अलिबाग : प्रतिनिधी येस बँकेवर आरबीआय निर्बंध लादल्याने काही सहकारी बँकांनाही याचा फटका बसला आहे, परंतु रायगड जिल्ह्यातील एकही पतसंस्थेचे पैसे येस बँकेत अडकलेले नाहीत, अशी माहिती रायगड जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली. ज्या आर्थिक संस्थांच्या ठेवी येस बँकेत आहेत त्या अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे सहकारी बँका व पतसंस्थांच्या ठेवींची …
Read More »कोरोना संसर्गाबाबत पनवेल पालिकेतर्फे जाहीर आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे व आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी संयुक्तपणे पुढीलप्रमाणे जाहीर आवाहन केले आहे. साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा, शिंकताना …
Read More »पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अशोक तेजे बिनविरोध
पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील पळस्पे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे अशोक तेेजे यांची शुक्रवारी (दि. 13) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अजय तेजे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी पळस्पे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत भोईर, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सदस्य …
Read More »पीडितेला न्याय मिळण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार; महिला प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांचा रोह्यात निर्धार
रोहा : प्रतिनिधी रोहे अष्टमी येथे 28 फेब्रुवारी रोजी घडलेली घटना, ती घटना दाबण्याचा प्रशासकीय पातळीवर झालेला प्रयत्न याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून आमच्यासाठी हे राजकीय आंदोलन नाही तर पीडीतेच्या न्याय हक्काची लढाई आहे व आम्ही हा मुद्दा सभागृहात व सभागृहाच्या बाहेर पिडितेला न्याय मिळेपर्यंत ताकदीने लाऊन धरणार असल्याचे …
Read More »कॅन्सर जागरूकता व तपासणी शिबिरास प्रतिसाद
पनवेल : बातमीदार जागतिक महिला दिनानिमित्त सीआरपीएफ कॅम्प तळोजा मुंबई, अखिल भारतीय स्त्री रोगतज्ञ संघटना, अखिल महाराष्ट्र स्त्री रोगतज्ञ संघटना, नवी मुंबई स्त्री रोगतज्ञ संघटना, रायगड स्त्री रोगतज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सीआरपीएफ पोलीस पत्नी, महिला पोलीस अधिकारी व कर्मचार्यांकरिता कर्करोग निदान व जनजागृती शिबिराचे आयोजन सीआरपीएफ तळोजा मुंबई येथे …
Read More »अबोली महिला रिक्षाचालकांचा सत्कार
पनवेल : वार्ताहर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट पनवेल येथील शाखेत महिला दिनाचे औचित्य साधून अबोली महिला रिक्षाचालक तसेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या महिला कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला. अबोली संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष शालिनी गुरव, सचिव विलास मोरे, खजिनदार ललिता राउत, सह खजिनदार सुनीता जाधव तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कोहिनूर …
Read More »आदई येथे फॅशन शो रंगला
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त आदई येथील अष्टविनायक गृह संकुलामध्ये जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सोसायटीतील महिलांनी केले. सोसायटीतील महिलांनी वक्तृत्व, अभिनय, नृत्य, गीत गायन आदी कलाविष्कार सादर करून उपस्थितीना मंत्रमुग्ध केले. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. त्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके …
Read More »कामोठे पोलीस ठाण्यात महिला दिन
पनवेल : वार्ताहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे यांनी पोलीस ठाण्यात महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे कौतुक केले. या वेळी महिला दक्षता समितीच्या सदस्या, सामाजिक संस्थांच्या महिला पदाधिकारी, स्थानिक महिला उपस्थित होत्या. महिलांनी सुशिक्षित व सक्षम झाले पाहिजे तसेच समाजात आपले कर्तृत्व दाखवून …
Read More »महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील बारवई गावातील महिलांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ यांनी विशेष बैठक घेवून त्यांना कायद्यातील तरतुदी व घ्यावयाची सुरक्षितता या संदर्भात मार्गदर्शन केले. महिला दिनाचे औचित्य साधून बारवई गावातील महिला वर्गाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये 35 …
Read More »चिरनेरमध्ये नाल्याच्या कामाला सुरुवात
चिरनेर : रामप्रहर वृत्त दरवर्षी चिरनेर गावाला पुरपरिस्थिला कारणीभूत ठरत असलेल्या मध्यवर्ती मुख्य नाल्याचे खोलीकरण, रूंदीकरण, बांधबंदिस्थी आणि मजबूतीकरणाच्या कामाला जोरदारपणे सुरूवात झाली आहे. शासनाच्या आपात्कालीन यंत्रणेकडून या ओढयाची पहाणी करून देेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना आमदार महेश बालदी व भाजपचे ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश फोफेरकर यांच्या प्रयत्नातून एमएमआरडीएने या नाल्याच्या कामासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper