नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांचे संकट काही संपता संपत नाही. अवकाळी पावसाच्या सरी कधीही बरसत आहेत. वारंवार वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका मात्र शेतकर्यांना बसत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला व जो काही शिल्लक राहिला होता तोही आता या अवकाळीने जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकर्याने जगायचे कसे, हा प्रश्न …
Read More »अमित घाग यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
धाटाव : प्रतिनिधी दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग यांचा वाढदिवस रोहा तालुक्यात रविवारी (दि. 9) ई-श्रम कार्ड योजना, विविध आदिवासी भागात ब्लँकेट वाटप, रोहा ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. युवा मोर्चा रोहा शहर अध्यक्ष निलेश धुमाळ यांच्या माध्यमातून रोहा ग्रामीण रुग्णालयात …
Read More »पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार प्रचार
भाजपचा जाहीरनामा सरसच पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायतीची दुसर्या टप्प्यातील निवडणूक 17 जानेवारीला होत असून त्यासाठी सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीसाठीचे जाहीरनामे याआधीच प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा सर्व जाहीरनाम्यांमध्ये सरस आहे. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा वचननामा आणि कार्यपूर्तीची यादी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून वचननामा …
Read More »बद्रुद्दिन दर्गाहचा उरूस रद्द
भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील बद्रुद्दिन दर्गाह सुप्रसिद्ध असून सर्व धर्मातील भाविक येथे दर्शनाला व नवसपूर्तीकरिता येत असतात. रायगड, ठाणे, पनवेल, मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणत भाविक उरुसाला हजेरी लावतात. पेण तालुक्यातील निधवली येथे हजरत बद्रुद्दिन शाह हुसैनी यांची दर्गाह शरीफ असून सुमारे 700 वर्षांपासून …
Read More »कर्जतमध्ये अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात
कर्जत : बातमीदार कर्जतमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या 44व्या ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी 14 जानेवारीपर्यंत चालणार्या सप्ताहात कीर्तन, प्रवचन, भजन होणार नसून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पारायण व हरिपाठ होणार आहे. कोरोना महामारीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने अखंड हरिनाम सप्ताह खुल्या मैदानात न घेता कर्जतमधील श्री …
Read More »पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नागोठणे : प्रतिनिधी येथील भाएसोच्या शेठ ओटरमल शेषमल परमार कॉलेजमध्ये 59व्या पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात नारनवर म्हणाले की, पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप, फेसबुकपासून लांब राहावे. अनोळखी …
Read More »अश्वपालांमुळे लोखंडी रेलिंग कोसळण्याच्या स्थितीत
घोडे नियोजित ठिकाणी बांधण्याची मागणी कर्जत : बातमीदार काही वर्षांपूर्वी तेथील उजाड झालेले जंगल संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वृक्षारोपण करून पुन्हा उभारले आहे आणि तेथे पुन्हा घोडे जाऊ नयेत यासाठी वनव्यवस्थापन समितीने बनवलेले लोखंडी रेलिंग अश्वपालांमुळे कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे ते सर्व घोडे त्यांना दिलेल्या ठिकाणीच बांधण्यात यावेत, अशी मागणी …
Read More »गार्बेज फ्री सिटीच्या वाटेवर कर्जत
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात थ्री स्टार मानांकन मिळविणार्या तसेच देशात 15व्या क्रमांक पटकावणार्या कर्जत नगरपरिषदेने आगामी काळात कर्जत गार्बेज फ्री शहर व्हावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचवेळी 2021 मध्ये देशात स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 15व्या आलेल्या कर्जत शहराला आता देशातील आघाडीच्या पाच शहरात यायचे आहे. त्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण 2022ची तयारी …
Read More »मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार
भाजप आमदाराचा आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधी मुंबईचा विकास आराखडा मंजूर कराताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. परंतू मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्याने आणि खेळाचे मैदान पूर्णपणे नामशेष झाले आहेत, असा आरोप करत भाजप आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. …
Read More »नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल मनपाच्या महासभेत विकासकामांना मंजुरी पनवेल : दादाराम मिसाळ नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक 14 मधील धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा खांदा या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या, पावसाळी गटारे आणि विद्युत वाहिन्या भूअंतर्गत करणे या कामांना मंजुरी मिळाली आहे. धाकटा खांदा, पटेल मोहल्ला आणि मोठा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper