Breaking News

Ramprahar News Team

अलिबाग ः महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या 129व्या जयंतीनिमित्त मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी निधी चौधरी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसीलदार (सर्वसाधारण) सतीश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारीही उपस्थित …

Read More »

म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींतील 10 हजार 369 घरांचे सर्वेक्षण पूर्ण

म्हसळा ः प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींमधील 10,369 घरांतून विविध निकषाने सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती पं. स. गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी वाय. एन. प्रभे यांनी दिली. तालुक्यातील आंबेत, रोहिणी, आडी, महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव (बु.) पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव (खुर्द), कणघर, लेप, कोळे, …

Read More »

कोरोनाच्या संशयावरून दमदाटी

पेण ः पेणमधील आनंदनगर येथे कोरोना प्रादुर्भावाच्या संशयावरून जमावाकडून एका दाम्पत्याला घराबाहेर काढून दमदाटी करण्यात आल्याची घटना घडली. रविवारी सकाळी फिर्यादी रा. आनंदनगर रामवाडी, पेण यांचे पती हे 25 मार्चपासून रजेवर होते. ते फिर्यादी राहत असलेल्या रामवाडी या ठिकाणी राहण्यास आले असता त्यांच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होईल असा गैरसमज करून सोसायटीत …

Read More »

रोह्यात पोलिसांचा रूट मार्च

रोहे ः देशभर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रोह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या टीमने सोमवारी सायंकाळी रूट मार्च काढला होता. संचारबंदीत पोलीस सतर्क असून सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, उपनिरीक्षक शेगडे, अडगळे यांसह तीन वाहतूक पोलीस, 25 रोहा पोलीस, …

Read More »

गावठी दारूविक्री, हातभट्टीचे गुन्हे दाखल

म्हसळा ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाऊन जारी केले असतानाही म्हसळा तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी येथे हातभट्टी रसायन तयार करणे आणि दारूविक्री करण्याबाबत दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. गु. र. नं. 13 व 14मध्ये फिर्यादी गणेश महादेव मुंडे 426 पो. कॉ. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र …

Read More »

मोगर्‍याचा सुगंध शेतातच; लॉकडाऊनमुळे फुले कोमेजली; उत्पादक चिंतेत

कर्जत ः बातमीदार एरवी केसांत माळला जाणारा गजरा असो की श्रद्धेने देवाला वाहिला जाणारा हार असो या सगळ्यांसाठी लागणारी फुले सध्या शेतातच सुकून जात आहेत. कोरोनाने जगभर घातलेल्या थैमानामुळे महाराष्ट्रातही 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी बाजारच बंद असल्याने शेतात फुलणारी फुले शेतातच कोमेजत आहेत. यामुळे फूल उत्पादक शेतकरी …

Read More »

पुढील धोरणाची दिशा

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मदत होत आहे, तेव्हा लॉकडाऊन वाढवायला हवा, असे मत देशातील बहुतेक मुख्यमंत्र्यांनी नोंदवले असले तरी पहिल्या लॉकडाऊनसारखाच हा दुसरा लॉकडाऊनही असेल की या वेळी काही वेगळे धोरण अनुसरले जाईल हे मोदीजींच्या मंगळवारच्या संदेशानंतरच स्पष्ट होऊ शकेल. भारतात कोरोना विषाणूचा फैलाव वाढू लागल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

शेतकर्‍यांचा माल थेट आपल्या दारात योजना सुरू; सोसायट्यांनी पालिकेच्या अ‍ॅपवर नोंदणी करण्याचे आवाहन

पनवेल : बातमीदार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता यावर पर्याय काढण्यासाठी पालिका प्रशासन अनेक युक्त्या आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन रात्रीचा दिवस करून काम करत आहे. या वेळी भाजी मंडईमध्ये होणारी …

Read More »

उद्योजक संजय नोगजा यांच्याकडून पत्रकारांना मदतीचा हात

पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या संकटाने व लॉकडाऊनमुळे सर्वजणच आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. पनवेल परिसरातील पत्रकारही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीतही कोरोनाची परिस्थिती रोजच्या रोज जनतेसमोर मांडण्याचे काम पत्रकार करीत आहेत. पत्रकारांची ही अडचण ओळखून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच माजी नगराध्यक्ष, उद्योगपती जे.एम. म्हात्रे यांनी मदतीचा हात …

Read More »

शेलू येथे नरेश मसणे यांच्याकडून धान्यवाटप

कर्जत : बातमीदार कर्जत तालुका पंचायत समितीचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे नरेश मसणे यांनी शेलू गावातील गरीब लोकांना धान्य वाटप करण्यात आले. शेलू गावातील रोजंदारी कामगार आणि विधवा महिला यांना मदत केल्याने त्यांना आधार मिळाला आहे. शेलू गावात घरोघरी जाऊन कर्जत पंचायत समितीचे सदस्य नरेश मसणे यांनी धान्य वाटप आयोजित …

Read More »