Breaking News

Ramprahar News Team

नागरिकांच्या गर्दीने बँका फुलल्या

महाड ः प्रतिनिधी महाडमध्ये मागील काही दिवस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दोन दिवस सुटीचे गेल्याने सोमवारी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक दाखल झाल्याने शहरातील विविध बँकांमधून एकच गर्दी दिसून येत होती. या गर्दीचे शहरातील नागरिकांनी मात्र आश्चर्य व्यक्त केले. शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा कहर काही केल्या कमी झालेला नाही. …

Read More »

चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर

पाली ः प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवात चाकरमान्यांनी पाली-सुधागडात येण्याची तयारी दर्शविली आहे. अशातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानिमित्त पालीत येणार्‍या चाकरमान्यांसाठी ग्रुप ग्रामपंचायत पाली व कोरोना सनियंत्रण व दक्षता समितीने नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सवाकरिता गावी येणार असाल तर गावाकडे येऊन 10 दिवसांकरिता होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक आहे. गावाकडे होम क्वारंटाइन काळात शासनाने …

Read More »

राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून भोसले कुटुंबीयांचे सांत्वन

महाड ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड येथे त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले. महाड भाजपचे उपजिल्हाध्यक्ष राजेय भोसले हे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांचे विश्वासू निकटवर्तीय होते. रविवारी (दि. 2) मुंबई येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटमध्ये कोरोनावर उपचार …

Read More »

‘वंचित’चे डफली बजाव आंदोलन; लॉकडाऊन उठवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्याची मागणी

कर्जत ः बातमीदार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन उठविण्यात यावा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी डफली बजाव आंदोलन केले जात आहे. कर्जत तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नुकतेच एसटी आगारात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष …

Read More »

आणखी जोमाने लढू

मानव जमातीच्या कोरोनाविरोधी लढ्यात जागतिक स्तरावर बुधवारचा दिवस कितीही नाकारले तरी लक्षवेधी निश्चितच ठरणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी लसीच्या संदर्भातील घाई घातक असल्याचा इशारा दिला असला तरी रशियाने आपल्या कोरोनाविरोधी लसीची नोंद मंगळवारी केली आणि बुधवारपासून ही लस वितरित होणार आहे. आपल्या देशातही कोरोनाला पराभूत करण्यासाठी चंग …

Read More »

स्नेहलता साठे यांचे निधन

ठाणे ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता सदाशिव साठे यांचे ठाणे येथे कर्करोगाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, चित्रा मसलेकर या कन्या व मुलगा इंद्रजित साठे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चपला हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. चपलाआत्या म्हणून …

Read More »

पनवेल भाजपतर्फे कोविड योद्ध्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संकटकाळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणार्‍या आशा वर्कर, जिल्हा परिषद शिक्षक आणि जनतेला सहकार्य करणार्‍या गव्हाण ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक, तलाठी व कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र प्रदान करून मंगळवारी (दि. 11) सन्मानित …

Read More »

पनवेल तालुक्यात 205 नवीन कोरोनाबाधित; पाच जणांचा मृत्यू; 173 रुग्णांची संसर्गावर मात

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 11) कोरोनाचे 205 नवीन रुग्ण आढळले असून, पाच जणांचा  मृत्यू  झाला आहे, तर 173 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 179 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, चौघांचा मृत्यू झाला. 131 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. …

Read More »

पनवेल : भाजप महिला मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या निर्देशानुसार नगरसेविका व खारघर संपर्क प्रमुख दर्शना भोईर यांनी वृक्षारोपण केले. संध्या भगत, संखेताई, वंदना, भार्गवी पाटील आदी सोबत होत्या.

Read More »

कोसळलेल्या झाडांचे पुनर्रोपण

पनवेल ः बातमीदार मागील तीन-चार दिवस झालेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे नवी मुंबईतील अनेक ठिकाणच्या निसर्गसंपदेचे नुकसान झाले आहे. नेरूळ आणि बेलापूरच्या सीमेवर असलेल्या निसर्गसंपन्न पारसिक हिल टेकडीलाही याचा फटका बसला आहे. येथील मोठमोठे वृक्ष मुळासह उन्मळून पडले आहेत. त्या अनुषंगाने झाडांचे संगोपन करणार्‍या रहिवाशांनी ही निसर्गसंपदा वाचविण्यासाठी पुढाकार घेतला …

Read More »