Ramprahar News Team

कळंबोलीत मॉर्निंग वॉक करणार्‍यांवर पुन्हा कारवाई; कोरोनाविरोधात लढण्याची 56 जणांना पोलिसांकडून शपथ

कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार कळंबोलीत मॉर्निंग वॉक करणार्‍या 35 नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि. 12) पुन्हा 56 जणांना मॉर्निंग वॉक करीत असताना पोलिसांनी पकडून भा. दं. वी. कलम 188 अन्वये कारवाई केली. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांना कळंबोली पोलीस ठाण्याच्या आवारात उभे करून कोरोनाचा …

Read More »

श्रीवर्धनमध्ये लॉकडाऊन काळात मद्यविक्री; पाच लाखांची दारू जप्त

म्हसळा : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन असताना ठेवण्यात आला असतानाही बेकायदेशीरपणे मद्यविक्री श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील हॉटेल साईश्री परमीट रूम व बारवर दिघी सागरी पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी तेथून पाच लाखांहून अधिक रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. बोर्ली पंचतन येथे कायद्याचे उल्लंघन करून मद्यविक्री केली जात …

Read More »

कोरोना : रायगड जिल्हा रेड झोनमध्ये

अलिबाग : प्रतिनिधी कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, 15पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्ट्यात समाविष्ट होतील. कोरोनाचे 15पेक्षा जास्त रूग्ण असल्याने रायगड जिल्हा रेड झोनच्या निकषात आहे. लॉकडाऊनसंदर्भात …

Read More »

नवी मुंबईच्या डॉक्टरला कोरोना; भावालाही लागण

नवी मुंबई : बातमीदार नेरूळ सेक्टर 8 येथे राहणार्‍या व मुंबईतील रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या संपर्कात आल्याने त्यांच्या भावालाही कोरोना संसर्ग झाला आहे, तर आई, वडील व बहाणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नेरूळ येथील डॉक्टरला मुंबईतील रुग्णालयात कार्यरत …

Read More »

चिंता वाढत आहे…

शुक्रवारी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या हजाराचा टप्पा ओलांडून 1007 इतकी झाली. गेल्या 24 तासांत देशाच्या या आर्थिक राजधानीत 218 नव्या रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे यापैकी 60 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाबाधेची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणजेच हे रुग्ण सायलेंट कॅरिअर्स आहेत. सगळ्यांच्याच दृष्टीने ही बाब चिंता वाढवणारी आहे. डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान …

Read More »

क्वारंटाइन नागरिकांसाठी नवी मुंबईत मानसोपचार कक्ष

नवी मुंबई : बातमीदार कोरोनामुळे आलेला तणाव दूर करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने मानसोपचार कक्षा स्थापन केला आहे. त्यानुसार नागरिकांना तज्ज्ञांशी संवाद साधता येणार आहे. कोविड -19 मानसोपचार कक्ष अशी संकल्पना आहे. या कक्षाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील मानसोपचार तज्ज्ञ कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांप्रमाणेच क्वारंटाइन असलेले नागरिक यांचे मनोबल वाढविण्याची महत्वाची भूमिका बजावणार …

Read More »

निरंकारी मिशनची गरजूंना मदत; पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये पाच कोटी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये 50 लाखांची मदत

मुंबई : प्रतिनिधी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशनचेप्रबंधक आणि सेवादार भक्तगण कोरोना विषाणूमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या देशभरातील लक्षावधीबंधु-भगिनींची सेवा करत आहेत. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्‍या अनेक कुटुंबांचे हाल होत आहे, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी  मिशनचे भक्तगण आणि सेवादल स्वयंसेवक मदत कार्यासाठी पुढे सरसावले …

Read More »

मास्क न लावता फिरणार्‍यांवर पनवेल पोलिसांकडून गुन्हा

पनवेल : वार्ताहर सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वांना मास्क लावून फिरणे आवश्यक आहे. असे असूनही पनवेलमध्ये काही नागरिक विना मास्कचे फिरताना  आढळून आल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शत्रुघ्न माळी व विजय …

Read More »

ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे खालापूर पोलिसांचे आवाहन

खोपोली ः बातमीदार कोरोना थोपवण्यासाठी डॉक्टरांच्या मदतीने पोलीस खातेही मोलाची भूमिका व कर्तव्य बजावित आहेत. आयएसओ प्रमाणपत्रधारक असा नावलौकिक असलेल्या खालापूर पोलीस  ठाण्याची सध्या लौकिकास साजेशी कामगिरी होत आहे. लाठीचा वापर न करता लॉकडाऊनचे महत्त्व नागरिकांच्या मनावर बिंबविण्यात पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी यश मिळविले आहे. तसेच त्यांनी ऑनलाइन फसवणुकीपासून …

Read More »

माथेरान घाटात 100हून अधिक मजूर अडकले; निवारा केंद्राचा तात्पुरता आधार

कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये एमएमआरडीएची आणि रेल्वेची कामे करण्यासाठी मजुरांना आणण्यात आले होते. त्यातील रेल्वेची कामे करण्यासाठी आलेले मजूर सध्या नेरळ-माथेरान घाटातील जुम्मापट्टी येथे अडकून पडले आहेत. नेरळ ग्रामपंचायतीकडून त्यांना तात्पुरता निवारा आणि धान्य देण्यात आले आहे, मात्र त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा अद्याप पोहोचली नाही. त्यामुळे येत्या दिवसांत त्यांची उपासमार होण्याची …

Read More »