Breaking News

Ramprahar News Team

रिक्षाचालक आर्थिक संकटात; उदरनिर्वाहाची चिंता; कुटुंबांवरही उपासमारीची वेळ

उरण : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे शासनाने पुकारलेल्या संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शहरासह तालुक्यातील सुमारे दोन हजाराच्या आसपास रिक्षांची चाके थांबली आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक रिक्षा कर्जावर घेतल्या आहेत. त्यामुळे त्या मालकांच्या संसाराचा गाडाही थांबला आहे. निम्मे रिक्षावर चालक आहेत. त्या दिवसाच्या भाड्याने दिल्या आहेत. त्यामुळे त्या रिक्षाचालकांवर तर उपासमारीची वेळ आली …

Read More »

उरणमध्ये कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण आढळल्याने खळबळ; पनवेल तालुक्यातही चार नवे कोरोनाग्रस्त

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर लॉकडाऊन सुरू केल्यापासून 19 दिवसानंतर उरणमध्ये रविवारी (दि. 12) एकदम दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यात उरण शहरातील हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आणि जेएनपीटी येथील सीआयएसएफ जवानाच्या पत्नीचा समावेश आहे. दोन्ही रुग्णांना ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने उरणमध्ये खळबळ उडाली आहे.  लॉकडाऊनमध्ये उरण तालुक्यातील क्वारंटाईन सेंटर व होम क्वारंटाईनमध्ये …

Read More »

दहावीची उर्वरित तर नववी, अकरावीची संपूर्ण परीक्षा रद्द

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. आता मात्र हा लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील नववी आणि अकरावीच्या परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय दहावीचे भूगोल आणि कार्यशिक्षण हे पेपरही रद्द करण्यात आले …

Read More »

मोहपाड्यातील रेशन दुकान भरारी पथकाकडून सील

खोपोली : प्रतिनिधी धान्यवाटपात अनियमितता केल्याने खालापूर तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने मोहोपाडा येथील दुकान क्र. 1ला सील ठोकले आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. भरारी पथकाने खालापूर तालुक्यातील दुकानांना भेटी देण्यास सुरुवात केल्यावर मोहपाडा दुकान क्र. 1 येथील पाटील यांच्या दुकानाची तपासणी केली असता, अनियमितता व रेशन कार्डव्यतिरिक्त धान्य …

Read More »

कोरोनाच्या लढ्यात आघाडीतील घटक पक्षांना आधी सहभागी करा!; चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटीलांना टोला

मुंबई : प्रतिनिधी ‘जयंतराव, कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हायचे आवाहन आम्हाला करण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचप्रमाणे तुमच्या आघाडी सरकारमधील सहकारी पक्षांना करा. त्याची गरज सगळ्यात जास्त आहे,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर नियुक्त सदस्य म्हणून नेमण्याची शिफारस …

Read More »

पनवेल महापालिका पुरवणार घरपोच धान्य, भाजीपाला, फळे

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना आता थेट घरपोच धान्य, भाजीपाला आणि फळे मिळणार आहे. रहिवाशांनी मागणी नोंद केल्यास त्यांना थेट शेतकरी विक्री योजनेमार्फत उपलब्धतेप्रमाणे भाजीपाला, फळे व धान्य घरपोच पुरविण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांनी घराबाहेर न पडता सर्वांना रास्त दरात …

Read More »

कर्जतमध्ये मिरची विक्री बंद; फेरीवाल्यांसह भाजीपाला बाजाराचे स्थलांतर

कर्जत : बातमीदार शहरातील महावीर पेठेमधील मिरची बाजार लॉकडाऊन काळात बंद राहणार आहे, तर बाजारपेठेतील फेरीवाले आणि फुटपाथवर भरविला जाणारा भाजीपाला बाजार उठविण्यात आला असून तो आता पोलीस मैदानात भरवला जाणार आहे. कर्जत शहरात खरेदीसाठी येणारे लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत शहरातील जागरूक नागरिकांकडून नगर परिषद …

Read More »

कळंबोलीत मॉर्निंग वॉक करणार्‍यांवर पुन्हा कारवाई; कोरोनाविरोधात लढण्याची 56 जणांना पोलिसांकडून शपथ

कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार कळंबोलीत मॉर्निंग वॉक करणार्‍या 35 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 12) पुन्हा 56 जणांना मॉर्निंग वॉक करीत असताना पोलिसांनी पकडून भा. दं. वी. कलम 188 अन्वये कारवाई केली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांना कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करून कोरोनाचा …

Read More »

श्रीवर्धनमध्ये लॉकडाऊन काळात मद्यविक्री; पाच लाखांची दारू जप्त

म्हसळा : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असताना ठेवण्यात आला असतानाही बेकायदेशीरपणे मद्यविक्री श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील हॉटेल साईश्री परमीट रूम व बारवर दिघी सागरी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तेथून पाच लाखांहून अधिक रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. बोर्ली पंचतन येथे कायद्याचे उल्लंघन करून मद्यविक्री केली जात …

Read More »

कोरोना : रायगड जिल्हा रेड झोनमध्ये

अलिबाग : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, 15पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्ट्यात समाविष्ट होतील. कोरोनाचे 15पेक्षा जास्त रूग्ण असल्याने रायगड जिल्हा रेड झोनच्या निकषात आहे. लॉकडाऊनसंदर्भात …

Read More »