अलिबाग : प्रतिनिधी चोरीच्या प्रकरणात जप्त केलेला 60 लाख रुपयांचा मुद्देमाल रायगड पोलिसांनी 29 मुळ मालकांना परत केला. यात सोन्याचे दागिने, मोबईल, वाहने आदीचा समावेश आहे. रायगड पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात शुक्रवारी (दि. 17) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात देण्यात आला. या कार्यक्रमास कोकण परीक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक …
Read More »द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा अपघात
एक ठार; तिघे गंभीर जखमी खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील मुंबई मार्गिकेवर गुरुवारी (दि. 16) मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा अपघात झाला. त्यात अफकॉन कंपनीचा कर्मचारी ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात महामार्गाच्या विस्तारीकरणाचे …
Read More »माथेरानला मिळणार पशुवैद्यकीय रुग्णवाहिका
केंद्रीय मंत्र्यांचे भाजपच्या शिष्टमंडळाला आश्वासन कर्जत : प्रतिनिधी माथेरानमधील घोड्यांवर तात्काळ उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन केंद्रीय पशुधन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री पुरुषोत्तम रूपात यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे अश्व तसेच अश्वमालकांना दिलासा मिळाला आहे. मोटार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. …
Read More »म्हसळ्यात गोवंश चोरीची घटना
म्हसळा : प्रतिनिधी चरायला सोडलेला बैल रात्री ठरल्या वेळी घरी न आल्याने शेतकरी सदानंद गोविंद काते (वय 48, रा. सावर, ता. म्हसळा) यांनी पोलिसांकडे धाव घेतली. हकीगत ऐकली, पण पोलिसांनी चोरीची नोंद न केल्याने काते यांनी शहर व तालुका हिंदू समाजाच्या अध्यक्षांकडे आपले गार्हाणे मांडले. त्यांनी आग्रह धरल्यामुळे म्हसळा पोलिसांनी …
Read More »समाजाची मुलींविषयीची मानसिकता बदलली पाहिजे -पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे
मुरूड : प्रतिनिधी एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानात क्रांती होताना दिसत आहे, मात्र मुली-महिलांवरील अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. समाजाने मुली-महिलांविषयीची मानसिकता बदलली तरच त्या सुरक्षित राहू शकतील, असे प्रतिपादन मुरूडच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे यांनी येथे केले. मुरूडमधील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक रेखा जगदाळे …
Read More »भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ
म्हसळा नगरपंचायत निवडणूक म्हसळा : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आठ उमेदवार उभे केले असून, त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (दि. 16) ग्रामदैवत श्री धावीर देव महाराज यांना श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. म्हसळा नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढवीत आहे. त्यासाठी भाजपने संतोष पानसरे (प्रभाग क्रमांक …
Read More »दत्त जयंती विशेष : विष्णूचा दत्तात्रेय अवतार
दत्तात्रेय हा शब्द ‘दत्त’ व ‘अत्रेय’ अशा दोन शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘अत्रेय’ म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत, मात्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता …
Read More »भारताकडून यजमान बांगलादेशचा धुव्वा
चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा नवी दिल्ली : वृत्तसंस्था आघाडीपटू दिलप्रीत सिंगने साकारलेल्या हॅट्ट्रिकमुळे गतविजेत्या भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत बुधवारी दुसर्या साखळी सामन्यामध्ये यजमान बांगलादेशचा 9-0 असा धुव्वा उडवला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरला. सलामीच्या लढतीत कोरियाने 2-2 असे बरोबरीत रोखल्यानंतर भारताने बांगलादेशविरुद्ध आक्रमक शैलीत …
Read More »सुयश, प्रियंकाकडे महाराष्ट्राच्या संघांचे नेतृत्व
मुंबई : प्रतिनिधी जबलपूर, मध्य प्रदेश येथे 26 ते 30 डिसेंबरदरम्यान होणार्या 54व्या राष्ट्रीय अंजक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी बुधवारी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले. पुण्याचा सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे या स्पर्धेत अनुक्रमे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व करतील. सोलापूर येथे झालेल्या राज्य अंजक्यपद स्पर्धेतील कामगिरीद्वारे या संघांची निवड …
Read More »भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर रवाना
विराट मात्र फोटोंमधून गायब नवी दिल्ली : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिका दौर्यावर रवाना झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या संबंधीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार विराट कोहली या फोटोंमध्ये दिसत नाही. भारतीय संघ दौर्यावर जात असेल आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper