Ramprahar News Team

घोटाळेबाज विवेक पाटील तुरुंगातच; आणखी सात दिवसांनी वाढला कारागृहातील मुक्काम

पनवेल ः कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम 12 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश सत्र न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे विवेक पाटलांचा मुक्काम सध्या तळोजा जेलमध्येच असणार आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत 5 ऑगस्ट रोजी पूर्ण होत असल्याने त्यांची गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत सुनावणी …

Read More »

भारताची कुस्तीपटू विनेश फोगट पराभूत

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने स्वीडनच्या सोफिया मेडालेना धोबीपछाड देत 53 किलो वजनी फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यानंतर काही वेळाने झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र विनेशला पराभवाला सामोरे जावे लागले. कुस्तीपटू विनेश फोगटने 53 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात …

Read More »

भारताने इतिहास रचला 41 वर्षांनी हॉकीमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये जर्मनीचा पराभव करीत कांस्यपदक जिंकले. तब्बल 41 वर्षांनंतर भारताला हॉकीमध्ये पदक मिळाले. अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने बलाढ्य जर्मनीचा 5-4ने पराभव केला. सामना अगदी शेवटच्या मिनिटामध्ये पोहचला तेव्हा जर्मनी भारताकडे असलेली एक गोलची आघाडी मोडून काढण्यासाठी …

Read More »

पूरग्रस्तांसाठी अखेर सरकारी मदत जाहीर

मुंबई ः प्रतिनिधी भाजपने सातत्याने लावून धरलेली मागणी आणि जनतेचा टाहो अखेर ठाकरे सरकारच्या कानापर्यंत पोहचला असून पूरग्रस्तांसाठी सरकारी मदत जाहीर करण्यात आली. पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने 11 हजार 500 कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (दि. 3) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात …

Read More »

फार्मा पार्कचा अहवाल राज्यपालांनी मागवला; शेतकर्‍यांच्या विरोधाची दखल

अलिबाग ः प्रतिनिधी मुरूड व रोहा तालुक्यातील प्रस्तावित फार्मा पार्कला स्थानिक शेतकर्‍यांचा विरोध आहे. याची दाखल घेऊन या प्रस्तावित फार्मा पार्कचा संपूर्ण अहवाल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांकडून मागवला आहे. प्रस्तावित फार्मा पार्कला परिसरातील भूमिपुत्रांचा विरोध आहे. याबाबत भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

ठाण्यात सूडबुद्धीने सुरू असलेली कारवाई थांबवा!; सर्वपक्षीय कृती समितीची महापौर, आयुक्तांकडे मागणी

ठाणे ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी करण्यात आलेल्या विराट सिडको भवन घेराव आंदोलनात सहभागी झालेल्या ठाण्यातील आगरी-कोळी बांधवांच्या घरे, बांधकामांवर महापालिकेने सूडबुद्धीने कारवाई सुरू केली आहे. पाडकामाची ही कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी लोकनेते दि. बा. पाटील …

Read More »

पनवेल ः शिक्षणप्रेमी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा नातू आदेश परेश ठाकूर याने सीबीएसई दहावीच्या निकालात 96.40 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. घराण्याची शैक्षणिक यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदेश याचे पेढा भरवून अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे ‘शंभरनंबरी’ यश

खारघर ः शिक्षणासोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने सीबीएसई दहावीच्या निकालात 100 टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे. स्कूलचे भाग्यश्री शरद सुरासे (99.80%), अर्णव मेश्राम (99.40%), जश मणियार (98.60%) आणि तेजस कदम (98.60%) हे चार विद्यार्थी गुणवत्ता …

Read More »

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 99.63 टक्के; कोकण विभाग अव्वल

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल मंगळवारी (दि. 3) जाहीर करण्यात आला. राज्याचा यंदाचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग (99.81 टक्के) पुन्हा अव्वल ठरला असून औरंगाबाद (99.34 टक्के) विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. कोरोनामुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती. …

Read More »

शरद पवारांनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (दि. 3) दिल्लीत देशाचे गृहमंत्री आणि पहिले केंद्रिय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या संदर्भात पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूनदेखील माहिती दिली. ही भेट नेमकी कशासाठी घेतली याविषयी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. या वेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »