Breaking News

Ramprahar Team

शिवरायांचा आदर्श घेऊन सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे -प्रमोद कदम

नागोठणे : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अठरापगड जातीचे लोक होते. महाराज त्या सर्वांना आदराची आणि आपुलकीची वागणूक देत होते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी गुण्यागोविंदाने व एकोप्याने नांदावे, असे प्रतिपादन नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद कदम यांनी शनिवारी बेणसे येथे केले. बौद्धजन समाज सेवा संघ, सम्यक सामाजिक संस्था, …

Read More »

पोलादपूर नगरपंचायत कार्यालय कुलूपबंद

शिवजयंतीनिमित्त काँग्रेस नगरसेवकांनी लावला दरवाजालाच पुष्पहार पोलादपूर : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पोलादपूर नगरपंचायत कार्यालय खुले असेल, अशी अपेक्षा करून काँग्रेसचे नगरसेवक शनिवारी (दि. 19)सकाळी साडेदहा वाजता पुष्पहार घेऊन कार्यालयाकडे गेले. मात्र त्यांना नगरपंचायत कार्यालय कुलूपबंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे नगरसेविका आशा गायकवाड, नगरसेवक स्वप्नील भुवड, संतोष चव्हाण …

Read More »

भाजपतर्फे मुरूडमध्ये नेत्रतपासणी शिबिर

मुरूड : प्रतिनिधी शिवजयंती निमित्त तालुका भाजप आणि ज्येष्ठ नेते जनार्दन (आण्णा) कंधारे यांच्या संयुक्त विद्यमाने   मुरूडमध्ये रक्तदाब, मधुमेह आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिराचे उद्घाटन महिला मोर्चा पाखाडी अध्यक्ष अपर्णा अशोक कारभारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर जनार्दन कंधारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून …

Read More »

खोपोलीतील आदिवासींसाठी पाण्याची टाकी उभारणी कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त निफाणवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील सावरोली नजीक असून या ठिकाणी टाटा स्टीलने निफाणवाडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरवण्यासाठी 20 हजार लिटर  क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यासाठी पायाभरणी केली. यामुळे निफाणवाडी गावातील 130 पेक्षा जास्त रहिवाशांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाणार आहे. …

Read More »

नागोठणे भाजप कार्यालयात शिवजयंती

नागोठणे : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे कार्यालयमध्ये शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, सरचिटणीस आनंद लाड, शिक्षण सेल तालुका अध्यक्ष अहिरे, शितल नागरे, माधुरी रावकर, निलमा राजे, सोनी पांडे, …

Read More »

सार्वजनिक शौचालय : स्थानिकांची गैरसोय आणि राजकारण

नेरळ ग्रामपंचायतने गावातील वाल्मिकीनगर भागातील 20 वर्षांपूर्वी बांधलेले सार्वजनिक शौचालय तोडले आहे. त्यामुळे शौचालया अभावी परिसरातील रहिवाशांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल नेरळमध्ये चर्चा सुरु आहे. हे सार्वजनिक शौचालय तोडण्याच्या प्रकरणात पत्रकार अजय गायकवाड यांना मारहाण झाल्याने जिल्ह्यातील पत्रकारात संताप निर्माण झाला आहे.त्यानिमित्ताने हा लेख… नेरळ गावातील आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या वाल्मिकीनगर …

Read More »

मिशन भ्रष्टाचार निर्मूलन

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते यांचे हेतूच मुळी कमालीचे भिन्न आहेत. भाजपचे आक्रमक नेते भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम एखाद्या मिशनप्रमाणे करतात. लोकांचा पैसा लुटमारीमध्ये कोणाच्या घशात जाण्यापासून रोखतात. करदात्यांच्या पैशाला नको तिथे वाटा फुटण्यापासून वाचवण्याचे हे मिशन आहे. सत्ताधारी नेतेही मिशनप्रमाणेच काम करतात, परंतु त्यांचे मिशन खुर्च्या शाबूत …

Read More »

शिवरायांचा आठवावा प्रताप…

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना माहितीच आहे. आज देखील ह्यांना हिंदूहृदय सम्राट म्हणून म्हणतात. तर काही लोक त्यांना मराठ्यांचा अभिमान असेही म्हणतात. ते भारतीय प्रजासत्ताकचे महान सेनानायक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला.राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनविण्याचा प्रयत्न शिवाजी …

Read More »

खालापूर परखंदे येथे दाखले वाटप शिबिर

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील वावोशी मंडळ कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या आदिवासीवाड्यांतील ग्रामस्थांचे जातीचे दाखले, रेशनकार्ड विभाजन आणि नवीन नाव नोंदणीसाठी परखंदे आदिवासीवाडीत घेतलेल्या शिबिराला आदिवासी बांधवांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 200 आदिवासी बांधव सहभागी झाले होते. शिबिरात जातीच्या दाखल्यांची 57 प्रकरणे तर 69 रेशनकार्डवर नोंदी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. …

Read More »

कर्जतमध्ये महिलासाठी आरोग्य तपासणी शिबिर

अभिनेत्री जुई गडकरी पालिकेच्या स्वच्छता दूत कर्जत : बातमीदार कर्जत नगर परिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 18) शहरातील महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रक्तगट व आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच अभिनेत्री जुई गडकरी यांची कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छता दूत म्हणून निवड जाहीर करण्यात आली. कर्जत नगर …

Read More »