Breaking News

Ramprahar News Team

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

पनवेल ःकेंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ना. कपिल पाटील यांचे स्वागत केले. महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर सोबत होते. काही दिवसांपूर्वीच ना. पाटील जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने …

Read More »

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्का; पीए मिलिंद नार्वेकर यांच्या अवैध बंगल्यावर हातोडा

दापोली ः प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक (पीए) मिलिंद नार्वेकर यांचा मुरूडमधील अवैध बंगला तोडण्याचे काम सुरू झाले आहे. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून हे बांधकाम केल्याचा आरोप नार्वेकर यांच्यावर करण्यात आलेला आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा मुद्दा जोरदारपणे उचलून धरलेला होता. दापोलीमधील मुरूडच्या समुद्र किनार्‍यावर …

Read More »

ना. नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज रायगडात झंझावात

महाड ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा आयोजित केलेली आहे. या अंतर्गत केंद्रीय केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे सोमवारी (दि. 23) रायगड जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ना. राणे हे दक्षिण रायगडात नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. केंद्रीय …

Read More »

कर्नाळा बँक ठेवीदारांनी मानले मोदी सरकारचे आभार; ठेवीदार संघर्ष समितीलाही धन्यवाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांना केंद्र सरकारच्या निर्णयानुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. याचा लाभ घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांनाही मिळणार आहे. त्यामुळे या ठेवीदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीला धन्यवाद दिले आहेत. …

Read More »

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी सज्जता

नवी दिल्ली ः देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, मात्र असे असले तरी कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता सरकारने आधीपासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण मोहिमेचा वेग …

Read More »

तालिबान्यांनी घेतली अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भेट

काबूल ः प्रतिनिधी तालिबानचा नेता अनस हक्कानीने शनिवारी अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीची भेट घेतली. या वेळी तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. रिपब्लिक वर्ल्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अनस हक्कानीने अफगाणिस्तान क्रिकेट संघातील सर्व सदस्यांशी आणि हशमतुल्लाह शाहिदीसह निवड मंडळाशी चर्चा केली. या बैठकीला …

Read More »

जोस बटलर आयपीएलबाहेर; राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का

जयपूर ः वृत्तसंस्था आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसला आहे. टीमचा प्रमुख खेळाडू आणि इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर पुढच्या महिन्यात यूएईमध्ये सुरू होणार्‍या 2021 हंगामाच्या दुसर्‍या टप्प्यामध्ये खेळणार नाही. बटलरने आपले नाव मागे घेतले आहे. तो आता दुसर्‍यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे आता त्याला कुटुंबासोबत अधिक वेळ …

Read More »

प्रतिकूल वातावरणावर मात करून अमित खत्रीचे रूपेरी यश

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमित खत्रीने जागतिक युवा (20 वर्षांखालील) अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमधील 10 हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेमधील भारताचे हे दुसरे पदक ठरले. समुद्रसपाटीपासून 1800 मीटर उंचीवर हे स्पर्धेचे ठिकाण असल्यामुळे तेथील वातावरणाचा अमितच्या कामगिरीवर परिणाम जाणवला. शर्यतीदरम्यान त्याला श्वासोच्छ्वासाचीही समस्या जाणवत होती, पण तरीही कारकीर्दीतील पहिल्याच …

Read More »

‘आरसीबी’ने केले मोठे बदल; तीन नवे खेळाडू संघात होणार दाखल

बंगळुरू ः वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंता चमीरा आणि ऑस्ट्रेलियाचा टिम डेव्हिड यांना करारबद्ध केले आहे. श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने भारतीय संघाविरोधात श्रीलंकेला टी-20 मालिकेत विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. आरसीबीने भारतीय संघाविरोधात चांगला खेळ करणार्‍या खेळाडूंना निवडण्याची परंपरा कायम …

Read More »

अमेरिकेत खेळण्यासाठी भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूची निवृत्ती; मनन शर्माचा भारतीय क्रिकेटला अलविदा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था दिल्लीचा अष्टपैलू क्रिकेटपटू मनन शर्मा याने भारतीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. चांगल्या संधींसाठी तो कॅलिफोर्नियाला जाणार आहे. माजी भारतीय खेळाडू अजय शर्मा यांचा मुलगा मनन याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विराट कोहली, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत यांच्यासह ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. 2017मध्ये दिल्लीत पदार्पण केल्यापासून मननने …

Read More »