Breaking News

Ramprahar News Team

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे करण्यात येत असतात. त्यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून पाले बुद्रुक येथील पालेश्वरी मंदिर ते लक्ष्मण उलवेकर यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून वाकडी ते दुंदरे या …

Read More »

कोरोनावर ‘हेटेरो’च्या औषधाला डीसीजीआयकडून मंजुरी

नवी दिल्ली ः देशात कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलली जात आहेत. देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असून संसर्ग होऊ नये यासाठी सातत्याने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहनही केले जात आहे. कोरोनाच्या लढ्यात आता आणखी एक पाऊल भारताने टाकले आहे. भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने …

Read More »

निकम स्कूलचे वूशू स्पर्धेत यश

माणगाव ः प्रतिनिधी खारघर येथे झालेल्या जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत माणगावमधील एस. एस. निकम इंग्लिश स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये रूद्र चव्हाण, तनश्री सावंत, आयुष मोरे, प्रसाद मालोरे यांनी सुवर्णपदक पटकाविले, तर  अभिषेक पडळकर याने रौप्यपदक मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक मंदार चवरकर यांचे मार्गदर्शन लाभले. …

Read More »

दोरीउडी स्पर्धेत पेण संघ उपविजेता

पेण ः प्रतिनिधी पहिल्या मुंबई विभागीय दोरीउडी (जम्परोप) चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा जम्परोप असोसिएशन व पनवेल महापालिका जम्परोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील सुकापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या (यूएसकेए) खेळाडूंनी सहा सुवर्ण व पाच रौप्यपदके जिंकून उपविजेतेपद पटकाविले. 18 वर्षाखालील गटात …

Read More »

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड

पुणे ः प्रतिनिधी इंदापूर (जि. पुणे) येथे नुकतीच 23 वर्षाखालील फ्री-स्टाईल निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या   संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवड चाचणी स्पर्धेत पैलवान सौरभ इगवे, सुरज कोकाटे, सौरभ पाटील, रविराज चव्हाण, प्रथमेश गुरव, सुरज शेख , बाळू बोडके, ओंकार …

Read More »

रायगड प्रीमियर लीग : 446 खेळाडूंची लिलावात खरेदी

पनवेल ः रामप्रहर वृत्त आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीनिमित्त रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने अचानक मित्र मंडळ शिरढोण आयोजित बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगचा (आरपीएल) भव्यदिव्य लिलाव (ऑक्शन) सोहळा विसावा रिसॉर्टस् येथे झाला. या ऑक्शनसाठी रायगड जिल्ह्यातील तब्बल 2755 खेळाडूंनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी एकूण 446 खेळाडू …

Read More »

वन्यजीव संरक्षणासाठी मानवी साखळी; कर्नाळा अभयारण्य परिसरात प्राणीमित्र एकवटले

कळंबोली ः बातमीदारकर्नाळा अभयारण्यात परिसरातील अपघातांमध्ये अनेक माकडे व इतर वन्यजीवांचे नाहक बळी जात आहेत. या निष्पाप जिवांचे संरक्षण व्हावे यासाठी स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीवप्रेमींच्या वतीने रविवारी (दि. 5) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मानवी साखळी तयार करून अभयारण्य वन विभागासह राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या मानवी साखळीला प्राणीमित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …

Read More »

राजू शेट्टी यांचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

कोल्हापूर : प्रतिनिधीपूरग्रस्तांना तातडीने पुरेशी मदत देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (दि. 5) नृसिंहवाडीत जलसमाधी आंदोलन केले. या वेळी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीपात्रात उड्या मारल्या. त्यांना पोलिसांनी बोटींच्या सहायाने तातडीने बाहेर काढले. शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा यात्रेला सुरुवात केल्यानंतर …

Read More »

मंगळागौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; हिरकणी गु्रपने मारली बाजी

पनवेल ः रामप्रहर वृत्तसतत कामात व्यस्त असलेल्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि दोन घटका करमणूक व्हावी यासाठी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा पनवेल तालुका व शहर मंडलच्या वतीने रविवारी (दि. 5) मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक आणि चित्रा वाघ यांची …

Read More »

आगामी निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला लागा; आमदार प्रशांत ठाकूर यांची कार्यकर्त्यांना सूचना

खोपोली ः प्रतिनिधी आगामी पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जनहिताची जी कामे केली आहेत, कल्याणकारी योजना राबविल्यात त्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवावी, असे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 5) सूचित केले. खोपोली येथील पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. …

Read More »