Breaking News

Ramprahar News Team

स्फोटप्रकरणी कंपनीवर गुन्हा

खोपोली : प्रतिनिधी स्फोट होऊन दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी खोपोली येथील इंडिया स्टील कंपनीवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इंडिया स्टील कारखान्यात 14 जुलैच्या मध्यरात्री प्रचंड स्फोट होऊन दोन कामगारांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. सिलिंडरचा हा स्फोट इतका प्रचंड होता की विहारी, सिद्धार्थनगर …

Read More »

रायगड जिल्ह्यात गटारी जोरदार साजरी; मटण, चिकन खरेदीसाठी रांगा; सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली

माणगाव : प्रतिनिधी श्रावण महिन्यापूर्वी येणार्‍या गटारी अमावस्येचा उत्साह खवय्यांमध्ये यंदाही दिसून आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेला लॉकडाऊन अंशतः शिथिल झाल्याने अनेकांनी घराबाहेर पडत चिकन, मटण व अन्य मांसाहारी पदार्थ खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे दर वाढूनही लोकांनी खरेदीत कसर केली नाही, मात्र या वेळी काही ठिकाणी …

Read More »

महाविकास आघाडीतील पक्षांना झोपेच्या गोळ्या घेण्याची गरज; भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या संकटाबरोबरच इतर अनेक प्रश्न डोके वर काढताना दिसत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधार्‍यांमध्ये बेबनाव आहे. अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावताना झोपेच्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील राजकीय अस्थिरतेवर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना …

Read More »

कर्जतमध्ये जमावबंदी झुगारून पर्यटकांची गर्दी; धबधबे, धरणे गजबजली

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील धबधबे, धरणे आणि पाणवठे यांसारख्या पर्यटनस्थळांवरील बंदी झुगारून पर्यटकांनी रविवारी (दि. 19) गर्दी केली होती. या वेळी त्यांना कुणीच रोखले नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईपासून जवळ असल्याने व उपनगरीय लोकलची सुविधा असल्याने कर्जत तालुक्यातील वर्षाकालीन पर्यटनस्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. येथे शनिवार-रविवारी पर्यटकांचे …

Read More »

राम मंदिर उभारणीचा मुहूर्त ठरला? पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला भूमिपूजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या शनिवारी झालेल्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. राम मंदिर शुभारंभ सोहळ्याला 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून …

Read More »

देशात समूह संसर्ग; आयएमएचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव भारतातही दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या वर गेल्यानंतर समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती भयावह असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने दिला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार रविवारी (दि. 19) सकाळपर्यंत भारतात …

Read More »

हाहाकार! रायगडात 524 नवे रुग्ण; 17 जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या एका दिवसातील सर्वाधिक 524 रुग्णांची रविवारी (दि. 19) नोंद झाली असून, 17 जणांचा बळी गेला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 181 (महापालिका 139 व ग्रामीण 42), पेण 92, खालापूर 82, अलिबाग 71, रोहा 27, उरण 18, कर्जत 16, माणगाव व महाड प्रत्येकी 11, म्हसळा …

Read More »

पेणच्या गणेशमूर्ती उरणमध्ये दाखल

उरण : वार्ताहर गणपती बाप्पाचे आगमन थोड्या दिवसात होणार असून उरण शहरात पेणचे सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती उरणमध्ये दाखल झाल्या आहेत. कोरोनामुळे मूर्ती दुकानात पाहण्यापेक्षा मोबइल मधील व्हॉट्सअ‍ॅप द्वारे फोटो पाठवून गणेशभक्त गणेशाची मूर्ती पसंत करत आहेत, असे चित्र सर्वत्र पाहवयास आहेत. यंदा कमी उंचीच्या गणेशमूर्तींना मागणी जास्त आहे. उरण …

Read More »

‘कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे, वारंवार हात धुणे अनिवार्य’

पनवेल : प्रतिनिधी कोरोना हा जास्तीत जास्त ड्रॉपलेटमधून पसरू शकतो, तसेच आपण मास्क लावणे, हात वारंवार हॅण्डवॉशने धुणे, या गोष्टींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे असे टाटा हॉस्पिटलचे, हेल्थ फिजिशियन, डॉक्टर निलेश कांबळे यांनी श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेलच्या कॉफी आणि बरंच काही… सीझन तीन या …

Read More »

पनवेलसह नवी मुंबईमध्ये पावसाची संततधार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेलसह नवी मुंबई विभागात मागील दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पनवेलमध्ये दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे शहरात नागरिकांची वर्दळ कमी पहावयास मिळाली. तसेच नवी मुंबईत दोन ठिकाणी किरकोळ आगीच्या घटना घडल्या. पावसाळा सुरु झाल्यापासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 1061.12 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर पनवेल …

Read More »