Breaking News

Ramprahar News Team

माथेरानमधील 30 घोडे घेतले दत्तक; जॉकी संदेश आखाडे यांची सामाजिक बांधिलकी

कर्जत : बातमीदार थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे मात्र कोरोना महामारीमुळे माथेरान सध्या बंद आहे. लॉकडाऊन असल्याने या ठिकाणी पर्यटक येत नाहीत त्यामुळे येथील अश्व पालकांची आर्थिक घडी विस्कटली असून घोडे मालकांना आपला घोडा सांभाळायला कसा असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दरम्यान, प्रसिद्ध जॉकी माथेरानचा सुपुत्र असलेले …

Read More »

डम्पिंगग्राऊंडसाठी तातडीने जागा मिळावी; शिघ्रे ग्रामस्थांची मागणीय; घंटागाडी बंद असल्याने गावााच्या वेशीवर कचर्याचे साम्राज्य

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यांतील शिघ्रे ग्रामपंचायतीची कचरा गोळा करणारी घंटागाडी गेल्या पाच महिन्यांपासून बंद करण्यात आल्याने गावाच्या वेशीवरील गटारात मोठया प्रमाणावर  कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्याला उकिरड्याचे स्वरूप आले असून, ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने शिघ्रे ग्रामपंचायतीला डम्पिंगग्राऊंडची जागा …

Read More »

वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगावात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

माणगाव : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या शनिवार व रविवार दोन दिवसांच्या पाचव्या वीकेण्ड लॉकडाऊननंतर माणगाव बाजारपेठेत सोमवारी (दि. 3) सकाळपासून दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्यावर ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवार व रविवारी दोन दिवस माणगाव बाजारपेठेत शुकशुकाट होता. नेहमी गजबजलेली माणगावची बाजारपेठ सुनीसुनी वाटत होती. सोमवारी सकाळी …

Read More »

पराभवाचा सोहळा

पश्चिम बंगालमधील भाजपचा पराभव विरोधकांना इतका आनंदित करून गेला की या रणांगणामध्ये आपल्याकडील उरलेसुरलेदेखील गायब झाले आहेत याचेही भान विरोधकांना राहिले नाही. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत तब्बल 77 जागा जिंकल्या. गेली पाच वर्षे पश्चिम बंगालच्या विधानसभेत भाजपचे अवघे तीन आमदार होते. त्या तीनचे आता पाऊणशेच्या वर संख्याबळ झाले आहे. …

Read More »

कर्जतमध्ये लसीकरणासाठी प्रशासन सज्ज; वीस नवी लसीकरण केंद्र

कर्जत : बातमीदार कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यात लसीकरण केंद्रदेखील वाढविण्यात येत आहेत. लसीकरणासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. कोरोनाविषाणूंची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन‘ च्या माध्यमातून शासन, प्रशासनाने  लॉकडाऊन, संचारबंदी जाहीर करून कडक निर्बंध लागू केले आहेत.  त्यासोबतच नागरिकांना प्रतिबंधक लस देऊन …

Read More »

रोहा सुतारवाडी येथील गाड्या तोडफोडप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील पास्को कंपनीतील भंगारावरून रविवारी दुपारी सुतारवाडी येथे 11 चारचाकी गाड्या व सहा टेलरची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, घटना घडलेल्या सुतारवाडी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगीक वसाहतीमधील पोस्को …

Read More »

नेरळमधील मोठा रहिवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ शहरात कोरोना संक्रमीत रुग्ण सापडल्याने येथील काही रहिवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. या क्षेत्रात प्रवेश करण्यास व या क्षेत्रातील नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्राचे हे आदेश पुढील 28 दिवस लागू राहणार आहेत. कर्जत तालुक्यातील दुसरे मोठे शहर …

Read More »

जागतिक तापमान वाढ व हवामान बदल

भूशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीच्या तापमानात सातत्याने बदल होत आहेत. भूशास्त्रीय पुरावे सांगतात की, भूतकाळातील तापमानाचे स्वरूप सध्याच्या तापमानाच्या स्वरूपापेक्षा निराळे होते. काही ठिकाणी जास्त तापमान, तर काही ठिकाणी अगदी कमी असे ते होते, पण सध्या जी तापमान वाढ होत आहे ती खूप जलदगतीने होत असल्याचे दिसत आहे. नैसर्गिक घटनांमुळे होणार्‍या तापमान …

Read More »

महाविकास आघाडीला पंढरपूरमध्ये दे धक्का!; भाजपचे समाधान आवताडे विजयी

पंढरपूर ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीचे भगिरथ भालके यांचा 3716 मतांनी पराभव करीत हा मतदारसंघ भालके यांच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. गेली 11 वर्षे भगिरथ यांचे वडील आमदार भारत भालके या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत …

Read More »

पोस्को कंपनीच्या भंगारावरून सुतारवाडीत हाणामारी; 25 गाड्या फोडल्या, महाडचे आमदार गोगावले यांच्या मुलाच्या कारचाही समावेश

पाली ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागात विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आंतरराष्ट्रीय पास्को कंपनीतील भंगाराचा वाद उफाळून आला आहे. यावरून रविवारी (दि. 2) रोहा तालुक्यातील सुतारवाडीत हाणामारी होऊन अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोस्को कंपनीतून निघणारे भंगार कोण घेणार यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू …

Read More »