सरपंचपदी मंगेश पालकर यांची बिनविरोध निवड महाड : प्रतिनिधी तालुक्यात महत्त्वाची समजल्या जाणार्या चांभारखिंड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे मंगेश पालकर यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या वरिष्ठांनी पालकर यांचे अभिनंदन केले. धोंडू पालकर यांनी राजीनामा दिल्यामुळे चांभारखिंड ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले होते. दरम्यान, राज्य सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय बदलल्याने पुन्हा एकदा …
Read More »खारघर शहराला पाणीपुरवठा वाढला
भाजपच्या सिडको काम बंद आंदोलनाला यश; आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकार्यांचे नागरिकांनी मानले आभार खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने वसविलेल्या खारघरमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवली होती. यासाठी अनेक पत्रव्यवहार सिडकोकडे भाजपकडून करण्यात आले. याकडे सिडकोने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी व सिडको प्रशासनाला जागे करण्यासाठी भाजपच्या खारघरमधील शिष्टमंडळाने …
Read More »पनवेल, उरण परिसरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव
जासई विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापकांचा सत्कार उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशोत्सव व इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय …
Read More »केबीपी कॉलेजमध्ये वार्षिक प्रशिक्षण शिबिर
नवी मुंबई : बातमीदार रयत शिक्षण संस्थेचे वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये दहा दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिर (सीएटीसी) व थल सैनिक शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर 5 ते 14 जून 2022दरम्यान झाले असून यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील 414 प्रशिक्षणार्थी मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील विविध एन.सी.सी. …
Read More »राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (एनएसओ) वतीने आगामी सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणासंदर्भात आयोजित प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मुंबईतील पोदार आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन डॉ. जी. एस. खटी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15) बेलापूर येथील कार्यालयात करण्यात आले. या वेळी ’एनएसओ’च्या प्रादेशिक कार्यालयाच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय, महाराष्ट्र शासनाच्या अर्थशास्त्र व् सांख्यिकी …
Read More »काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराचे गुलाम
भाजपचे रामचंद्र घरत यांचा घणाघात नवी मुंबई : बातमीदार देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणार्या गांधी परिवाराच्या बचावासाठी रस्त्यावर उतरून यंत्रणांवर दबाव आणणारे काँग्रेस कार्यकर्ते हे गांधी परिवाराचे गुलाम असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजपचे रामचंद्र घरत यांनी केले आहे. …
Read More »पुन्हा एकदा रणकंदन
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर आठवड्याभरावर येऊन ठेपलेली विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न तरी करेल असे वाटले होते, परंतु अंतिमत: महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवू पाहणार्या सदाभाऊ खोत यांनी अखेरच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तेवढा विवेक …
Read More »रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात 42 नवीन वाहने
अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलाच्या ताफ्यात सोमवारी (दि. 13) 42 नवीन वाहने दाखल झाली. त्यामध्ये 20 चारचाकी तर 22 दुचाकींचा समावेश आहे. यासाठी 1 कोटी 81 लाख 50 हजार रुपये इतका निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. पोलीस मुख्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास पालकमंत्री, स्थानिक …
Read More »शेडवर डांबर टाकताना कामगाराचा मृत्यू
सिस्टीमिटीक वायर कंपनी व्यवस्थापनाविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील ढेकू गावामधील सिस्टीमिटीक वायर प्रा. लि या कंपनीच्या पत्र्याच्या शेडवर डांबर टाकण्यासाठी चढलेल्या रफीक नवाज खान (वय 40, मूळ रा.जालना) या कामगाराचा पंचवीस फुटावरून खाली पडून रविवार (दि. 12) सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी कामगाराच्या सुरक्षेची खबरदारी …
Read More »मुरूड नगर परिषदेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
मुरूड : प्रतिनिधी मुरूड जंजिरा नगर परिषदच्या 2022 मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सोमवारी (दि.13) सकाळी 11 वाजता नियंत्रण अधिकारी तथा अध्यक्ष नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व नगर परिषद मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण प्रक्रिया पार पडली. मुरुड नगर परिषदेची लोकसंख्या 12 हजार 216 असून यंदा होणार्या निवडणुकीत 10 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper