तुषार पवारांचे अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर (आकांकागुवा) मोहिमेसाठी मदतीचे आवाहन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्लायंबिंग, ट्रेकिंगसारख्या साहसी खेळाची आवड जोपासणारे तुषार पवार यांनी 26 जानेवारी 2022 रोजी अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट आकांकागुवा (6962 मीटर) सर करण्यासाठी मोहीम आखली आहे. …
Read More »लोकसहभागामुळे पनवेल महापालिकेला पुरस्कार मिळाला
आयुक्त गणेश देशमुख यांचे प्रतिपादन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरा मुक्त शहरांसाठीचा पुरस्कार मिळाला. नागरिकांचा प्रतिसाद, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि जनेतेने केलेले प्रयत्न यासाठी महत्वाचे ठरल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी (दि. 22) पत्रकार परिषदेत सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये …
Read More »पनवेल प्रभाग 18मधील पाणीपुरवठा पुर्ववत
नगरसेवक मुकीद काझी यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त नगरसेवक मुकीद काझी व भाजप अल्पसंख्याक युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जवाद काझी यांच्या पाठपुराव्याने येथील प्रभाग क्र. 18 मधील पाणी समस्या मार्गी लागली. त्यामुळे येथील नागरिकांनी मुकीद काझी व जवाद काझी यांचे आभार मानले. पनवेलच्या प्रभाग क्र.18 पाडा मोहल्ला येथे …
Read More »पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छ भारत अभियानंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरा मुक्त शहरांसाठीचा पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमत केंद्रिय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्री हरदिप सिंग पुरी यांच्या हस्ते पनवेल महापालिकेस सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी सभागृह नेते परेश …
Read More »तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पनवेल तालुका अध्यक्ष आणि जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 22) विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुकापूर येथे समाज मंदिराचे उद्घाटन आणि गटारांच्या कामांचे भूमिपूजन तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबत नेरे येथे …
Read More »मराठा समाजाची माफी मागून पुन्हा आरक्षण मिळवून द्या
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची ठाकरे सरकारकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी …
Read More »खालापुरात स्थानिक स्वराज्य संस्थेला मरगळ
विकासकामे कागदावरच खोपोली : प्रतिनिधी खालापूर पंचायत समितीमधील महत्त्वाची पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्याने तालुक्यातील शिक्षण, आरोग्य आणि विकासकामांचा खेळखंडोबा झाला आहे. शिवाय ग्रामपंचायत भ्रष्टाचार चौकशी प्रकरणाला ब्रेक लागला आहे. खालापूर तालुका मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत, आणि औद्योगिक प्रगतीत पुढे असूनदेखील विकासाची गंगा गावोगावी पोहचलेली नाही. खालापूर तालुक्यात चव्वेचाळीस ग्रामपंचायती आहेत. या …
Read More »वडखळजवळ दोन दुचाकींची धडक; तिघे जखमी
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावच्या हद्दीत रविवारी (दि. 21) सकाळी एका भरधाव दुचाकीने समोरून येणार्या दुसर्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले. चंद्रकांत कृष्णा बावकर (रा. वेलशेत, ता. रोहा) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच-06,एटी-6427) घेऊन रविवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास नागोठणे बाजुकडून डोलघर (ता. पनवेल) …
Read More »महडचे गणपती मंदिर आज भाविकांसाठी राहणार खुले
खोपोली : प्रतिनिधी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे अंगारक संकष्ट चतुर्थीला (दि. 23) वरदविनायक मंदिर भक्तांसाठी चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय महड येथील श्री गणपती संस्थान समितीने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दीड वर्ष खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायक मंदिर बंद होते. घटस्थापनेला मंदिर खुले करण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केल्यानंतर महड …
Read More »अवकाळी पावसाने मोठे नुकसान
चौल-रेवदंड्यातील सुपारी व्यापारी, बागायतदार हवालदिल रेवदंडा : प्रतिनिधी अवकाळी आलेल्या पावसामुळे चौल-रेवदंड्यातील सुपारी व्यापारी व बागायतदाराचे अतोनात नुकसान झाले. अवकाळी पावसाने बेसावध असलेले बागायतदारांच्या सुपारीस पाणी लागल्याने त्यांना मोठी झळ बसली आहे. झाडावरून उतरवण्यात आलेल्या सुपार्यांना पाणी लागल्याने सुपारीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापार्यांना अगदी कमी किमतीत सुपारी द्यावी लागेल, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper