Breaking News

Ramprahar Team

पनवेल मनपातर्फे स्वच्छताविषयक विविध स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत चित्रकला, पोस्टर जिंगल, गाणी, व्हिडीओ, शॉर्ट फिल्म, पथनाट्य, भित्तीचित्र स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभागी होऊन स्वच्छताविषयक जनजागृतीमध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. त्यासाठी स्पर्धेसाठी स्वच्छ सुंदर आधुनिक …

Read More »

खारघर भाजपतर्फे दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम उत्साहात साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रदेश भाजप व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या व विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त खारघर भाजपतर्फे दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरची पुनर्बांधणी याची देही याची डोळा पाहण्यासाठी खारघर सेक्टर 12 मधील दुर्गा माता मंदिर …

Read More »

सावध रहा, सुरक्षित रहा!

देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत असताना दुसरीकडे ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण मात्र हळहळू वाढत आहेत. त्याची गती तीव्र नसली तरी याच ओमायक्रॉनमुळे काही देशांमध्ये कोरोनाची नवी लाट आलेली आहे. म्हणूनच केंद्रीय यंत्रणेने देशातील नागरिकांना सावध करतानाच इशाराही दिला आहे. आतापर्यंत जगातील 57 देशांमध्ये पोहचलेला कोरोनाचा नवा विषाणू …

Read More »

पुणे येथील 200 महिलांना दुर्गराज प्रतिष्ठानने घडविले पद्मदुर्गचे दर्शन

मुरूड : प्रतिनिधी मागील 30 वर्षांपासून दुर्ग संवर्धन व दुर्ग सहली घडविण्यात कार्यरत असलेल्या पुण्यातील कर्वेनगर येथील श्री दुर्गराज प्रतिष्ठानने 200 महिलांना मुरूड-जंजिरा येथील पद्मदुर्ग व अष्टविनायकातील पालीच्या गणपतीचे दर्शन घडविले. श्री दुर्गराज प्रतिष्ठान दरवर्षी गृहिणी तसेच नोकरी व्यवसायात व्यस्त असणार्‍या महिला व विद्यार्थिनी यांच्यासाठी एक दुर्ग व त्या परिसरातील …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किमी 41/600 पुणेकडील दिशेच्या रस्त्यावर एम एच 02-2619 या कारने अचानक पेट घेतल्याने कारला आग लागली. आग लागण्यापूर्वी कारमधील चार प्रवासी बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र कारचा जळून कोळसा झाला आहे.

Read More »

मोरे महिला महाविद्यालयात डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाऊंडेशन संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयात कला शाखा व इतिहास विभागाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी आशा कुंटे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन परिचय व त्यांनी केलेल्या कार्याची …

Read More »

एसटी संपामुळे टपरीवाले, रसवंती चालक, दुकानदारांवर उपासमारीची वेळ

पाली : प्रतिनिधी एसटी ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जीवनवाहिनी मानली जाते, रस्त्यावर सकाळ, दुपार, सायंकाळी व रात्री सामान्यांच्या सेवेत धावणारी एसटी आता नजरेस पडत नसल्याने अनेकांची गैरसोय होतेच याबरोबरच काहींना चुकल्यासारखे वाटत आहे. मागील महिनाभरापासून एसटीचा संप सुरू आहे. परिणामी स्थानकात प्रवाशांची रेलचेल पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे स्थानकातील शेकडो फिरते …

Read More »

मुंगूर तलावामुळे पाताळगंगेची गटारगंगा

खोपोली : प्रतिनिधी मुंगूर मत्स्यपालन तलावातील दुर्गंधीयुक्त पाणी थेट पाताळगंगा नदीत सोडण्यात येत असल्याने पाताळगंगा नदीपात्र दूषित झाले आहे. मुंगूरपालनावर बंदी असतानादेखील नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे तलाव राजरोस मत्स्यपालन करत आहेत. त्याबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत. खालापूर नगरपंचायत हद्दीत महड येथे नदीकिनारी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे मुंगूर मत्स्यपालन केले जाते. …

Read More »

रोह्यातील मोरे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींची क्षेत्रभेट

रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाउंडेशनच्या रोहे येथील महिला महाविद्यालयाच्या कला शाखेतील विद्यार्थिनींनी नुकताच मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील प्रसिद्ध किल्ला, पुरातन चर्च, खोकरी येथील नबाबकालीन मकबरे यांना भेट दिली आणि आपल्या प्राध्यापकांकडून त्यांचा इतिहासदेखील समजून घेतला. महिला महाविद्यालयात द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनींसाठी शॉर्टटर्म सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत तासिका, क्षेत्रभेट, प्रात्यक्षिके, …

Read More »

शेतकर्यांनी हमीभाव खरेदी केंद्रात भात विक्री करावी -मोहन शिंदे

पोलादपूर : प्रतिनिधी शासकीय आधारभूत किंमत हमीभाव योजनेंतर्गत पोलादपूरमधील शेतकर्‍यांनी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. या संस्थेमध्ये भातविक्री करून हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन मोहन शिंदे यांनी केले. पोलादपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातील आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन चेअरमन मोहन शिंदे यांच्या हस्ते करण्यात …

Read More »