Breaking News

Ramprahar News Team

अपघातात सात जण जखमी

पेण ः प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमटेम गावाजवळ एका कारने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या कारला धडक दिली. या अपघातात सात जण जखमी झाले आहेत. रविवारी वॅगन आर कारचालक मुंबई-गोवा महामार्गावर आमटेम गावाच्या हद्दीत आले असता मुंबईकडून येणार्‍या ईको फोर्ट कारचालकाने त्याची कार ओव्हरटेक करून राँग साइटला …

Read More »

श्रीवर्धन तालुका अंधारातच; वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज यंत्रणा प्रयत्नशील

श्रीवर्धन ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात अतोनात नुकसान झाले आहे. सर्वत्र विजेचे पोल पडल्याने येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक अडचणींमुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वादळ होऊन गेल्यानंतर बाराव्या दिवशीदेखील वीजपुरवठा नसल्याने श्रीवर्धन तालुक्यातील सर्व नागरिक अंधारातच राहत आहेत. 3 जूनला श्रीवर्धन समुद्र किनारपट्टीला निसर्ग …

Read More »

चविष्ट अन् लज्जतदार मुठ्यांना मागणी

पाली : प्रतिनिधी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्रातील मासेमारी बंद झाली आहे. सध्या चिकन, मटणाचे भावदेखील वधारले आहेत. अशा वेळी खेकडे (मुठे) खवय्यांना आकर्षित करीत आहेत. कोवळ्या गवतावर गुजराण करणारे आणि फक्त पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार्‍या चविष्ट आणि लज्जतदार मुठ्यांना मागणी वाढत आहे. पहिल्या पावसात उगवलेले कोवळे गवत खाण्यासाठी मुठे बाहेर पडतात. माळराण, …

Read More »

कर्जत तालुक्यात पोलीस, डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; एका दिवसात 11 रुग्णांची नोंद

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात रविवारी (दि. 14) कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले. यामध्ये पोलीस अधिकार्‍यांसह खासगी डॉक्टरचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या रुग्णांमुळे कर्जत तालुका अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. कर्जत तालुक्यातून नोकरीसाठी मुंबई आणि अन्य भागात जाणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्या संपर्कात …

Read More »

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी

पनवेल : भाजप युवा मोर्चा कामोठे मंडल अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी वाढदिवसानिमित्त रविवारी भानघर येथील करुणेश्वर वृद्धाश्रमात, चिपळे येथील ब्लेस फाऊंडेशन अनाथाश्रमात तसेच अ‍ॅमिन्यूअल अनाथाश्रमात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ब्लँकेट, फळवाटप केले. या वेळी भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, युवा नेते हॅप्पी सिंग, …

Read More »

कोरोनाविरुद्ध केंद्राने कंबर कसली; मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणार अधिक सुधारणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता राज्यांसह एकत्रितपणे मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अधिक सुधारणा करणार आहे. यानुसार ज्या शहरांमध्ये जास्त कोरोनाबाधित आहेत अथवा शेकडो हॉटस्पॉट्स आहेत अशा शहरांवर प्रामुख्याने लक्ष राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 14) घेतलेल्या समीक्षा बैठकीत हा …

Read More »

धक्कादायक! अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. 14) समोर आली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तो 34 वर्षांचा होता. करिअरच्या शिखरावर असताना त्याने उचललेल्या या पावलामुळे सर्वांना धक्का बसला आहे. सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली, असे …

Read More »

रायगडात तब्बल 81 नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 14) एकाच दिवसात कोरोनाच्या तब्बल 81 रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 44, पनवेल ग्रामीणमधील 13, कर्जत तालुक्यातील 10, अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी चार, उरण व माणगाव तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि मुरूड व तळा तालुक्यातील …

Read More »

उद्ध्वस्त कोकणवासीयांना राज्य सरकारने पाठबळ द्यावे; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भूमिका

माणगाव : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणवासीयांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. ती लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी नुकसानग्रस्तांना संकटकाळात सर्वतोपरी पाठबळ देणे आवश्यक असल्याची स्पष्ट भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि. 12) येथे मांडली. कोरोना या वैश्विक संकटाने त्रस्त असलेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यावासीय नैसर्गिक …

Read More »

रसायनीतील 12 रुग्ण कोरोनामुक्त

मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोना या विषाणूने सर्वत्र हाहाकार माजवला असताना रसायनी परिसरातही कोरोनाने शिरकाव करून भीती निर्माण केली होती, परंतु 12 रुग्णांनी धैर्य दाखवून या महामारीवर मात केली आहे. रसायनी-मोहोपाडा परिसरातील शिवनगरवाडीतील तीन, भटवाडी एक, श्रीहरी पार्क (हरिओम पार्क) दोन, रिस नवीन वसाहत-दुर्गामाता कॉलनी येथे दोन, दापिवली तीन आणि वावेघरमधील …

Read More »