Breaking News

Ramprahar Team

ज्येष्ठांची सामाजिक बांधिलकी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सामाजिक बांधिलकीचे भान राखूऩ पनवेल तालुक्यातील स्वयंसेवी सामाजिक संस्थांना संघातर्फे आर्थिक सहाय्य देण्याचा कार्यक्रम नुकताच संघाच्या सभागृहात पार पडला. प्रथम पुलवामा भ्याड हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या …

Read More »

सोनारीत 96 टक्के मतदान; आज मतमोजणी

उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आज 24 फेब्रुवारी 2919 रोजी घेण्यात आली असून, सोनारी ग्रामपंचायतीच्या सरपंच व 9 सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीतील एकूण 20 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून,महिला 866 व पुरुष 854 असे एकूण 1720 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी 96 टक्के …

Read More »

मोदींची स्पष्टोक्ती दिलासादायक

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे आता सूड उगवलाच पाहिजे अशी भावना देशभरातील सर्वसामान्यांकडून व्यक्त होऊ लागली. युद्ध वा सुडाच्या भावनेने पेटून केलेली कारवाई या प्रश्नात उपयोगाची नाही असे मत काही तज्ज्ञांनी तत्काळ व्यक्त केले होते. परंतु सर्वसामान्य असे काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परंतु आता काही …

Read More »

नेरळ पोलिसांकडून गावठी दारूभट्या उद्ध्वस्त

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगलात असलेल्या गावठी दारु तयार करण्याच्या दोन हातभट्ट्या नेरळ पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. बेकरे परिसरात गावठी दारुच्या हातभट्ट्या सुरु असल्याची माहिती शनिवारी (दि. 23) नेरळ पोलिसांना मिळाली, त्यानुसार  पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, पोलीस नाईक निलेश वाणी, होमगार्ड राहुल पाटील, सातपुते यांच्या पथकाने बेकरे …

Read More »

डॉक्टर भुलला स्वस्त सोन्याला

खालापुरातील घटना; सहा लाखाला लागला चुना खोपोली : प्रतिनिधी स्वस्त सोन्यासाठी खोपोलीतील एका नामांकित डॉक्टरची   सहा लाखला फसवणूक झाली आहे. डॉ. बन्सीलाल लक्ष्मण पाटील (रा. वृंदावन कॉम्पलेक्स, मुद्रे बुद्रुक, कर्जत) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव असून, त्यांचे खालची खोपोली (ता. खालापुर) येथे पाटील हेल्थकेअर सेंटर नावाचे रूग्णालय आहे. दिनेश प्रजापती …

Read More »

र्होडियो कंपनी कामगारांचे उपोषण तिसर्या दिवशीही सुरू

विविध कामगार संघटनांचा पाठींबा रोहे ः प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील र्‍होडियो (सॉल्वे) कंपनीच्या  कामगारांना व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले आहे. या कामगारांनी कामावर पुन्हा घ्यावे, या मागणीसाठी 22 फेब्रुवारीपासून कंपनीच्या प्रवेद्वारासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने त्याची दखल न घेतल्याने तिसर्‍या दिवशीही कामगारांचे साखळी उपोषण सुरूच आहे. दरम्यान, …

Read More »

योजनेचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचवावा

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन; प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा शुभारंभ अलिबाग : जिमाका केंद्र शासनाचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबतची माहिती पात्र शेतकर्‍यांनी आपल्या परिचयातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन अधिकाधिक शेतकर्‍यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रविवारी (दि. 24) येथे केले. देशभरातील शेतकर्‍यांना प्रतिकुटूंब …

Read More »

एमएमआरडीएच्या विस्ताराला रायगड तयार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने आता आपल्या कक्षा रुंदावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात एमएमआरडीए मुंबई आणि ठाणेपुरती मर्यादित न राहता रायगड आणि पालघर जिल्ह्यात आपले क्षेत्र वाढविणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. प्राधिकरणाने आपले क्षेत्र वाढविण्याआधी त्या भागात पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी सुरू केलेली सुरुवात हे राज्यातील भाजप- …

Read More »

पनवेल तालुक्यातील सहा पुलांच्या कामाला मंजुरी

पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील सहा पुलांच्या कामाला मंजुरी मिळाली असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यातील तीन ठिकाणचे जुने पूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. एका ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार असून, दोन ठिकाणच्या पुलांची रुंदी वाढविण्यात येणार आहे. या पुलांसाठी तब्बल सव्वा पाच …

Read More »

महाआघाडीला धूळ चारणार -महेश कडू

उरण ः प्रतिनिधी मागील सरपंचपदाच्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांच्या पाठबळावर सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा विजय निश्चित असून, आम्ही महाआघाडीला धूळ चारणार, असा दावा माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य महेश कडू यांनी केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनीही सोनारी गावाच्या विकासात भरघोस अशी भर घातली …

Read More »