महाड ः प्रतिनिधी महाड शहरात अतिक्रमणाविरोधी कारवाईला पालिका प्रशासनाने सुरू केली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकामध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात असताना काही दुकानांच्या वाढीव पत्र्याच्या शेड तोडण्यात आल्या आणि काहींना अभय देण्यात आले. याबाबत चौकशी केली असता, माजी नगरसेवक सुनील कविस्कर यांनी …
Read More »इंदापूर बाजारपेठेत भरधाव ट्रकची घरे, दुकानांना धडक
अज्ञात ट्रकचालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील इंदापूर बाजारपेठेत रस्त्यालगत असणार्या घरांना व दुकानांना भरधाव ट्रकची धडक लागली. हा अपघात बुधवारी (दि. 22) रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद चिमणलाल भोगिलाल मेहता (वय 79) रा. इंदापूर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल …
Read More »पोलादपुरातील पुनर्वसन संकुलांची दूरवस्था
दुरुस्ती झाल्यानंतरच ताबा घेण्याची दरडग्रस्तांची भूमिका पोलादपूर : प्रतिनिधी अतिवृष्टी, महापूर आणि दरडग्रस्तांना देण्यात पोलादपूर तालुक्यातील कोंढवी आणि कोतवाल येथील पुनर्वसन संकुलांची दुरवस्था सुरू आहे. या पुनर्वसन संकुलांमध्ये वास्तव्यासाठी जाण्यास दोन्ही गावांतील दरडग्रस्त उत्सुक नसल्याचे लॉटरीनंतर दिसून आले आहे. पोलादपूर तालुक्यातील पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात बोरावळे येथील दरडग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले. …
Read More »शिवसेनेला संपवल्याचा राऊतांना आनंद
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची टीका मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 40 हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप …
Read More »राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहर कार्यकारी समितीची बैठक
पनवेल : वार्ताहर केंद्र शासनाच्या दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पनवेल महानगरपालिकेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या शहर कार्यकारी समितीची बैठक नुकतीच मंगळवारी (दि. 21) उपायुक्त कैलास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी, राष्ट्रीय …
Read More »खुटारी येथे हरिनाम सोहळा उत्साहात
श्री चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील खुटारी येथे श्री शंकराचे देऊळ ट्रस्टच्या सौजन्याने श्री. संत वामनबाबा महाराज, श्री. संत सावळाराम बाबा महाराज, श्री. संत आप्पा माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय श्री. चैतन्येश्वर शिवालय वर्धापन दिन व नाम चिंतन हरिनाम सोहळा भक्तिमय वातावरणात …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात योग व संगीत दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक योग दिन व विश्व संगीत दिनाचे औचित्य साधून उलवे येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्रांगणात दोन्ही दिन उत्साहात साजरे करण्यात आले. या निमित्ताने शाळेतील काही विद्यार्थ्यांनी विविध भाषांमध्ये गीते सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, तसेच जागतिक योग दिनानिमित्त समिता माता (वाय. एस.एम. नेरूळ संस्थेच्या …
Read More »पनवेल मनपा आपत्ती व्यवस्थापन सज्ज
बैठकीत विविध विषयांवर चर्चा व नियोजन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यात आपत्ती आल्यास लागणार्या अत्यावश्यक विविध वस्तू, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, आपत्ती काळात लागणारे अत्यावश्यक फोन नंबर अशा विविध विषयांचा आढावा आपत्ती व्यवस्थापनाच्या मंगळवारी (दि. 21) मुख्यालयात झालेल्या बैठकित घेण्यात आला. या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, …
Read More »नवी मुंबईकरांनी साजरा केला योग दिन
आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ नवी मुंबई : बातमीदार मानवतेसाठी योग या संकल्पनेवर आधारित आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी मुंबई महापालिकेच्या वतीने, सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाद्वारे अत्यंत उत्साहात पार पडला. प्रत्येक मनुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व सुदृढतेसाठी योग हा सर्वोत्तम …
Read More »महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळतर्फे पनवेलमध्ये योग दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात योग दिन साजरा केला. या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा अरविंद मोरे, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper