Breaking News

Ramprahar Team

रनमशीन कोहलीचा ‘विराट’ विक्रम

आयपीएलमध्ये सहा हजारधावांचा टप्पा पार मुंबई ः प्रतिनिधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. आयपीएलमध्ये सहा हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने 196 सामन्यांत हा विक्रम प्रस्थापित केला असून, यात पाच शतके आणि 40 अर्धशतकांचा समावेश आहे. राजस्थान …

Read More »

ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा

अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमारला वगळले नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आगामी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेसाठी अनुभवी सुशील कुमारला वगळण्यात आले आहे. याचप्रमाणे माजी आशियाई विजेत्या अमित धानकरला (74 किलो) राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या संदीप मानपेक्षा प्राधान्य दिले आहे. सोफिया (बल्गेरिया) येथे 6 ते 9 मे या कालावधीत होणारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता …

Read More »

‘आरसीबी’चा विजयी चौकार

देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी; राजस्थान पराभूत मुंबई ः प्रतिनिधी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)ची विजयी घोडदौड सुरुच असून, राजस्थानविरुद्धचा सामना जिंकत बंगळुरूने एकही  गडी न गमावता आरामात जिंकला आणि विजयी चौकार मारला. राजस्थानने विजयासाठी दिलेले 178 धावांचे लक्ष्य बंगळुरूने कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीर जोडीने 16.3 …

Read More »

भाजपचे एकनाथ भोपी यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष, सुकापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि एमएमआरडीएचे माजी संचालक एकनाथ भोपी यांचे कोरोनामुळे गुरुवारी (दि. 22) वाशी येथील पीकेसी रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी ते 50 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. एकनाथ भोपी यांच्या अंत्यविधीला भाजप …

Read More »

धीर सोडू नका

एक वर्षाच्या कोरोनाविरोधी लढाईचा अनुभव आणि या घातक विषाणूला नेस्तनाबूत करणार्‍या प्रतिबंधक लसी यांच्या जोरावर ही दुसरी लाट आपल्याला नक्कीच परतवून लावता येईल. त्यासाठी दोन पथ्ये मात्र आवर्जून पाळावी लागतील. कोरोनासारख्या घातक विषाणूशी मुकाबला एकजुटीनेच करता येईल हे प्रथमत: लक्षात घ्यायला हवे. राजकारणाच्या नावाखाली एकमेकांची उणीदुणी काढण्याची ही वेळ नव्हे. …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीकडून लवकरच जम्बो कोविड केअर सेंटर

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पेणजवळील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली होती. त्या अनुषंगाने जेएसडब्ल्यू कंपनीच्या रूग्णालयात 800 बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे रहात आहे. तब्बल 800 बेडचे हे अद्यावत कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात …

Read More »

पेणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय 15 दिवस बंद

कोरोना महामारीचा बसला फटका पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय राज्य शासनाच्या आदेशानुसार व कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यास काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे आरटीओची ऑनलाइन कागदपत्रे पूर्तता करणारे केंद्र व्यवसायिकांना कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसलेला दिसून येत आहे. शासनाच्या आदेशानुसार पेण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय …

Read More »

…अन् जिल्हा महिला व बालविकास अधिकार्यांनी रोखले बालविवाह

अलिबाग : जिमाका टाळेबंदी लागू असतानाही रायगड जिल्ह्यात विवाह सोहळे सुरू असून चक्क बालविवाहांच्या घटनाही समोर येत आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालकांचे विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रायगड जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तातडीने हालचाली करुन हे बालविवाह रोखले. तसेच या बालकांचे आई-वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व योग्य …

Read More »

पालीतील व्यापार्यांना ऑनलाइन गंडा

पोलिसांचे सतर्क राहण्याचे आवाहन पाली : प्रतिनिधी आर्मीचा कॅम्प पालीजवळ लागला आहे, त्यासाठी दूध, दही, पनीर, किराणा, जेवण, भाजीपाला आदी पाहिजे असे फोनवर सांगून एटीएम फोटो आणि पिन नंबर घेवून पालीतील व्यापार्‍यांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याच्या घटना बुधवारी (दि. 21) समोर आल्या आहेत. यासंदर्भात व्यापार्‍यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाली …

Read More »

जेएसडब्ल्यूकडून 170 मेट्रिक टन ऑक्सिजनपुरवठा

पेण : प्रतिनिधी सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. या पार्श्वभूमीवर पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीकडून मुंबई महानगर क्षेत्रासाठी 170 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याची माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी नारायण बोलबंडा यांनी दिली. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांची होणारी फरफट थांबवण्यासाठी औद्योगिक कंपन्यांमध्ये तयार होणारा ऑक्सिजन आरोग्य …

Read More »