Ramprahar News Team

ऑनलाइन नोंदणी न झालेले रेशन कार्डधारक धान्यापासून वंचित

अलिबाग : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील रेशन दुकानावर 1 एप्रिलपासून तीन महिन्यांचे एकत्रित धान्य मिळेल असे आधी सांगण्यात आले, मात्र बारकोड नसलेल्या आणि ऑनलाइन नोंदणी न केलेल्या रेशन कार्डधारकांना धान्य दिले जात नाहीए. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने अंत्योदय आणि केशरी रेशन कार्डधारकांना कार्डावर बारकोड देण्याची सुविधा केली …

Read More »

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले माणगाव

माणगाव ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला माणगाव तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानुसार रविवारी (दि. 5) एक दिवा स्वतःसाठी, देशाच्या हितासाठी अशी मनोधारणा करून एकता दाखवत लक्ष लक्ष दिव्यांनी संपूर्ण माणगावनगरीसह तालुका उजळून निघाला होता. कोरोनाच्या महामारीतून जनतेची लवकर सुटका व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध युक्त्या …

Read More »

कर्जतमध्ये महावीर जयंती साधेपणाने साजरी

कर्जत ः प्रतिनिधी जगभरात कोरोनाचे संकट पसरल्याने कर्जतमध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणारी श्री महावीर जयंती यंदा सोमवारी (दि. 6) जैन बांधवांनी केवळ महावीरांचे दर्शन घेऊन अत्यंत साधेपणाने साजरी केली. इतिहासात पहिल्यांदाच येथील मिरवणूक रद्द करण्यात आली. श्री महावीर जयंती म्हणजे जैन धर्मियांचा एकप्रकारे सणच आहे. सकाळपासूनच जैन मंदिरात …

Read More »

ट्रान्सफार्मरला आग; वीजपुरवठा खंडित

खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीतील खालची खोपोली अमरधामजवळील विजेच्या ट्रान्सफार्मरला सोमवारी (दि. 6) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. परिसरात सुके गवत व अन्य साहित्य असल्याने ही आग पसरली. आग आटोक्यात आणण्यासाठी वीज वितरणचे अधिकारी व खोपोली अग्निशमन दलाने मेहनत घेतली. दरम्यान, यामुळे संपूर्ण खोपोली शहरातील वीजपुरवठा एक तासासाठी खंडित झाला …

Read More »

आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; मुस्लिम समाजाचा पुढाकार

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे  गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे माणगावमधील मोर्बा येथील मुस्लिम समाज बांधवांनी लक्ष केंद्रित करून परिसरातील सात आदिवासी वाड्यांतील 500 कुटुंबांना साधारण 450 रुपये किमतीचे कांदा, बटाटा, दोन प्रकारच्या डाळी, तेल, साखर, चहा पावडर, मिरची पावडर, मीठ असे एका कुटुंबाला कमीत कमी आठवडाभर …

Read More »

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍यांना पोलिसांचा इशारा

पेण ः प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढत असून  जिल्ह्यातही अनेक ठिकाणी प्रसार होत आहे, परंतु पेणकरांना यांचे गांभीर्य दिसत नसून अनेक ठिकाणी नागरिक गर्दी करून संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. परिणामी आता मलाच रस्त्यावर उतरावे लागल्याची प्रतिक्रिया पेणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव यांनी दिली. कोरोनासारख्या जीवघेण्या आजराशी मुकाबला …

Read More »

सोशल डिस्टन्सिंगसाठी नागाव ग्रामपंचायत आग्रही

रेवदंडा ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागाव ग्रामपंचायत सरपंच निखिल मयेकर मित्र मंडळाच्या सहकार्याने सोशल डिस्टन्सिंगसाठी आग्रही असून ग्रामस्थांना रेशनिंग धान्याचे वॉर्डमधील चौकाचौकात वाटप करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा आग्रह धरण्यात आला. तीन किलो तांदूळ व दोन किलो गव्हाचे वाटप रेशनिंगमार्फत करण्यात आले.

Read More »

अनेकांनी पायपीट करीत गाठले मुरूड; स्वतःहून आरोग्य तपासणीस सहकार्य

मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील असंख्य नागरिक नोकरीसाठी मुंबई व पनवेल येथे कार्यरत आहेत. मुंबईपासून मुरूडचे अंतर 160 किलोमीटर आहे, परंतु लॉकडाऊन जाहीर होण्याआधी काही विशेष कामासाठी गेलेले नागरिक व नोकरीसाठी असलेल्या नागरिकांची कोंडी झाली आहे. फक्त घरात बसून या सर्वांनी काही दिवस घालवले, परंतु नंतर अस्वस्थ होऊन तालुक्यातील अनेकांनी पायी …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून कोरोना निर्जंतुकीकरण कक्षाची पाहणी

पेण ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण न. प.च्या वतीने न. प.समोरील रस्त्यावर निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी केले आहे. न. प.च्या वतीने उभारण्यात आलेल्या निर्जंतुकीकरण कक्षामधून स्वतः चालत जाऊन याचा लाभ घेत आमदार रविशेठ पाटील यांनी या कक्षाची …

Read More »

सोल्वे ग्रुपकडून 1800 लिटर हॅण्डवॉश

अलिबाग ः जिमाका सोल्वे ग्रुप रोहा यांच्याकडून नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासनास सहकार्य म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे पाच लिटरच्या 360 बॉटल्स याप्रमाणे एकूण 1800 लिटर हॅण्डवॉश सुपूर्द करण्यात आले. या वेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, सोल्वे कंपनीचे …

Read More »