Breaking News

Ramprahar Team

रायगडातील पर्यटनस्थळे बहरली; स्थानिकांच्या रोजगाराला चालना

पाली : प्रतिनिधी विस्तीर्ण समुद्रकिनारा, प्रसिद्ध किल्ले, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे, निसर्गसौंदर्य यामुळे रायगड जिल्ह्याला पर्यटकांची नेहमीच पसंती असते. मात्र कोरोनामुळे मागील पावणे दोन वर्षांपासून येथील पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. सध्या कोरोनाचे सावट धूसर झाले आहे. अनेक नियम शिथिल केले आहेत. यंदा राहण्या-खाण्याचे दर स्थीर आहेत. त्यामुळे पर्यटकांचा …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पद्म पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी (दि. 8) राजधानी दिल्लीत झाला. यंदा सात मान्यवरांचा ‘पद्मविभूषण’, 10 मान्यवरांचा ‘पद्मभूषण’ आणि 102 जणांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे. तर 16 जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार …

Read More »

मुरूडमध्ये आढळला बारा फुटांचा अजगर

मुरूड : प्रतिनिधी शहरातील एसटी डेपोजवळील नितिन आबुर्लेच्या यांच्या घराच्या प्रांगणात कामगार नरेंद्र माने यांना अजगर आढळला. त्यांनी तात्कळ सर्पमित्र संदिप घरत यांना बोलविले. त्यांनी वन कर्मचार्‍यांच्या मदतीने 12 फूट लांबीच्या आणि  25 किलो वजनाच्या या सुस्त अजगराला पकडले. व वन विभागाच्या स्वाधीन करून अजगराला गारंबी येथील जंगलात सोडण्यात आले. …

Read More »

कुपोषित बालकांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कुपोषण ही समस्या देशाला दीर्घकाळापासून भेडसावत आहे. गरिबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याने ही समस्या उद्भवत आहे. गरिबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मतः कुपोषणाची शिकार ठरणार्‍या बालकांचे प्रमाण मोठे आहे. याबाबतीत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली सरकारने …

Read More »

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाटाची उंची वाढणार

कार्यादेश निघाले, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनची उंची वाढविण्याचे काम 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण केले जाईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत येथील  पंकज ओसवाल यांना लेखी कळविले आहे. कर्जत रेल्वे स्थानकातील तीन क्रमांकाचा फलाट आणि लोकल किंवा एक्सप्रेस गाडीच्या दरवाजामध्ये मोठे …

Read More »

कर्जत तालुका भाजपची किल्ले स्पर्धा

175 जणांचा सहभाग; वसुधा बुंधाटे प्रथम कर्जत : बातमीदार भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका सरचिटणीस राजेश भगत यांच्या पुढाकाराने बालकलाकारांसाठी किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तब्बल 175 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील बालकलाकारांनी जंजिरा किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, प्रतापगड, लोहगड, तोरणा आदी किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. …

Read More »

सेवाभावाचा मूलमंत्र

गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांमुळे देश पातळीवर विरोधी पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. बुडत्याला काडीचा आधार बहुदा यालाच म्हणत असावेत. या पक्षांच्या कित्येक नेत्यांना ताबडतोबीने आगामी विधानसभा निवडणुका, तसेच पुढील सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची स्वप्ने पडू लागली असून त्यांच्यापैकी अनेकांनी अगदी आकडेवारीसह आपल्या विजयाचे भाकीतही करून टाकले …

Read More »

दुर्गदर्शन सोहळ्याची दीपोत्सवाने सांगता

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त राजे शिवराय प्रतिष्ठान, नवीन पनवेलच्या वतीने दिवाळीनिमित्त कुलाबा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. रविवारी (दि. 7) दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमाणसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी तसेच गडकोटांप्रति आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान मागील 16वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करीत आहे. पनवेल विभागाचे …

Read More »

इराणचा कांदा बाजारात दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मध्यंतरी वळवाचा पाऊस झाल्याने कांद्यासह सर्वच कृषीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर 40 रुपये किलोपर्यंत पोहचले होते. एकंदरीत परिस्थिती पाहता कांद्याचे दर वाढणार हे गृहीत धरून बाजारातील आयातदार, व्यापार्‍यांनी इराणमधून कांदा मागवला होता. तो कांदा आता बंदरात पोहचला आहे आणि …

Read More »

नवी मुंबईत रात्रीची स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निश्चय केला, नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेबाबत जागरूक असणार्‍या नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार दिवाळीत रात्री वाजविल्या जाणार्‍या फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या कचर्‍यामुळे सकाळी दैनंदिन स्वच्छतेवर वाढणारा ताण लक्षात घेत 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या रात्रीपासून …

Read More »