Breaking News

Ramprahar Team

गव्हाण विद्यालयाचे रवींद्र भोईर ‘रयत’च्या लाईफ मेंबरपदी

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन भगत ज्युनिअर कॉलेजमधील उपशिक्षक रवींद्र शालिक भोईर यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबरपदी निवड करण्यात आली. रवींद्र भोईर हे संस्थेच्या लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य या पदावर कार्यरत असतानाच लाईफ वर्करमधून लाईफ मेंबर या पदावर त्यांना बढती देण्यात आली …

Read More »

विना मास्क फिरणार्यांवर पालिकेकडून कारवाई

पनवेल : वार्ताहर राज्यभर ओमायक्रॉन विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत, तसेच महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘नो मास्क नो एंट्री’चे धोरण पुन्हा जोमाने सुरू केले आहे. पालिका क्षेत्रात विनामास्क फिरणार्‍यांकडून साडेतेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल याचाही प्रभागातील बाजारपेठा, …

Read More »

वाहतूक कोंडीबाबत अधिकार्यांसोबत बैठक

समस्या तातडीने सोडविण्याचे तहसीलदारांचे निर्देश उरण : प्रतिनिधी वाहतूक कोंडी आणि तालुक्यातील इतर समस्यांबाबत तहसीलदारांची विविध अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन  समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. उरण तालुक्यात वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने आणि या भागात गोदामे आणि कंटेनर यार्ड मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ही वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. …

Read More »

नियमांचे पालन करा; अन्यथा कारवाई

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल पोलिसांचा इशारा पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फार्महाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करू, असा इशारा पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी बैठकीत दिला. या बैठकीमध्ये दौंडकर यांनी सूचना केल्या; त्यामध्ये कोरोना विषाणूचा …

Read More »

कष्टकर्यांच्या संवेदना जागृत करणे हे लेखकाचे काम -पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

खोपोली : प्रतिनिधी समाजातील तळागाळातील कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा, त्यांच्या संवेदना जागृत करणे, त्याचे चित्रण लेखक आणि पत्रकारांनी आपल्या लेखणीतून मांडणे काळाची गरज आहे. ‘पाणकळा‘कार र. वा. दिघे यांनी या समाजाच्या व्यथा आपल्या लेखणीतून सर्वांपुढे मांडल्या. त्यांचा वारसा त्यांचे कुटुंबीय जपण्याचा प्रयत्न करीत असल्याने आम्हा साहित्यिकांना त्यांचा अभिमान वाटत …

Read More »

खोरा बंदरातील वाहनतळ वापरावीना

पर्यटकांनी गाड्या रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी मुरूड  : प्रतिनिधी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पहाण्यासाठी पर्यटकांना राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जावे लागते. मात्र खोरा बंदरातील वाहनतळामध्ये गाड्या उभ्या करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यटकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या उभ्या कराव्या लागत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे. दोन वर्षांपूर्वी खोरा बंदराचा …

Read More »

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मका भरलेला ट्रक पलटला

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ढेकू गावच्या हद्दीत मका भरलेला ट्रक उलटल्याने काही काळ वाहतूक बाधीत झाली, मात्र अपघातग्रस्त ट्रक बाजूला केल्यानंतर मुंबईकडे जाणार्‍या दोन लेन वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याचे बोरघाट वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मरागजे यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईकडे जाणार्‍या लेन वर किमी 37/ 700 …

Read More »

कर्जत चारफाटा येथे वाहतूक कोंडी

पर्यटकांची गर्दी वाढली कर्जत : बातमीदार नाताळनंतर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी असंख्य पर्यटकांची पावले कर्जतकडे वळली आहेत. त्यांच्या वाहनांच्या गर्दीमुळे कर्जत चारफाटा येथे रविवार (दि. 26)सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. कर्जत हा पर्यटन तालुका म्हणून विकसित झाला असून, या तालुक्यातील फार्महाऊसेस आणि रिसॉर्टमध्ये वीकेण्डला गर्दी …

Read More »

रायगडातील पर्यटनस्थळे गजबजली

धार्मिक स्थळांवरही भाविकांची गर्दी पाली : प्रतिनिधी नाताळ व वीकेण्ड सुट्ट्याचा पर्यटनासाठी फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे बहरली आहेत. शुक्रवारपासूनच पर्यटक रायगडाकडे येऊ लागले. त्यामुळे महामार्गावर वाहनांची गर्दी व वाहतूक कोंडी झाली होती. जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, …

Read More »

सामाजिक जाणीवांचे प्रेरणा भवन : लोकनेते रामशेठ ठाकूर भवन

27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन ‘या इमारतीचे उद्घाटन मा.शरदरावजी पवार यांचे हस्ते होत आहे.छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विषयाचे माजी विद्यार्थी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सत्कार्याचा परिचय करून देणारा हा संक्षिप्त लेख… छत्रपती शिवाजी कॉलेज हे रयत शिक्षण संस्थेचे पहिले कॉलेज. जून 1947 पासून हे कॉलेज सुरु …

Read More »