Breaking News

Ramprahar News Team

माथेरानमध्ये अश्वखाद्याचे वाटप; हायडॅक कंपनीतील कामगार-अधिकार्यांची घोडेवाल्यांना मदत

कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये पर्यटन व्यवसाय बंद असून पर्यटकांअभावी येथील घोड्यांची उपासमार होत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच  पनवेलमधील दानशूरांनी माथेरानमध्ये येऊन घोड्यांसाठी 250 बॅग भुसा (चारा) दिला. माथेरानमध्ये एकूण 460 घोडे असून त्याचा वाहतुकीसाठी वापर होतो. लॉकडाऊनमुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हायडॅक …

Read More »

जागेचा वाद विकोपाला; मुरूड पोलीस ठाण्यात 80 जणांवर गुन्हा दाखल; राजपुरी येथील घटना

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील राजपुरी येथील हरिदास बाणकोटकर यांच्या अंगणातील घराला लागणार्‍या साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार राजपुरी कोळीवाड्यातील 80 जणांवर मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हरिदास बाणकोटकर यांचे राजपुरी येथे घर असून तेथे ते त्यांची पत्नी व मुलांसह राहतात. त्यांनी आपल्या अंगणात घराला …

Read More »

महाडची आरोग्य यंत्रणा सक्षम कधी होणार?

महाड तालुका हा भौगोलिकदृष्ट्या आकाराने विस्तीर्ण तालुका आहे. तसेच याचा जवळपास 80 टक्के प्रदेश हा दुर्गम आणि डोंगराळ आहे. तालुक्यातील 134 ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये जवळपास 250 आदिवासी वाड्या-वस्त्या आहेत. सह्याद्रीच्या रांगेचा बहुतांश विस्तार महाड तालुक्यात पसरला आहे. तालुक्याच्या एका टोकाच्या गावातून महाडला यायला जवळपास 35 ते 40 किमीचे अंतर कापावे लागते. …

Read More »

पनवेलपेक्षा अलिबागमध्ये उपचाराधीन रुग्ण जास्त

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात कोरोनोबाधितांची संख्या घटण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात रविवारी (दि. 9) सलग तिसर्‍या दिवशी एक हजारहून कमी नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 तासांत तब्बल 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 908 जणांना कोरोनाची लागण झाली. सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 620वर पोहचली. दिवसभरात एक हजार 20 …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र सरकारकडून निधी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोना संकटात देशभरातील 25 राज्यांत असणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्र सरकारने दिलासा देत तब्बल 8923.8 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाकडून 25 राज्यांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरीत करण्यात आला असून, हा निधी गाव, तालुका आणि जिल्हा या पंचायतराजच्या तिन्ही स्तरांसाठी …

Read More »

निर्बंधामुळे रायगडातील पर्यटन व्यावसायिक संकटात

अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडल्याचे चित्र आहे.  कोरोनामुळे गेले वर्षभर राज्यात निर्बंध आहेत. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात टाळेबंदी लागू …

Read More »

करंजाडेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद ; आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. हा रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. अशाच प्रकारे करंजाडे नोडमध्ये श्री शैक्षणिक सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 9) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन वाढणार की संपणार?; आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहाता 4 एप्रिलपासून राज्य सरकारने करोनाबाबतचे निर्बंध लागू केले. राज्य सरकारने लावलेले हे कठोर निर्बंध 1 मे रोजी सकाळी 7 वाजता संपणार होते. त्यामुळे पुढे लॉकडाऊन असेल की नाही अशी चर्चा सुरू झाली होती, पण …

Read More »

लसीकरणावरून ‘मविआ’त वाद; काँग्रेस आमदाराचा शिवसेना मंत्र्याविरोधात संताप

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील लसीकरणावरून महाविकास आघाडीत कुरघोडीचे राजकारण दिसून येत आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी यांनी तर शिवसेनेला आता लसीकरणावरही राजकारण करणार आहात का, असा सवाल केलाय. त्यामुळे राज्यातील काँग्रेस आणि शिवसेनेत यांच्यातील वाद पुन्हा उभारून आला आहे. काँग्रेसचे वांद्रे येथील आमदार झिशान सिद्धिकी यांनी ट्विटरवरून शिवसेना नेते व …

Read More »

राणी रामपालसह सात हॉकीपटूंची कोरोनावर मात

बंगळुरू ः वृत्तसंस्था कर्णधार राणी रामपालसह भारतीय महिला हॉकी संघाच्या सात खेळाडूंनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे आता हे खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी उत्साहित आहेत. राणीसमवेत सविता पूनिया, शर्मिला देवी, रजनी, नवजोत कौर, नवनीत कौर आणि सुशीला यांच्यासह संघाचे व्हिडिओ विश्लेषक अमृत प्रकाश आणि वैज्ञानिक सल्लागार …

Read More »