Ramprahar News Team

ई-टॉयलेट्सला महाडकरांची नापसंती ; वापराचे ज्ञान नसल्याने अडचणी

महाड ः प्रतिनिधी महाड नगरपालिकेने महाड व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी उभारलेल्या ई-टॉयलेट्सला सध्यातरी नागरिकांनी नापसंती दर्शवली आहे. त्यातच वापराचे ज्ञान नसल्याने, तसेच आत अडकण्याच्या घटना घडल्याने अनेक जण भीतीने याचा वापर करीत नाहीत. त्यातच या ई-टॉयलेट्सची जागादेखील चुकली असल्याचे नागरिक सांगत आहेत. महाड नगरपालिकेने स्वच्छता अभियानात उत्तम कामगिरी केल्यानंतर देशामध्ये …

Read More »

‘भारत की लक्ष्मी’ अभियान राबवा; मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ’सेल्फी विथ डॉटर’च्या धर्तीवर ’भारत की लक्ष्मी’ अभियान चालवण्याचे आवाहन केले. आपल्या कुटुंबात, समाजात अशा अनेक मुली असतील ज्या त्यांच्याकडे असलेल्या कौशल्याने देशाचे नाव उज्ज्वल करतात. या दिवाळीत अशा लक्ष्मींचा सन्मान करू या. ’भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून तुम्ही …

Read More »

राणेंचा बुधवारी भाजपप्रवेश?

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर नारायण राणेंच्या भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती समोर आली. नारायण राणे येत्या 2 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. काही कारणास्तव अनेकदा हा प्रवेश पुढे ढकलला गेला. आता अखेर …

Read More »

माथेरानमध्ये पर्यटक तरुणीचे स्वतःवरच वार

कर्जत ः बातमीदार माथेरानमधील एका हॉटेलमध्ये पर्यटक म्हणून आलेली 30 वर्षीय आशा रामकुमार लोध (रा. नेहरूनगर, घाटकोपर, मूळची रहिवासी कानपूर) हिने स्वत:वर धारदार चाकूने वार करून घेतल्याने तिला जखमी अवस्थेत असल्यानेे स्थानिक नागरिक सॅबी रीझारीओ यांनी माथेरान पोलिसांना कळविले.  उपचारासाठी माथेरान पोलिसांनी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तिला बी. जे. हॉस्पिटल …

Read More »

पनवेल भाजपमय ः रामशेठ ठाकूर ; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

कळंबोली ः रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांमुळे पनवेलमधील सर्व वातावरण भाजपमय झाले असून त्यांच्या विरोधात कोणी उभे राहायला तयार नाही. जसे देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र तसे पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर असे समीकरण बनले आहे. कोणतीही जबाबदारी ते सक्षमपणे पेलणारे आहेत, म्हणूनच देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांच्याकडे सिडकोसारख्या महामंडळाची जबाबदारी …

Read More »

मोठा खांदा येथेही शेकापला जोरदार झटका

पनवेल ः रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या कारभाराला कंटाळून मोठा खांद्यातील शेकाप कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 29) भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला असून या पक्षप्रवेशाने शेकापच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेकापचे गुरुनाथ दुन्द्रेकर, मीनानाथ भगत, सुरेश भगत, मोरेश्वर भगत, विलीन दुन्द्रेकर, राहुल दुन्द्रेकर, भाई भगत, पंडित भगत, वैभव दुन्द्रेकर, अक्षय भगत, …

Read More »

हिज्बुलचा म्होरक्या ओसामासह तिघे ठार

नवी दिल्ली : भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका पदाधिकार्‍याच्या हत्येच्या प्रकरणात वाँटेड असलेल्या हिज्बुल मुजाहिदीनच्या प्रमुख कमांडरचा सुरक्षा दलाने रामबन जिल्ह्यातील चकमकीत खात्मा केला. ओसामा आणि त्याचे सहकारी जाहिद आणि फारुख अशी या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात शनिवारी ही चकमक …

Read More »

भारतीय पुरुष संघाचा स्पेनवर दणदणीत विजय

अँटवर्प (बेल्जियम) : वृत्तसंस्था ‘ड्रॅगफ्लिकर’ हरमनप्रीत सिंग याच्या दोन गोलमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियम दौर्‍यातील दुसर्‍या सामन्यात जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या स्पेनवर 6-1 असा दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत (28व्या आणि 32व्या मिनिटाला), कर्णधार मनप्रीत सिंग (24व्या मिनिटाला), निळकंठ शर्मा (39व्या मिनिटाला), मनदीप सिंग (56व्या मिनिटाला) आणि रुपिंदरपाल सिंग …

Read More »

गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांची मुंबई विभागावर निवड

उरण ः प्रतिनिधी अलिबाग येथे 28 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय आष्टेडो आखाडा स्पर्धेत विविध वयोगटात गोशीन रियू कराटेच्या सुयश म्हात्रे, विनया पाटील, समीक्षा पाटील, तन्वी म्हात्रे, सेजल पाटील, कल्याणी म्हात्रे, सुजित पाटील हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून त्यांची निवड सोमवारी 30 सप्टेंबर रोजी अलिबाग येथे होणार्‍या मुंबई विभागीय शालेय …

Read More »

टी-20मध्ये विश्वविक्रम; चौकारांचा पाऊस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सलामीवीर बेथ मुनी हिने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध रविवारी (दि. 29) झालेल्या टी-20 सामन्यात तिने 61 चेंडूंत 113 धावांची स्फोटक खेळी केली. त्यात तिने तब्बल 20 खणखणीत चौकार लगावले. टी-20मधील हा विश्वविक्रम आहे. बेथ मुनीच्या स्फोटक शतकी खेळीने …

Read More »