पाली : प्रतिनिधी पेण तालुक्यातील कुहीरे गावात गावदेवी क्रीडा मंडळ व महिला मंडळाच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून भव्य व देखणे शिवस्मारक साकारले आहे. गावाच्या प्रवेशद्वाराजवळच मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून शनिवारी (दि.23) या शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. गावात काढण्यात आलेल्या शिवप्रतिमेच्या मिरवणुकीत भगवे फेटे परिधान …
Read More »मारूती पाटील यांची शिवजयंतीला सायकल भ्रमंती
अलिबाग : प्रतिनिधी अंगात भगवे कपडे…सायकलला मागे-पुढे भगवे झेंडे आणि ध्वनिक्षेपकावर शिवरायांच्या जीवनावरील पोवाडे ऐकवित अलिबाग-रेवस रस्त्यावरून निघालेला एक सायकल स्वार सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. मारूती लक्ष्मण पाटील (45) असे या शिवभक्ताचे नाव आहे. अलिबाग तालुक्यातील सारळ-आदिवासी वाडी हे मारूती पाटील यांचे गाव. गेली 27 वर्षे मारूती पाटील शिवजयंतीच्या …
Read More »नेरळमध्ये शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत
कर्जत : बातमीदार शिवजयंतीनिमित्त येथील श्याम कडव आणि प्रथमेश कर्णिक हे शिवप्रेमी तरुण गेल्या चार वर्षांपासून वेगवेगळ्या किल्ल्यांवरून नेरळमध्ये शिवज्योत आणतात. यावर्षी त्यांनी 240 किलोमीटरचे अंतर पार करून सज्जनगड येथून शिवज्योत आणली होती. तिचे नेरळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील सज्जनगड येथील स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन 21 मार्च …
Read More »माणगावात शिवजयंती उत्साहात साजरी
माणगाव : प्रतिनिधी माणगांव नगरपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शनिवारी (दि. 23) उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शिवप्रेमींनी रायगडावरुन वाजत गाजत शिवज्योत आणली होती. खांदाड ग्रामस्थांनी सकाळी शिवप्रतिमेचे पूजन करुन छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष केला. खांदाड ग्रामस्थांनी शिवज्योतीसह माणगांव बाजारपेठेतून वाजत गाजत …
Read More »‘शिवचरित्राचे अध्ययन करुन ते आचरणात आणावे’
खोपोली : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे अध्ययन करुन तो इतिहास समजून घेऊन तरुण पिढीने आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवव्याख्याते प्रा. अविनाश मोरे यांनी कडाव येथे केले. अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या कडाव (ता. कर्जत) येथील शिशू मंदिरमधील व्याख्यानमालेत प्रा. मोरे बोलत होते. शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुडे, …
Read More »नेरळमध्ये शिवप्रभुंच्या नूतन पुतळ्याची स्थापना,चौकाचेही नुतनीकरण
कर्जत : बातमीदार शिवजयंतीचे औचित्यसाधून नेरळ येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवाजी महाराज चौकात शनिवारी महाराजांची नवीन मूर्ती प्रतिस्थापित करण्यात आली. यावेळी संपूर्ण शहरात काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीच्या निमित्ताने नेरळ भगवेमय झाले होते. सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने 1994 मध्ये प्रथम नेरळ गावात असलेल्या शिवाजी महाराज चौकाचा चौथरा उभा राहिला, तर त्यावर …
Read More »शिखंडी/किन्नर
महाभारतात पांडवांनी विजय मिळवलेल्या युध्दात अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे भीष्माचा वध. हा वध जरी अर्जुनाच्या बाणाने झाला तरी हा विजय शिखंडीशिवाय शक्य झाला नसता. एवढा शिखंडीचा प्रभाव होता. शिखंडी या विषयवार एक नाटक आले आहे. महाभारतातील शिखंडीच्या महती व कार्यावर प्रकाश टाकला असला तरी आजच्या नाटककाराने या विषयाकडे आजच्या सध्याच्या …
Read More »उलटा ‘चोर’ ‘चौकीदार’ को डांटे!
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी मुंबईच्या नगरसेवकांना पूर्वी नगरपिते म्हणत असताना ‘नगरसेवक’ संबोधण्याची सूचना केली. शहरातील लोकप्रतिनिधी हा नागरिकांचा सेवक असतो म्हणून प्रभागातून निवडून आलेले हे नगरसेवक संबोधण्यात येऊ लागले. हाच धागा थेट भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत नरेंद्र मोदी यांनी नेला आणि मी पंतप्रधान, प्रधानमंत्री नव्हे, तर ‘प्रधानसेवक’ आहे, असे विनम्रपणे नमूद …
Read More »पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीज उत्सव
पनवेल : विठ्ठलाच्या जयघोषात आणि तुकोबाच्या सुरेल अभंगात पनवेल मार्केटमध्ये तुकाराम बीजोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तुकाराम महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती.
Read More »गव्हाण कोपर हनुमान मंदिरात तुकाराम बीज उत्सव
गव्हाण : गव्हाण कोपर येथील हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे तुकाराम बीज उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत, सरपंच हेमलता म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, माई भोईर उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper