Breaking News

Ramprahar News Team

कोरोनामुळे फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू

माद्रिद : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याला वयाच्या 21 व्या वर्षी प्राण गमवावे लागले आहेत. मलागा येथील अ‍ॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत 2016पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. कोरोनाने जगभरात भीतीचे वातावरण तयार केले आहे. फक्त सामान्य नागरिक नव्हे, तर अनेक देशांतील राजकीय नेते आणि …

Read More »

कोरोनाचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी; राज्याला 15 दिवस जकिरीचे; शाळा-महाविद्यालयांसह निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई : प्रतिनिधी  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, त्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी आणि पावले उचलण्यात येत आहेत. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने …

Read More »

कोरोनामुळे महाड चवदार तळे सत्याग्रहाचे सर्व कार्यक्रम रद्द

महाड ः प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या 20 मार्च रोजी होणारा महाडमधील चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय सोमवारी (दि. 16) महाड प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला बौद्धजन पंचायत समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व गटाचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे आंबेडकर चवळवळींतील …

Read More »

राज्यपालांचा कमलनाथांना अल्टिमेटम; आजच बहुमत सिद्ध करा

भोपाळ ः वृत्तसंस्था कमलनाथ सरकारची सोमवार बहुमत चाचणी होऊ न शकल्याने भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवराज सिंह चौहान यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणीही होणार आहे, परंतु आता मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मंगळवारी …

Read More »

महिलांसाठी आयोजित कार्यक्रम रद्द

पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी भाजप पनवेल तालुका व शहर मंडल महिला मोर्चा व श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 17) दुपारी 3 वाजता श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड, पनवेल येथे आयोजित कार्यक्रम तूर्तास रद्द करण्यात आला …

Read More »

निर्भयाच्या दोषींची आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव

नवी दिल्ली ः निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तिघा दोषींनी आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आहे. फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता या तिघांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका दाखल केली आहे. दिल्ली न्यायालयाने चारही आरोपींना …

Read More »

पनवेल ः पायोनीयर सोसायटी परिसरात नव्याने सुरू झालेल्या गुळाच्या चहाच्या दुकानाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या दुकानाचे मालक भाजपचे जिल्हा सरचिटणीस नयन साबळे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका सभागृह नेते …

Read More »

खांदा कॉलनी : भाजप युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रोहित जगताप यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी  यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबत तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक नितीन पाटील, विनोद साबळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर आदी. (छाया …

Read More »

अश्विनी मयेकरला पॉवर लिफ्टिंमध्ये सुवर्णपदक

अलिबाग ः प्रतिनिधी बिहार राज्यातील पटना येथे अखिल भारतीय नागरी सेवा पॉवर लिफटींग स्पर्धा 4 ते 8 मार्च या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत पेण तालुका क्रीडा अधिकारी अंकिता अशोक मयेकर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. बिहार आणि हरियाणाच्या खेळाडूंना मागे टाकत अंकिता मयेकर यांनी 277 किलो इतके वजन उचलून सुवर्णपदक …

Read More »

फ्रेंड्स ग्रुप साई क्रिकेट संघाला अंतिम विजेतेपद

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव येथील मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स ग्रुप साई संघाने अंतिम सामन्यात स्पार्टन माणगाव संघावर मात करीत अंतिम विजेतेपद मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस 10 हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला. येथील माणगाव क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नवयुवक मित्रमंडळ खांदाड   माणगावतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. माणगावातील लोणशी …

Read More »