिले. या वेळी त्यांच्या सोबत अखिल भारतीय …

Read More »

संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर पनवेल मनपा सज्ज; आरोग्य विभागाची आढावा बैठक

पनवेल : प्रतिनिधी कोविडची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी तज्ज्ञांनी कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्याचे भाकित केले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवार (दि. 4) आयुक्त गणेश देशमुख यांनी वैद्यकिय आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या वेळी विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्टल डाके, सचिन पवार, …

Read More »

ग्रामीण भागातही कोविड लसीकरण सुविधा; गव्हाणच्या बेलपाडा येथे केंद्राचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तगव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने बेलपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शुक्रवारी (दि. 3) कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच …

Read More »

रोडपालीतील समस्या मार्गी लावा; अन्यथा आंदोलन!; भाजपचे सिडको अभियंत्यांना निवेदन

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोलीमधील रोडपाली सेक्टर 16, 17, 20मधील विविध समस्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी व ती कामे लवकरात लवकार पूर्ण करण्यासाठी कळंबोली भाजपतर्फे सिडकोला निवेदन देण्यात आले आहे. भाजप पदाधिकार्‍यांनी येथील सिडकोच्या ऑफीसमध्ये अभियंता बनकर यांची भेट घेतली. या वेळी कामे लवकरात लवकर करावी, असे त्यांना ठणकावून सांगण्यात आले. जर …

Read More »

ज्वेलर्स दुकानांची सुरक्षा धोक्यात!; पनवेल परिसरात दरोडे, लुटमारीच्या घटना

पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात ज्वेलर्स दुकानांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या दुकानांत दिवसाढवळ्याही चोर्‍या, दरोडे पडत आहेत. यामध्ये मालकांवर हल्ला करून दरोडेखोर दुकानांतील माल लुटून नेत असल्याच्या घटना वाढत असल्याने ज्वेलर्स दुकानांच्या मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना अशा सराईत चोरांना पकडण्याचे आव्हान असून यावर आळा घालण्यासाठी …

Read More »

शाळांचा घोळ सुरूच

राज्यात यापूर्वी 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यासंबंधातला जीआर काढण्यात आला होता, परंतु शिक्षण विभागाच्या त्या जीआरला सरकारनेच अटकाव केला. कोविड टास्क फोर्सने शाळा घाईने सुरू करू नयेत, अशी सूचना केल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. तो आता सप्टेंबर उजाडला तरी घेण्यात आलेला नाही. ग्रामीण भागात तसेच शहरांमधील आर्थिकदृष्ट्या …

Read More »