पनवेल : भाजपचे पंचशिल झोपडपट्टी अध्यक्ष पप्पू साळवे यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पप्पू साळवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी विजय चव्हाण, सुरेश सरोज, विठ्ठल राठोड, सुरज मंजुळे, आकाश झुंजार आदी उपस्थित होते.
Read More »जेएनपीटी टाऊनशीपसमोर तातडीने गतिरोधक बसवा
सुधीर घरत यांची मागणी जेएनपीटी : वार्ताहर वाहनांची आणि माणसांची वर्दळ असलेल्या जेएनपीटी टाऊनशिप गेटसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावी, अशी मागणी भाजप वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. आठ दिवसाच्या आत येथे …
Read More »पनवेलमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा
पनवेल : वार्ताहर अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका दर्शन व पालखी परिक्रमा सोहळा प.पू. सद्गुरु नाना महाराज परांजपे यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी समर्थ मंदिर (मठ) गावदेवी पाडा पनवेल येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाला. या वेळी श्री स्वामींच्या पालखीचे आगमन झाले असता तिचे …
Read More »पनवेलमध्ये अंधाराकडून उजेडाकडे रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक काचबिंदू सप्ताहनिमित्त लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट पनवेल आणि लक्ष्मी आय क्लिनिक खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने अंधाराकडून उजेडाकडे या शिर्षकाखाली काचबिंदू या दृष्टीदोषाविषयी जनजागृती करण्यासाठी खारघर येथे जनजागृती रॅली उत्स्फूर्त प्रतिसादात झाली. खारघरमधील सेक्टर 4 येथून प्रारंभ झालेल्या रॅलीचा समारोप सेक्टर 11 येथील श्री साईबाबा मंदिरात झाला. …
Read More »उरणमध्ये महिला मेळाव्यास प्रतिसाद
मान्यवरांचा सहभाग, कलागुणांचे झाले दर्शन उरण : वार्ताहर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था उरण यांच्या वतीने उरण येथे महिला मेळावा 2019चे आयोजन रविवारी (दि. 10) रोजी करण्यात आले होते. सुमारे 1300 महिलांनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून ए. एफ एस. मिनी अब्राहम …
Read More »उमरोलीच्या सरपंचपदी सुनीता बुंधाटे बिनविरोध
कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली ग्रुपग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदावर शिवसेनेच्या सुनीता बुंधाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सविता पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पीठासन अधिकारी माणिक सानप यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंच पदासाठी उमरोली गावातून निवडून गेलेल्या शिवसेनेच्या …
Read More »युतीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करा
खोपोली शहर भाजप कार्यकारिणी सभेत आवाहन खोपोली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून युतीच्या उमेदवाराला शहरातून अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्याकरिता भाजपचे खोपोली शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात सभा झाली. या सभेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »जिव्हाळा
माणसाची परस्पराबद्दल प्रेम आणि नातं याची जाणीव होते, त्याला जिव्हाळा असे म्हणतात. हे विलक्षण नातं असत. लावा लळा, निर्माण होईल नातं, तोच खरा जिव्हाळा असे एका सुभाषितकाराने म्हटले आहे. तर नातं मग ते रक्ताचे असो वा काही काळ आलेल्या सहवासातील असो, अगदी रेल्वे वा एसटी बसमधील प्रवासातील किंवा रुग्णालयातील भेटीतून …
Read More »शरदराव आणि राहुल गांधी, कृपा करून लोकांना मूर्ख समजण्याचे पाप करू नका!
10 मार्च 2019 रोजी 17व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम भारताच्या निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण भलतेच तापायला लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार पुन्हा येऊ न देण्यासाठी मोदी विरोधकांनी आकांडतांडव सुरू केले आहे. भिन्न विचारांचे(?) लोक, एकमेकांची तोंडे न पाहणारे नेते एकत्र …
Read More »राहुल आणि प्रियांकासाठी…
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कार्यवाह प्रियांका वड्रा काहीबाही बोलतात आणि त्याची दखल घ्यावी लागते.चुकीचे संदेश लोकांपर्यंत जाऊ नयेत म्हणून ते क्लेशकारक काम करावे लागते. क्लेश ते वेड्यासारखे बरळतात याचा नुसता होत नाही, तर त्यांना सर्वोच्च नेते म्हणून काँग्रेसने निवडले आहे याचा अधिक होतो. काँग्रेस आता 134 वर्षांची जुनीपुराणी अनुभवसमृद्ध …
Read More »